Assembly Elections : निवडणूक आयोगाने राजकीय सभांवरील बंदीचा कार्यकाळ वाढवला, छोटेखानी सभा घेण्यास दिली मुभा

ECI extend ban on political rally निवडणूक आयोगाने राजकीय सभा आणि रोडशोवर असलेली बंदी आणखी एक आठवड्यासाठी वाढवली आहे. कोरोनाचे संकट पुन्हा जोर धरत आहे, अशा वेळी आयोगाने हा निर्णय घेतला आहे. असे असले तरी आयोगाने राजकीय पक्षांना छोटेखानी सभा घेण्यास मुभा दिली आहे. या सभेत ३०० जणांना सामील होण्याची परवानगी देण्यात आली आहे.

थोडं पण कामाचं
  • निवडणूक आयोगाने राजकीय सभा आणि रोडशोवर असलेली बंदी आणखी एक आठवड्यासाठी वाढवली आहे.
  • आयोगाने राजकीय पक्षांना छोटेखानी सभा घेण्यास मुभा दिली आहे.
  • या सभेत ३०० जणांना सामील होण्याची परवानगी देण्यात आली आहे.

Assembly Elections : नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने राजकीय सभा आणि रोडशोवर असलेली बंदी आणखी एक आठवड्यांसाठी वाढवली आहे. कोरोनाचे संकट पुन्हा जोर धरत आहे, अशा वेळी आयोगाने हा निर्णय घेतला आहे. असे असले तरी आयोगाने राजकीय पक्षांना छोटेखानी सभा घेण्यास मुभा दिली आहे. या सभेत ३०० जणांना सामील होण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच या कार्यक्रमांदरम्यान कोरोरोनासंबंधित सर्व नियमांचे पालन करावे असे निर्देश देण्यात आले आहेत. (election commission extend ban on political rally assembly elections for one week)

९ जानेवारी रोजी निवडणूक आयोगाने ५ राज्यातील निवडणुकींची वेळापत्रक जाहीर केले. तसेच १६ नियमांची एक मार्गदर्शक सूचनाही जाहीर केली होती. ही मार्गदर्शक सूचना पूर्वीप्रमाणे लागू असणार आहे. सध्या उत्तर प्रदेशमध्ये भाजप, बसपासह इतर राजकीय पक्षांनी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. 


पाच राज्यातील निवडणुकींमध्ये निवडणूक आयोग राजकीय सभा, सायकल रॅली, बाईक रॅली आणि रोड शोवर १५ जानेवारीनंतरही बंदी कायम ठेवेल असा अंदाज होता. निवडणूक आयोगाने ८ डिसेंबर रोजी उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंड या पाच राज्यातील निवडणूक जाहीर केल्या. कोरोनाचे संकट पाहता आयोगाने १५ जानेवारीपर्यंत राजकीय सभांना बंदी घातली होती, ही बंदी आता २२ जानेवारी पर्यंत वाढवण्यात आली आहे. राजकीय पक्षांचे मोठे सार्वजनिक कार्यक्रमांवर आयोगाने बंदी घातली आहे. आयोगाने रोड शो, राजकीय सभा यांच्यावर बंदी घातली असून ही बंदी आणखी एक आठवड्यासाठी वाढवली आहे. 


राजकीय पक्षांच्या सभा, रॅली आणि रोड शो वर घातलेली बंदी कायम ठेवावी की नाही यावर आज निवडणूक आयोगाची बैठक झाली. ८ जानेवारी रोजी आयोगाने पाच राज्यातील निवडणुकांची घोषणा केली होती. या पाच राज्यात जर राजकीय सभा आणि रॅली झाल्यास कोरोनाचा कहर वाढेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळेच निवडणूक आयोगाने १५ जानेवारीपर्यंत राजकीय सभांना बंदी घातली होती. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयोगाचे अधिकारी, आरोग्य अधिकारी आणि ५ राज्यातील निवडणूक अधिकार्‍यांनी बैठक घेऊन ही बंदी वाढवण्याचा निर्णय घेतला. आरोग्य तज्ज्ञांनी याबद्दल सूचना केली होती. 

निवडणूक आयोगाने ८ जानेवारी १६ नियमांची मार्गदर्शक सूचना जाहीर केली होती. त्यानुसार सार्वजनिक ठिकाणी राजकीय सभांवर बंदी घालण्यात आली होती. तसेच घरोघरी प्रचार करण्यासाठी उमेदवारांसह पाच जणांना परवानगी देण्यात आली होती. निकालाच्या दिवशी विजयी मिरवणूक काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने प्रसार भारतीच्या सल्ल्यानुसार प्रत्येक राजकीय पक्षांना आणि पाच राज्यातील मान्यता मिळलेल्या राजकीय पक्षांना प्रचारासाठीचा दुप्पट वेळ देण्याचा निर्णय घेतला होता. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी