UP & Punjab Election : पाच राज्यातील निवडणुकांच्या तारखा आज होणार जाहीर, निवडणूक आयोगाने दिली महत्वाची माहिती

UP & Punjab Election पाच राज्यातील निवडणुकीच्या तारखा आज जाहीर होणार आहे. निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद घेणार आहे. आयोगाने दिलेल्या माहितीनुसार आज दुपारी साडे तीन वाजता होणार पत्रकार परिषद होणार आहे.

थोडं पण कामाचं
  • पाच राज्यातील निवडणुकीच्या तारखा आज जाहीर होणार आहेत
  • निवडणूक आयोग आज पत्रकार परिषद घेणार आहे.
  • उत्तर प्रदेश विधानसभेचा कार्यकाल मे मध्ये संपणार आहे.

UP & Punjab Election : नवी दिल्ली : पाच राज्यातील निवडणुकीच्या तारखा आज जाहीर होणार आहेत. निवडणूक आयोग आज पत्रकार परिषद घेणार आहे. आयोगाने दिलेल्या माहितीनुसार आज दुपारी साडे तीन वाजता होणार पत्रकार परिषद होणार आहे. उत्तर प्रदेश विधानसभेचा कार्यकाल मे मध्ये संपणार आहे. तर इतर चार राज्यांच्या कार्यकाल मार्च महिन्यात संपणार आहे. 


उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूर आणि पंजाब या पाच राज्यांत निवडणूक होणार आहे. उत्तर प्रदेश आणि पंजाबची निवडणूक सर्वात महत्त्वाची समजली जाते. पंजाबमध्ये काँग्रेसचे तर उत्तर प्रदेशमध्ये भाजपचे सरकार आहे. देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य उत्तर प्रदेशची निवडणूक ही लोकसभा निवडणुकीची सेमी फायनल समजली जाते. म्हणून या निवडणुकीला सर्वाधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. 

कोरोना संकटात निवडणूक

देशात पुन्हा कोरोनाचे संकट वाढत असताना या पाच राज्यांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणीही करण्यात आली होती. तर ही निवडणूक पुढे ढकलण्यात येऊ नये अशी मागणी अनेक राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी केली होती. दोन दिवसांपूर्वी केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण आणि इतर वरिष्ठ अधिकार्‍यांनी निवडणुकीवर चर्चा केली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी