ECI By-Election Results 2022 : बिहार, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, छत्तीसगडच्या पोटनिवडणुकांचे निकाल कुठे बघाल?

Election Commission of India (ECI) By Election Results 2022, Bihar, Chhattisgarh, West Bengal, Maharashtra Election Result Live: पश्चिम बंगालमधील आसनसोल लोकसभा मतदारसंघात तसेच पश्चिम बंगालच्या बालीगंज विधानसभा मतदारसंघात, बिहार, महाराष्ट्र आणि छत्तीसगडमधील विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत.

Election Commission of India (ECI) By Election Results 2022, Bihar, Chhattisgarh, West Bengal, Maharashtra Election Result Live
पोटनिवडणुकांचे निकाल कुठे बघाल? 
थोडं पण कामाचं
  • बिहार, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, छत्तीसगडच्या पोटनिवडणुकांचे निकाल कुठे बघाल?
  • निकाल आपण eciresults.nic.in आणि eci.gov.in या वेबसाइटवर बघू शकता
  • निकालांकडे अनेकांचे लक्ष

Election Commission of India (ECI) By Election Results 2022, Bihar, Chhattisgarh, West Bengal, Maharashtra Election Result Live: पश्चिम बंगालमधील आसनसोल लोकसभा मतदारसंघात तसेच पश्चिम बंगालच्या बालीगंज विधानसभा मतदारसंघात, बिहार, महाराष्ट्र आणि छत्तीसगडमधील विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. हे निकाल आपण eciresults.nic.in आणि eci.gov.in या निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर बघू शकता. । Live Blog

आसनसोलसाठी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ६४.०३ टक्के तर बालीगंजसाठी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ४१.१० टक्के मतदान झाले होते. बालीगंजमध्ये तृणमूल काँग्रेसकडून बाबुल सुप्रियो, भाजपकडून केया घोष आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीकडून सायरा शाह हलीम रिंगणात आहेत. काँग्रेसने आसनसोल आणि बालीगंज या दोन्ही पोटनिवडणुकांसाठी उमेदवार उभे केले आहेत. 

छत्तीसगडमधील राजनांदगांव जिल्ह्यातील खैरागड विधानसभा मतदारसंघात मंगळवारी पोटनिवडणुकीसाठी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ७७.८८ टक्के मतदान झाले. या भागात नक्षलवादाचा प्रभाव असूनही मोठ्या प्रमाणावर मतदान झाले. यामुळे निकाल काय लागणार याकडे अनेकांचे लक्ष आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी