Assembly Election 2021: ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर, पाहा संपूर्ण कार्यक्रम

Assembly Election 2021: केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाने देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. 

Voting
मतदान  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

 • पाच राज्यांतील निवडणुकांचं बिगुल वाजलं
 • तमिळनाडू, पश्चिम बंगाल, केरळ, आसाम आणि पुदुचेरीमध्ये विधानसभा निवडणुका
 • केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत घेत केला निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

नवी दिल्ली : देशातील पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. या राज्यांमध्ये तमिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल, आसाम या राज्यांचा आणि पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशाचा समावेश आहे. या पाचही ठिकाणी होणाऱ्या विधानसभा निवडणूक २०२१ चा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी पत्रकार परिषद घेत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. पश्चिम बंगालमध्ये एकूण ८ टप्प्यांत मतदान प्रक्रिया पर पडणार आहे. आसाममध्ये तीन टप्प्यांत मतदान होणार आहे. केरळ, तमिळनाडू आणि पुदुचेरी येथे एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर पाचही राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल २ मे २०२१ रोजी जाहीर होणार आहेत.

पश्चिम बंगालमध्ये ८ टप्प्यांत मतदान 

 1. पहिल्या टप्प्यातील मतदान - २७ मार्च २०२१
 2. दुसऱ्या टप्प्यातील मतदान - १  एप्रिल २०२१ 
 3. तिसऱ्या टप्प्यातील मतदान - ६ एप्रिल २०२१
 4. चौथ्या टप्प्यातील मतदान - १० एप्रिल २०२१
 5. पाचव्या टप्प्यातील मतदान - १७ एप्रिल २०२१
 6. सहाव्या टप्प्यातील मतदान - २२ एप्रिल २०२१
 7. सातव्या टप्प्यातील मतदान - २६ एप्रिल २०२१
 8. आठव्या टप्प्यातील मतदान - २९ एप्रिल २०२१
 9. मतमोजणी - २ मे २०२१ रोजी होणार

केरळ, तमिळनाडू आणि पुदुचेरीत एकाच टप्प्यात मतदान

 1. केरळ, तमिळनाडू आणि पुदुचेरी या राज्यांत विधानसभेसाठी मतदान हे ६ एप्रिल २०२१ रोजी होणार आहे.
 2. मतमोजणी - २ मे २०२१ रोजी होणार

आसाममध्ये तीन टप्प्यांत मतदान

 1. पहिल्या टप्प्यातील मतदान - २७ मार्च २०२१ 
 2. दुसऱ्या टप्प्यातील मतदान - १ एप्रिल २०२१
 3. तिसऱ्या टप्प्यातील मतदान - ६ एप्रिल २०२१
 4. मतमोजणी - २ मे २०२१ रोजी होणार

निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे

 1. २ मे रोजी पाचही राज्यातील निवडणुकांचे निकाल जाहीर होणार 
 2. पश्चिम बंगालमध्ये ८ टप्प्यांत मतदान होणार
 3. केरळ आणि तमिळनाडूमध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार, ६ एप्रिल रोजी दोन्ही राज्यांत मतदान होणार
 4. आसाममध्ये तीन टप्प्यांत होणार मतदान, पहिल्या टप्प्यात २७ मार्चला मतदान, दुसऱ्या टप्प्यात १ एप्रिल रोजी मतदान आणि ६ एप्रिल रोजी तिसऱ्या टप्प्यात मतदान
 5. पाचही राज्यांत आजपासून आचारसंहिता लागू
 6. सर्व मतदान केंद्र हे तळमजल्यावर असणार 
 7. सीसीटीव्हीच्या देखरेखीखाल मतदान प्रक्रिया होणार 
 8. पाच राज्यांमध्ये एकूण १८ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार, केरळ आणि पुदुचेरी येथील मतदान केंद्रात वाढ करण्यात आली 
 9. सर्व संवेदनशील मतदान केंद्रांवर व्हिडिओ शूटींग होणार 
 10. सर्व निवडणूक अधिकाऱ्यांचं लसीकरण होणार
 11. उमेदवारासह पाच जणांनाच डोअर-टू-डोअर म्हणजेच घरोघरो प्रचारास परवानगी
 12. मतदानाच्या कालावधीत एका तासाने वाढ
 13. कोविड संदर्भातील नियमांचे पालन करुनच मतदान प्रक्रिया होणार 
 14. पश्चिम बंगालमध्ये १०१९१६ मतदान केंद्र, केरळमध्ये ४०७७१ मतदान केंद्र, पुदुचेरीत १५५९ मतदान केंद्र 
 15. या पाच राज्यांत एकूण २.७ लाख मतदान केंद्र तयार करण्यात येणार 
 16. पाचही राज्यांत एकूण १८.६८ कोटी मतदार 
 17. पाच राज्यांत विधानसभेच्या एकूण ८२४ जागांसाठी होणार मतदान 
 18. आमच्या टीमने चार राज्यांचा दौरा केला आणि मतदान केंद्रांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला.

कुठल्या राज्यात विधानसभेच्या किती जागा?

 1. पश्चिम बंगाल - २९४
 2. तमिळनाडू - २३४ 
 3. केरळ - १४० 
 4. आसाम - १२६ 
 5. पुदुचेरी - ३० 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी