एकनाथ शिंदे समर्थक खासदाराला दिल्लीत मोठी जबाबदारी

Eknath Shinde Camp MP Pratap Jadhav appointed as  chairman of the Standing Committee For Information and Technology : कुठे आहे तो वाझे.. कुठे आहे अनिल देशमुख... यांच्याकडून 'मातोश्री'वर दर महिन्याला १०० खोके जायचे... अशा स्वरुपाचे वक्तव्य काही दिवसांपूर्वी करणाऱ्या एकनाथ शिंदे समर्थक खासदाराला दिल्लीत मोठी जबाबदारी मिळाली आहे.

Eknath Shinde Camp MP Pratap Jadhav appointed as  chairman of the Standing Committee For Information and Technology
एकनाथ शिंदे समर्थक खासदाराला दिल्लीत मोठी जबाबदारी  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • एकनाथ शिंदे समर्थक खासदाराला दिल्लीत मोठी जबाबदारी
  • संसदीय माहिती तंत्रज्ञान स्थायी समितीच्या अध्यक्षपदी एकनाथ शिंदे समर्थक खासदार प्रताप जाधव यांची नियुक्ती
  • शिवसेनेच्या लोकसभेतील 18 पैकी 12 खासदारांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला आहे

Eknath Shinde Camp MP Pratap Jadhav appointed as  chairman of the Standing Committee For Information and Technology : कुठे आहे तो वाझे.. कुठे आहे अनिल देशमुख... यांच्याकडून 'मातोश्री'वर दर महिन्याला १०० खोके जायचे... अशा स्वरुपाचे वक्तव्य काही दिवसांपूर्वी करणाऱ्या एकनाथ शिंदे समर्थक खासदाराला दिल्लीत मोठी जबाबदारी मिळाली आहे. संसदीय माहिती तंत्रज्ञान स्थायी समितीच्या अध्यक्षपदी एकनाथ शिंदे समर्थक खासदार प्रताप जाधव यांची नियुक्ती झाली आहे. आधी संसदीय माहिती तंत्रज्ञान स्थायी समितीच्या अध्यक्षपदी काँग्रेस नेते शशी थरूर कार्यरत होते. आता या पदावर खासदार प्रताप जाधव यांची नियुक्ती झाली आहे.

शिवसेनेच्या लोकसभेतील 18 पैकी 12 खासदारांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. शिंदेंना पाठिंबा देणाऱ्या खासदारांमध्ये बुलढाण्याच्या खासदार प्रताप जाधव यांचा समावेश आहे. आता खासदार प्रताप जाधव संसदीय माहिती तंत्रज्ञान स्थायी समितीचे अध्यक्ष झाले आहेत. एकनाथ शिंदे समर्थक खासदाराला दिल्लीत मिळालेली ही पहिली मोठी जबाबदारी आहे. 

याआधी भाजपसोबत युती करणाऱ्या एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांना दिल्लीत मोठी संधी मिळणार असल्याची चर्चा सुरू होती. एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांना केंद्रात मंत्रिपद मिळेल अशी चर्चा रंगली होती. अद्याप असा कोणताही निर्णय झालेला नाही. पण एकनाथ शिंदे समर्थक खासदाराला दिल्लीत मोठी जबाबदारी मिळाली आहे.

काही महिन्यांपूर्वी शशी थरूर यांच्या अध्यक्षतेखालील संसदीय माहिती तंत्रज्ञान समितीने फेसबुक, ट्विटरसह अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना फैलावर घेतले होते. जाब विचारला होता. केंद्राने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या गैरवापराला आळा घालण्यासाठी नियमांची चौकट आखून दिली होती. या घडामोडींमुळे थरूर चर्चेत होते. आता थरूर यांच्या जागेवर संसदीय माहिती तंत्रज्ञान समितीच्या अध्यक्षपदी एकनाथ शिंदे समर्थक खासदार प्रताप जाधव आले आहेत. प्रताप जाधव यांच्या अध्यक्षतेत समिती कशा प्रकारे काम करणार याकडे अनेकांचे लक्ष आहे. 

खासदार जाधव यांना मिळालेली जबाबदारी बघता शिंदे समर्थक खासदारांना दिल्लीत विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या मिळतील अशी चर्चा जोर धरू लागली आहे. 

Mumbai Crime News : दसर्‍याच्या दिवशी मुंबईत घडली धक्कादायक घटना, विशीतल्या तरुणीसोबत...

Bigg Boss Marathi Season 4: घरामध्ये प्रसादला सारखं केलं जातंय टार्गेट?

प्रताप जाधव यांनी एकनाथ शिंदे यांना समर्थन देताच जाधव यांच्या पाठिशी असलेल्या एक जिल्हा प्रमुख, 2 उपजिल्हा प्रमुख आणि 3 तालुका प्रमुखांना उद्धव ठाकरे गटाने पक्षातून काढून टाकले. ही कारवाई झाली तरी खासदार प्रताप जाधव यांनी एकनाथ शिंदेंसोबत जाण्याची त्यांची भूमिका कायम ठेवली. यानंतर खासदार प्रताप जाधव यांना महत्त्वाची जबाबदारी मिळाली आहे. 

मागील काही दिवसांपासून एकनाथ शिंदे गट आणखी काही लोकप्रतिनिधींना उद्धव ठाकरे गटाकडून स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करत आहे. प्रताप जाधव यांना दिल्लीत मिळालेल्या जबाबदारीनंतर शिंदे गटाच्या प्रयत्नांना आणखी चालना मिळण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी