EC issued Assembly elections guidelines : नवी दिल्लीः पाच राज्यांच्या (States) विधानसभा निवडणुका (Assembly elections) होणार आहेत. निवडणुका म्हटल्या म्हणजे प्रचारांच्या धुराळा उडत असतो. जो नाही तो आपल्या कार्यकर्त्यांना (Party Workers) घेऊन आपल्या मतदारसंघात (Constituency) मत मागण्यास उमेदवारांचे (Candidates) दौऱ्यावर दौरे होत असतात. परंतु आता कार्यकर्त्यांचा गराडा घेऊन उमेदवारांना मते मागता येणार नाहीत. विधानसभा निवडणुकांबाबत निवडणूक आयोगाने (Election Commission) सोमवारी नवी मार्गदर्शक तत्त्वे (guidelines) जारी केली आहेत. कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता आयोगाने निवडणूक प्रचाराशी संबंधित निर्बंधांमध्ये मोठा दिलासा दिला आहे. नव्या सूचनांनुसार आता उमेदवार आणि कार्यकर्ते 20 च्या संख्येने घरोघरी जाऊन प्रचार करू शकतील. आयोगाने राजकीय पक्षांना आणखी कोणता दिलासा दिला आहे ते आपण या लेखात जाणून घेणार आहोत..
उत्तर प्रदेशमध्ये सात टप्प्यात निवडणुका होणार आहेत. 10 फेब्रुवारी, 14 फेब्रुवारी, 20 फेब्रुवारी, 23 फेब्रुवारी, 27 फेब्रुवारी, 3 मार्च आणि 7 मार्च 2022 रोजी मतदान होणार आहे. मणिपूरमध्ये २७ फेब्रुवारी आणि ३ मार्चला दोन टप्प्यात मतदान होणार आहे. याबरोबर पंजाब, उत्तराखंड आणि गोव्यात १४ फेब्रुवारीला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. तर 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.
कोणत्या राज्यात किती जागा?
उत्तर प्रदेश- 403 जागा
पंजाब - 117 जागा
उत्तराखंड 70 जागा
मणिपुर - 60 जागा
गोवा - 40 जागा