Gujarat Election 2022 : या आठवड्यात गुजरात निवडणूक जाहीर होण्याची शक्यता, निवडणूक आयोग करणार घोषणा

Gujarat Election 2022 : या आठवड्यात निवडणूक आयोग गुजरात निवडणुकीच्या ताररखा जाहीर करण्याची शक्यता आहे. 2017 साली हिमाचल प्रदेशची विधानसभा निवडणूक जाहीर झाली होती, तेव्हा गुजरात विधानसभा निवडणूक जाहीर झाली नव्हती. त्याच प्रमाणे या वर्षीही गुजरात विधानसभा निवडणूक जाहीर करण्यात आली नव्हती. 12 नोव्हेंबर पासून हिमाचल प्रदेशमध्ये एका टप्यात निवडणूक होणार आहे

election commission of india
निवडणूक आयोग  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • या आठवड्यात निवडणूक आयोग गुजरात निवडणुकीच्या ताररखा जाहीर करण्याची शक्यता आहे.
  • 2017 साली हिमाचल प्रदेशची विधानसभा निवडणूक जाहीर झाली होती, तेव्हा गुजरात विधानसभा निवडणूक जाहीर झाली नव्हती.
  • त्याच प्रमाणे या वर्षीही गुजरात विधानसभा निवडणूक जाहीर करण्यात आली नव्हती.

Gujarat Election 2022 : नवी दिल्ली: या आठवड्यात निवडणूक आयोग गुजरात निवडणुकीच्या ताररखा जाहीर करण्याची शक्यता आहे. 2017 साली हिमाचल प्रदेशची विधानसभा निवडणूक जाहीर झाली होती, तेव्हा गुजरात विधानसभा निवडणूक जाहीर झाली नव्हती. त्याच प्रमाणे या वर्षीही गुजरात विधानसभा निवडणूक जाहीर करण्यात आली नव्हती. 12 नोव्हेंबर पासून हिमाचल प्रदेशमध्ये एका टप्यात निवडणूक होणार आहे. तर 9 नोव्हेंबर रोजी मतगणना होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर होणार आहे. (election commission of india may announce gujarat election 2022 in this week)

अधिक वाचा : न थांबता 13 हजार 560 किमी उड्डाण करून पक्ष्याचा विश्वविक्रम

हिमाचल प्रदेशची मतमोजणीची तारखेची घोषणा केल्यानंतर एक महिन्यानंतर 8 डिसेंबर रोजी गुजरातमध्ये मतमोजणी होईल असे संकेत निवडणूक आयोगाने दिले होतेल 2017 साली हिमाचल प्रदेश आणि गुजरात राज्याच्या विधानसभा निवडणूकांची घोषणा वेगवेगळ्या तारखेला करण्यात आली होती. परंतु 18 डिसेंबर रोजी दोन्ही राज्यांची मतगणना झाली होती. 

अधिक वाचा : IndiGo Flight: टेक-ऑफ करणाऱ्या विमानाच्या इंजिनला लागली आग, आगीच्या ठिणग्या दिसल्यानंतर इमर्जन्सी लँडिंग

निवडणूक आयोगाच्या वेबसाईटनुसार 1998, 2007 आणि 2012 साली हिमाचल प्रदेश आणि गुजरातमध्ये एकाच वेळी निवडणूका पार पडल्या होत्या. गुजरात राज्यात 182 विधानसभा मतदारसंघ असून या सद्य विधानभेचा कार्यकाल 18 फेब्रुवारी 2023 रोजी समाप्त होणार आहे.

अधिक वाचा : भारताच्या माहिती तंत्रज्ञान कायद्यात होणार मोठा बदल, सोशल मीडिया कंपन्यांना लागू होणार कायदा

गुजरातमध्ये आलेल्या पुरामुळे निवडणूक आयोगाने आधी हिमाचल प्रदेशची विधानसभा निवडणुकीची घोषणा करून गुजरातची विधानसभा निवडणूक जाहीर केली नव्हती.  

अधिक वाचा : Telangana : भाजप नेत्याकडून आमदारांना विकत घेण्याचा प्रयत्न; पोलिसांनी पकडले रंगेहाथ, 100 कोटीहून अधिक रुपये जप्त

2017 साली झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत मोदी शहा यांच्या बालेकिल्ल्यात भाजपला आपल्या शंभरीही गाठता आली नव्हती. या निवडणुकीत भाजपने 99  जागांवर विजय मिळवला होता, तर काँग्रेसने 77 जागांवर विजय मिळवला होता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी