Sanjay Raut: 'एकनाथ शिंदे तर भाजपचे मुख्यमंत्री, म्हणून दिल्लीत सारखे येतात', राऊतांची जोरदार टीका

Sanjay Raut Criticized to Eknath Shinde: महाराष्ट्रचे तीन तुकडे करायचे आहेत, म्हणून आधी शिवसेना तोडण्याचं काम भाजप करत आहे. अशी जहरी टीका संजय राऊत यांनी भाजपवर केली आहे.

eknath shinde is chief minister of bjp so he always comes to delhi like that raut strong criticism
eknath shinde is chief minister of bjp so he always comes to delhi like that raut strong criticism  |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • भाजपला महाराष्ट्राचे तीन तुकडे करायचे आहेत, राऊतांचा आरोप
  • एकनाथ शिंदे भाजपचे मुख्यमंत्री, राऊतांचा टोला
  • शिवसेना भवन हे आमचंच, राऊतांचा दावा

नवी दिल्ली: 'भाजपला (Bjp) महाराष्ट्राचे (Maharashtra) तीन तुकडे करायचे आहेत. त्याआधी त्यांना शिवसेना (Shiv Sena) तोडायची आहे. त्यामुळेच आता मुख्यमंत्री जे दिल्लीत आले आहेत ती त्यांची रुटीन भेट आहे. कारण ते आता भाजपचे मुख्यमंत्री आहेत. त्यांचं हायकमांड इथं आहे.' अशा बोचऱ्या शब्दात शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टीका केली आहे. 

पाहा संजय राऊत नेमकं काय म्हणाले:

हे तर भाजपचे मुख्यमंत्री!

'बराचसा पोलीस बंदोबस्त हा आमदार-खासदारांच्या घरावर देखील लावला आहे. पोलीस बळ, पैसा आणि केंद्रीय यंत्रणांचा वापर होतोय. पण काहीही झालं तरी कोणत्या परिस्थितीशी संघर्ष करायला बाळासाहेबांची शिवसेना लढायला तयार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री जर दिल्लीत आले असतील तर ती त्यांची रुटींग भेट आहे. कारण ते भाजपचे मुख्यमंत्री आहेत. त्यांचं हायकमांड इथे आहे. मंत्रिमंडळ बनवायचं आहे, मंत्र्यांची नावं तयार करायची आहे.' 

'शिवसेनेचे मुख्यमंत्री पाहिले आहेत मी मनोहर जोशी, नारायण राणे पण ते कधी दिल्लीत आल्याचं माहित नाही मला मंत्रिमंडळाची यादी घेऊन किंवा सरकार स्थापनेबाबत चर्चेसाठी. त्या सर्व चर्चा त्यावेळी मुंबईतच होत होत्या.' अशी टीका संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर केली आहे. 

'भाजपला महाराष्ट्राचे तीन तुकडे करायचे आहेत'

'ज्या पद्धतीने छुपे वार सुरु आहेत. ज्या पद्धतीने महाराष्ट्राचे तीन पद्धतीने तीन तुकडे करण्याचे प्रयत्न सुरु आहेत हे भाजपचे नेतेच सांगतायेत त्यांना अखंड महाराष्ट्र तोडायचा आहे हे भाजपचे प्रमुख लोकं जाहीरपणे बोलायला लागले आहेत. महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याआधी त्यांना शिवसेनेचे तुकडे करायचे आहेत.' 

अधिक वाचा: 'हे तर वासू-सपनाचं सरकार, अजून आपलं...', राऊतांची बोचरी टीका

'शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेले आमदार किंवा खासदार आज जरी पाठीत खंजीर खुपसून जात असले तरी शिवसेनेची ताकद कमी होणार नाही. कारण आमदार-खासदार ही शिवसेनेची ताकद नाही. शिवसेना या सगळ्यातून पुन्हा उभी राहील. आज ज्यांच्या घराबाहेर चौकी-पहारे लागले आहेत. त्यांना कोणत्याही सभागृहात येणं आम्ही कठीण करु.'

'शिवसेना भवन ही शिवाई ट्रस्टची संपत्ती आहे. सामना ही प्रबोधन ट्रस्टची संपत्ती आहे. बाळासाहेब ठाकरेंनी ज्या व्यवस्था करुन ठेवल्या आहेत त्यानुसार हे सगळं चालतं आहे. मी म्हटलं ना त्यांना महाराष्ट्रच तोडायचा आहे म्हणून त्यांना शिवसेना तोडायची आहे. सत्तेची भांग प्यायलेली माणसं काहीही करु शकतात.' अशी बोचऱ्या शब्दात संजय राऊत यांनी टीका केली आहे. 

अधिक वाचा: महाराष्ट्रातील आणखी आमदार फुटणार, शिंदे गटात सहभागी होणार?

'उद्या म्हणतील मातोश्रीही आमचं आहे'

'उद्या म्हणतील मातोश्रीही आमचं आहे. मातोश्रीवर देखील कब्जा करतील. उद्या म्हणतील की, बाळासाहेबांनी शिवसेनाच स्थापन केली नाही. या लेव्हलला यांची वैचारिक पातळी उंचावली आहे.' 

'मुळात उद्यापासून सर्वोच्च न्यायालयात जी सुनावणी सुरु होत आहे सरकारच्या भविष्याचा फैसला करणारी त्या अस्वस्थतेतून मुख्यमंत्री दिल्लीत आले आहेत. काही प्रमुख नेत्यांना भेटतायेत. पण मला खात्री आहे की, न्यायलयावर दबाव आणण्याचा जरी प्रयत्न झाला तरी आजही सर्वोच्च न्यायालयात रामशास्त्री बाण्याचे काही न्यायाधीश आहेत आणि त्यांच्याकडून राष्ट्रसेवाच घडेल. त्यांच्याकडून न्यायाचा, लोकशाहीचा खून होणार नाही याची खात्री शिवसेनेला आहे.' 

'शिवसेना भवनाचा ताबा घेण्याबाबत कोणी विचारही मनात आणू नये. शिवसेना भवन, सामना, मातोश्री हे जर कोणाच्या डोक्यात असेल तर मग त्यांचे मेंदू तपासावे लागेल.' असं म्हणत संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना इशारा दिला आहे.   

महाराष्ट्रात पूरस्थिती गंभीर, पण मुख्यमंत्री राजकारणासाठी दिल्लीत

'नक्कीच एक त्यांनी वेगळा गट स्थापन केला आहे. पण तो शिवसेना नाही. तो फुटीर गट आहे. त्या गटाला कायदेशीर मान्यता नाही. त्यांना स्वत:च्या आमदारकी वाचविण्यासाठी एखाद्या पक्षात विलीन व्हावं लागेल. असं कायदा सांगतो. महाराष्ट्रात पूरस्थिती गंभीर आहे. संपूर्ण विदर्भात, मराठवाड्यात अत्यंत भयंकर स्थिती आहे आणि मुख्यमंत्री इथे राजकारण करण्यासाठी आले आहेत. सरकार वाचविण्यासाठी आले आहेत.' अशी टीकाही संजय राऊत यांनी केली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी