ED कडून यंग इंडियाचे कार्यालय सील, 10 जनपथच्या बाहेर वाढवली सिक्युरिटी

नॅशनल हेराल्ड प्रकरणात मोठी कारवाई करत अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) हेराल्ड हाऊस येथील यंग इंडियाचे कार्यालय सील केले आहे. काल ईडीने या कार्यालयाची झडती घेतली होती, त्यानंतर ते सील करण्यात आले आहे.

ED seals Young India office in Delhi, increased security outside Sonia-Rahul's house
ED ने दिल्लीतील यंग इंडियाचे कार्यालय सील, 10 जनपथच्या बाहेर वाढवली सिक्युरिटी  |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • एजन्सीच्या परवानगीशिवाय परिसर उघडू नये, असे निर्देश ईडीने दिले आहेत
  • दिल्लीतील एआयसीसी मुख्यालयाबाहेर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे
  • सोनिया गांधी यांच्या निवासस्थान 10 जनपथच्या बाहेर अतिरिक्त पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.

नवी दिल्ली: नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या संदर्भात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी दिल्लीतील हेराल्ड हाऊस येथील यंग इंडियाचे कार्यालय सील केले. त्याचबरोबर एजन्सीच्या परवानगीशिवाय परिसर उघडू नये, असे निर्देश ईडीने दिले आहेत. दुसरीकडे, जयराम रमेश, प्रमोद तिवारी, पी चिदंबरम, सलमान खुर्शीद आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह दिग्गज काँग्रेस नेते काँग्रेस मुख्यालयात पोहोचले आहेत. ईडीच्या कारवाईबाबत काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांची बैठक सुरू आहे. (ED seals Young India office in Delhi, increased security outside Sonia-Rahul's house)

अधिक वाचा : Rahul Gandhi नी कर्नाटकात घेतली लिंगायत संप्रदायाची दीक्षा

त्याचवेळी दिल्लीतील एआयसीसी मुख्यालयाबाहेर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थान 10 जनपथच्या बाहेरही अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्विट केले की, "दिल्ली पोलिसांकडून एआयसीसी मुख्यालयाकडे जाणारा रस्ता रोखणे ही आता अपवादाऐवजी सामान्य गोष्ट आहे." प्रत्यक्षात, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) या प्रकरणात एक दिवस आधी दिल्ली आणि कोलकातासह 12 ठिकाणी छापे टाकले होते.

अधिकृत सूत्रांनी सांगितले की, ईडीकडून मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या चौकशीच्या संदर्भात ही कारवाई करण्यात आली आहे. अधिकृत प्रतिनिधींच्या अनुपस्थितीमुळे मंगळवारच्या छाप्यादरम्यान ते गोळा करता आले नाही, "पुरावे सुरक्षित ठेवण्यासाठी" कार्यालय तात्पुरते सील करण्यात आले आहे, असे ते म्हणाले. नॅशनल हेराल्डचे उर्वरित कार्यालय वापरासाठी खुले असल्याचे सूत्रांनी सांगितले. ते म्हणाले, ईडीने यंग इंडियनच्या कार्यालयाबाहेर एक नोटीस चिकटवली असून त्यावर तपास अधिकाऱ्याची स्वाक्षरी आहे. एजन्सीच्या परवानगीशिवाय हे कार्यालय सुरू करता येणार नाही, असे नोटीसमध्ये लिहिले आहे.

अधिक वाचा : My Tiranga My Pride : काँग्रेसने नेहरुंचा फोटो असलेला ठेवला डीपी, अशा प्रकारे दिले पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद

नॅशनल हेराल्डशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात मंगळवारी ईडीने हेराल्ड हाऊससह 12 ठिकाणी छापे टाकले होते. याप्रकरणी सोनिया आणि राहुल गांधी यांची चौकशी करण्यात आली आहे. चौकशीदरम्यान, सोनिया गांधी यांना ईडीकडून चौकशी करण्यात आली की एजेएलच्या अधिग्रहणात 90 कोटी रुपयांच्या कर्जाचा उल्लेख का नाही आणि डोटेक्स कंपनीने दिलेले 1 कोटी रुपयांचे कर्ज कोणत्या स्वरूपात घेण्यात आले. त्याला उत्तर देताना सोनियांनी या सर्व गोष्टींची माहिती नसून मोतीलाल व्होरा यांना माहिती असल्याचे सांगितले.

अधिक वाचा : फुकटात देण्याचे राजकारण अर्थव्यवस्थेसाठी धोक्याचे, केंद्राचा सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद

सोनिया गांधींना 300 हून अधिक प्रश्न विचारण्यात आले

नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया आणि राहुल गांधी दोघेही आरोपी आहेत. दोन्ही नेत्यांवर कलम १२० (बी) (गुन्हेगारी कट) आणि ४२० (फसवणूक) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनिया आणि राहुल गांधी आता जामिनावर बाहेर आहेत. यापूर्वी 4 दिवसांच्या चौकशीत ईडीने सोनियांना 100 हून अधिक प्रश्न विचारले होते. यंग इंडियनने असोसिएटेड जनरल लिमिटेड (एजेएल) आणि तिची मालमत्ता कशी मिळवली हे शोधण्याचा ईडी प्रयत्न करत आहे. तत्कालीन काँग्रेस सरकारने दिल्ली, मुंबई, लखनौ, भोपाळ आणि चंदीगड येथील अनेक मालमत्ता सवलतीच्या दरात विकण्याची परवानगी दिली होती.

अधिक वाचा : Nancy Pelosi Trump: 'नॅन्सी पेलोसी पागल आहे, नेहमी देशासाठी...', डोनाल्ड ट्रम्प यांची स्वैर टीका


सुब्रह्मण्यम स्वामी यांनी फिर्याद दिली होती

यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेड विरुद्ध आयकर विभागाच्या तपासाची ट्रायल कोर्टाने दखल घेतल्यानंतर एजन्सीने पीएमएलएच्या फौजदारी तरतुदींनुसार नवीन गुन्हा नोंदवला होता. भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी 2012 मध्ये याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन वर्षांनी जून 2014 मध्ये न्यायालयाने सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याविरोधात समन्स जारी केले होते. या वर्षी ऑगस्टमध्ये अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दखल घेतली आणि मनी लाँड्रिंगचा गुन्हा नोंदवला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी