National Herald Case : नॅशनल हेराल्डच्या कार्यालयावर ED चा छापा, सोनिया-राहुल गांधी यांच्या चौकशीनंतर मोठी कारवाई

अंमलबजावणी संचालनालयाच्या (Enforcement Directorate) पथकाने दिल्ली आणि इतर ठिकाणाच्या नॅशनल हेराल्ड (National Herald)च्या कार्यालयावर छापा टाकला आहे. ईडीचे (ED) अधिकारी नॅशनल हेराल्डच्या कार्यालयात उपस्थित असून शोध मोहीम सुरु आहे. या प्रकरणी यापूर्वी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी  आणि राहुल गांधी यांचीही चौकशी करण्यात आली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात हे छापे टाकण्यात आले आहेत. वृत्तसंस्थेने अधिकृत सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, ईडीने नॅशनल हेराल्डच्या कार्यालयावर तसेच १२ ठिकाणी छापे टाकले आहे

 ED raids office of National Herald
नॅशनल हेराल्डच्या कार्यालयावर ED चा छापा   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • ईडीने नुकतीच सोनिया गांधी यांची तीन दिवस चौकशी केली होती.
  • मनी लाँड्रिंग प्रकरणात हे छापे टाकण्यात आले आहेत.
  • ईडीने नॅशनल हेराल्डच्या कार्यालयावर तसेच १२ ठिकाणी छापे टाकले आहेत.

नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयाच्या (Enforcement Directorate) पथकाने दिल्ली आणि इतर ठिकाणाच्या नॅशनल हेराल्ड (National Herald)च्या कार्यालयावर छापा टाकला आहे. ईडीचे (ED) अधिकारी नॅशनल हेराल्डच्या कार्यालयात उपस्थित असून शोध मोहीम सुरु आहे. या प्रकरणी यापूर्वी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी  आणि राहुल गांधी यांचीही चौकशी करण्यात आली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात हे छापे टाकण्यात आले आहेत. वृत्तसंस्थेने अधिकृत सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, ईडीने नॅशनल हेराल्डच्या कार्यालयावर तसेच १२ ठिकाणी छापे टाकले आहेत. 

सोनिया गांधींची तीन चौकशी

ईडीने नुकतीच सोनिया गांधी यांची तीन दिवस चौकशी केली होती. तीन दिवसांच्या चौकशीत सोनियांना ईडीने 100 हून अधिक प्रश्न विचारले. चौकशीदरम्यान त्यांच्यासोबत प्रियांका गांधीही उपस्थित होत्या. सोनिया गांधी यांची चौकशी करण्याची प्रक्रिया १८ जुलैपासून सुरू झाली. त्या दिवशी त्यांची सुमारे दोन तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्याला 27-28 प्रश्न विचारण्यात आले. हे प्रश्न AJL ची ढासळलेली आर्थिक स्थिती, काँग्रेसने 90 कोटींचा व्यवहार करण्याचा निर्णय याशी संबंधित होते. 26 जुलै रोजी सोनिया गांधी यांची जवळपास 6 तास चौकशी करण्यात आली होती. तेव्हा सोनिया गांधींनी बहुतांश प्रश्नांची उत्तरे 'माहित नाही'मध्ये दिली होती. यावेळी सोनिया गांधी यांनी प्रश्न टाळण्याचा प्रयत्न केला होता. त्यांना 6 तासांच्या चौकशीत सुमारे 50 प्रश्न विचारण्यात आले. या प्रकरणी ईडीने सोनियांव्यतिरिक्त त्यांचा मुलगा आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची पाच दिवस वेगवेगळ्या सत्रांमध्ये ५० तासांपेक्षा जास्त चौकशी केली होती.

काय आहे नॅशनल हेराल्ड प्रकरण?

नॅशनल हेराल्ड हे वृत्तपत्र आहे. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1938 साली हे वृत्तपत्र सुरु केले होते. हे वृत्तपत्र चालवण्याची जबाबदारी 'असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड' (एजेएल) नावाच्या कंपनीकडे होती. या कंपनीवर सुरुवातीपासून काँग्रेस आणि गांधी घराण्याचे वर्चस्व होते. तब्बल 70 वर्षांनंतर 2008 मध्ये हे वृत्तपत्र तोट्यात गेल्यामुळे बंद करावे लागले. त्यानंतर काँग्रेसने पक्ष निधीतून एजेएलला 90 कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज दिले. मग सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी 2010 मध्ये 'यंग इंडियन' नावाची नवी कंपनी स्थापन केली. असोसिएटेड जर्नल्सला दिलेल्या कर्जाच्या बदल्यात यंग इंडियनला कंपनीत 99 टक्के हिस्सा मिळाला. सोनिया आणि राहुल गांधी यांची यंग इंडियन कंपनीत 38-38 टक्के हिस्सेदारी आहे. बाकीचा हिस्सा मोतीलाल बोरा आणि ऑस्कर फर्नांडिस यांच्याकडे होता.

Read Also : मृत्यूनंतर मृतदेहाला एकटं का सोडलं जात नाही?

दरम्यान याप्रकरणी ईडीनं यापूर्वी सोनिया गांधी यांचे पुत्र आणि खासदार राहुल गांधी यांचीही चौकशी केली होती. त्याचवेळी काँग्रेसनं ईडीच्या कारवाईचा निषेध करत राजकीय सूडबुद्धीनं ही कारवाई करत असल्याचं म्हटलं होतं. चौकशीच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी देशव्यापी निदर्शनं केल्यानंतर अनेक काँग्रेस नेत्यांना ताब्यातही घेण्यात आलं होतं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी