Murder of Brother : दारुच्या नशेत भावांमध्ये हाणामारी, थोरल्याने असा केला धाकट्याचा खून

दारुच्या नशेत घरी येऊन शिविगाळ करणाऱ्या धाकट्या भावाचा मोठ्या भावाच्या हातून खून झाला. या घटनेनंतर मोठा भाऊ फरार आहे.

Murder of Brother
दारुच्या नशेत सख्ख्या भावाचा खून  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • मोठ्या भावाने केला धाकट्या भावाचा खून
  • धाकट्या भावाने दारुच्या नशेत शिव्या दिल्याचा राग
  • खून करून मोठा भाऊ फरार

Murder of Brother : दारु प्यायलेल्या व्यक्तीचा आपल्या मेंदूवरील ताबा सुटतो आणि तो काहीही बरळायला लागतो. काहीजणांना हे बरळणं सहन करता येतं, तर काहीजण ते बिलकूल सहन करू शकत नाहीत. समोरची व्यक्ती कुठल्या अवस्थेत आहे, याचा विचार न करता दोन्ही व्यक्ती आक्रमक होतात आणि नात्यागोत्यांची भीडभाड न बाळगता रक्ताचे पाट वाहतात. अशीच एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमध्ये नुकतीच घडली आहे. 

दारु पिण्याची सवय

उत्तर प्रदेशाच्या गाझियाबादमध्ये राहणाऱ्या सुभाष नावाच्या तरुणाला दारुचं व्यसन होतं. तो आपल्या पत्नी आणि मुलांसह थोरल्या भावाच्या कुटुंबासोबत राहत असे. सुभाष हा मजुरीचं काम करायचा आणि कामानंतर दररोज दारु पिऊन कुटुंबीयांना शिविगाळ आणि मारहाण करत असे. घटनेच्या दिवशी त्याचा थोरला भाऊ अरविंदही घरी होता. सुभाष नेहमीप्रमाणे दारु पिऊन घरी आला आणि शिविगाळ करू लागला. ही बाब अरविंदला सहन झाली नाही. त्याने सुभाषला शांत राहण्याचा आणि घरात अपशब्द न उच्चारण्याचा दम भरला. 

भावांमध्ये हाणामारी

हा सल्ला पचनी न पडल्यामुळे आक्रमक झालेल्या सुभाषने अरविंदलाही शिव्या द्यायला सुरुवात केली. त्यानंतर अरविंदही त्याला शिव्या देऊ लागला. पाहता पाहता दोघांमधील वादावादी वाढत गेली आणि याचं रुपांतर कडाक्याच्या भांडणात झालं. रागाच्या भरात अरविंदने जवळच असलेलं दांडकं उचललं आणि सुभाषच्या डोक्यात जोरदार प्रहार केला. हा वार वर्मी बसल्याने सुभाष चक्कर येऊन पडला आणि त्याच्या डोक्यातून रक्ताचे पाट वाहू लागले. या प्रकाराने घाबरलेला अरविंद तातडीने घरातून पळून गेला. 

अधिक वाचा - Lalit Modi Surprize : ललित मोदींनी केलं होतं आईच्या मैत्रिणीशी लग्न, वडिलांनाही दिला होता मोठा धक्का, वाचा सविस्तर

उपचारापूर्वीच मृत्यू

या घटनेनंतर कुटुंबीयांनी सुभाषला तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र सुभाषवर इथं उपचार होणं शक्य नसून तातडीने त्याला सरकारी रुग्णालयात नेण्याचा सल्ला हॉस्पिटल प्रशासनाने दिला. सरकारी रुग्णालयात त्याला नेलं असता तिथल्या डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केलं. या घटनेमुळे कुटुंबीयांना जबर धक्का बसला आहे. पोलिसांना नेमकं काय सांगावं हा प्रश्न कुटुंबीयांना पडला होता. आपल्याच घरातील दोन कर्त्या पुरुषांमध्ये झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू झाल्यामुळे सर्वजणच दुःखात बुडाले आहेत. 

अधिक वाचा - पावसाने महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये घेतली विश्रांती, पण सहा राज्यांवर अस्मानी संकट

पोलीस तपास सुरू

या घटनेनंतर मोठा भाऊ अरविंद गायब आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. सुभाषचा मृतदेह पोलिसांनी रुग्णालयातून थेट पोस्टमॉर्टेमसाठी पाठवून दिला आहे. ज्या दांडक्याने अरविंदने सुभाषच्या डोक्यावर वार केला, ते दांडकं पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या प्रकऱणी लवकरच आरोपीला पकडून न्यायालयासमोर सादर केलं जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांकडून घटनेचा अधिक तपास सुरू असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी