Congress Protest Against ED: काँग्रेस अध्यक्षा (Congress president) सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची ईडीकडून (ED) दुसऱ्यांदा चौकशी केली जाणार आहे. या विरोधात काँग्रेस (Congress Party) पक्ष आज पुन्हा एकदा देशभरात रस्त्यावर उतरणार असून आंदोलन (agitation) करणार आहे. देशभरात जेथे महात्मा गांधींच्या (Mahatma Gandhi) पुतळे आहेत तेथे काँग्रेस निदर्शने करणार आहे. तर मुंबईतही मंत्रालयाजवळच्या गांधी पुतळ्यासमोर काँग्रेसकडून सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार आहे. तर दिल्लीत काँग्रेस मुख्यालयात नेत्यांचा मेळावा होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी सकाळी साडेअकराच्या सुमारास ईडीसमोर हजर होतील.
दरम्यान, यापूर्वी ईडीनं गुरुवारी (21 जुलै) सोनिया गांधी यांची चौकशी केली होती. त्यानंतर त्यांना सोमवारी म्हणजेच, 25 जुलै रोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी समन्स बजावलं होतं. पण पुन्हा नव्यानं समन्स बजावत 25 ऐवजी 26 जुलैला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
Read Also : विषारी दारूमुळे मृत्यूचं तांडव; ९ जणांचा मृत्यू
नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राशी संबंधित कथित मनी लाँड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने गुरुवारी (21 जुलै) सोनिया गांधी यांची चौकशी केली होती. ही चौकशी सुमारे दोन ते तीन तास चालली. त्यानंतर तपास यंत्रणेनं त्यांना सोमवारी म्हणजेच, 25 जुलै रोजी हजर राहण्यास सांगितलं होतं. परंतु सोनिया गांधी यांना आता सोमवारी (25 जुलै) नव्हे तर मंगळवारी (26 जुलै) तपास यंत्रणेसमोर हजर राहणं आवश्यक असल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. तारीख बदलण्याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.
Read Also : रणवीर सिंगविरोधात मुंबईत गुन्हा दाखल
सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीने चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले होते. पण त्यावेळी कोरोनाची लागण झाल्याने त्या चौकशीसाठी उपस्थित राहिल्या नव्हत्या. कोरोनामुक्त झाल्यानंतर सोनिया गांधी ईडी चौकशीला उपस्थित राहिल्या. त्यामुळे कोविड प्रोटोकॉल लक्षात घेऊन त्यांची चौकशी करण्यात आली होती, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
काँग्रेसच्या म्हणण्यानुसार, पक्षाकडून देशभरात विरोध निदर्शने केली जाणार आहेत. परंतु दिल्ली पोलिसांनी दिल्लीच्या राजघाटावर ‘सत्याग्रह’ निदर्शन आंदोलन करण्याची परवानगी दिलेली नाही. सोनिया गांधी यांच्या चौकशीवरुन काँग्रेस खासदाराने आरोप केला की, मोदी सरकारवर राजकीय सूडबुद्धीसाठी केंद्रीय संस्थांचा गैरवापर करत आहे. काँग्रेस पक्ष संसदेत निदर्शने करतील आणि नंतर पक्षाच्या मुख्यालयात येऊन निदर्शने करतील. याबाबत सोमवारी सायंकाळी काँग्रेस नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. सध्या पक्षाचे नेते आज सकाळीही संसदेत बैठक घेणार आहेत.
सोनिया गांधी यांचे निवासस्थान असलेल्या 10 जनपथला लागून असलेल्या काँग्रेस मुख्यालयात मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांना एकत्र येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, संसदेचे अधिवेशन पाहता पोलीस काँग्रेस कार्यकर्त्यांना त्यांच्या कार्यालयात जमून आंदोलनाची परवनागी देणार नाहीत. दरम्यान काँग्रेसचे सरचिटणीस अजय माकन आज सकाळी १० वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत.
21 जुलै रोजी, ईडीने नॅशनल हेराल्ड प्रकरणात कथित मनी लाँड्रिंग प्रकरणी सोनिया गांधी यांची जवळपास दोन तास चौकशी केली. गेल्या महिन्यात जूनमध्ये राहुल गांधी यांची जवळपास 50 तास चौकशी करण्यात आली होती. त्यानंतरही काँग्रेसने सलग ५ दिवस निदर्शने केली होती.
Read Also : शिंदेंची हाव संपत नाही, शिवसेना गिळायला निघालेत -उद्धव ठाकरे
काँग्रेसच्या या निदर्शनांवर भाजपने उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना काँग्रेसचे प्रवक्ते शक्ती सिंह गोहिल यांनी दावा केला की, गुजरात दंगलीप्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची एसआयटीने चौकशी केली होती. तर एकीकडे राज्यभर भिंतींवर काँग्रेस नेते आणि अगदी राज्यपालांविरोधात अपशब्द लिहिले जात होते.
तर भाजपच्या एका आमदाराने चौकशी थांबवण्यासाठी उच्च न्यायालय ते सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती, पण आराम मिळत नव्हता. गुजरातमधील विरोधी पक्षनेते असलेले गोहिल म्हणाले की, केंद्रातील काँग्रेस सरकारच्या काळात नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना कोणत्याही केंद्रीय एजन्सीने बोलावले नव्हते, परंतु न्यायालयाच्या निर्देशानुसार त्यांची चौकशी करण्यात आली होती.
नॅशनल हेराल्ड हे वृत्तपत्र आहे. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1938 साली हे वृत्तपत्र सुरू केले होते. हे वृत्तपत्र चालवण्याची जबाबदारी 'असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड' (एजेएल) नावाच्या कंपनीकडे होती. या कंपनीवर सुरुवातीपासून काँग्रेस आणि गांधी घराण्याचे वर्चस्व होते. तब्बल 70 वर्षांनंतर 2008 मध्ये हे वृत्तपत्र तोट्यात गेल्यामुळे बंद करावे लागले. त्यानंतर काँग्रेसने पक्ष निधीतून एजेएलला 90 कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज दिले.
मग सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी 2010 मध्ये 'यंग इंडियन' नावाची नवी कंपनी स्थापन केली. असोसिएटेड जर्नल्सला दिलेल्या कर्जाच्या बदल्यात यंग इंडियनला कंपनीत 99 टक्के हिस्सा मिळाला. सोनिया आणि राहुल गांधी यांची यंग इंडियन कंपनीत 38-38 टक्के हिस्सेदारी आहे. बाकीचा हिस्सा मोतीलाल बोरा आणि ऑस्कर फर्नांडिस यांच्याकडे होता. दरम्यान याप्रकरणी ईडीनं यापूर्वी सोनिया गांधी यांचे पुत्र आणि खासदार राहुल गांधी यांचीही चौकशी केली होती. त्याचवेळी काँग्रेसनं ईडीच्या कारवाईचा निषेध करत राजकीय सूडबुद्धीनं ही कारवाई करत असल्याचं म्हटलं होतं