Elon Musk | जगातील उपासमारीचा प्रश्न सोडवण्यासाठी सरसावले मस्क, सहा अब्ज डॉलर युनोला देण्यास तयार

Elon Musk | संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न कार्यक्रमाचे संचालक डेव्हिड बेस्ली यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे की टेस्लाच्या चीफने एकूण संपत्तीपैकी फक्त २ टक्के संपत्ती जगातील उपासमार संपवू शकते. त्यावर मस्क यांनी ते तयार असल्याचे म्हटले आहे.

Global Hunger problem  & Musk
जगातील उपासमारीचा प्रश्न आणि इलॉन मस्क 
थोडं पण कामाचं
  • इलॉन मस्क (Elon Musk) जगातील उपासमारीच्या प्रश्नावर पुढे सरसावले
  • संयुक्त राष्ट्रसंघाच्या एका अधिकाऱ्याने म्हटले होते की इलॉन मस्क यांच्या एकूण संपत्तीच्या (Elon Musk Wealth) फक्त २ टक्के खर्च केल्यास जगातील उपासमारी (Global Hunger problem)संपू शकते
  • जर संयुक्त राष्ट्रसंघाच्या अधिकाऱ्यांनी हे सिद्ध केले की सहा अब्ज डॉलरने जगातील उपासमारी संपू शकेल तर मस्क आपले शेअर विकण्यास तयार

Elon Musk | नवी दिल्ली: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले इलॉन मस्क (Elon Musk) जगातील उपासमारीच्या प्रश्नावर पुढे सरसावले आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाच्या (United Nations) अधिकाऱ्याच्या वक्तव्यावर मस्क यांनी हे उत्तर दिले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या एका अधिकाऱ्याने म्हटले होते की इलॉन मस्क यांच्या एकूण संपत्तीच्या (Elon Musk Wealth) फक्त २ टक्के खर्च केल्यास जगातील उपासमारी (Global Hunger problem)संपू शकते. यावर इलॉन मस्क यांनी म्हटले आहे की जर संयुक्त राष्ट्रसंघ त्यांच्या संपत्तीच्या २ टक्के म्हणजे सहा अब्ज डॉलरचा खर्च कसा केला हे जाहीर करणार असेल आणि त्याची माहिती देणार असेल तर ते तेवढ्या रकमेचे आपले शेअर विकण्यास तयार आहेत. (Elon Musk | Elon Musk said he is ready to solve the world hunger problem by donating 2 % of his wealth) 

मस्क यांचे ट्विट

जगातील उपासमारी संपवण्यासाठी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले इलॉन मस्क पुढे आले आहेत. टेस्लाचे सीईओ असलेले मस्क यांचे म्हणणे आहे की जर संयुक्त राष्ट्रसंघाच्या अधिकाऱ्यांनी हे सिद्ध केले की सहा अब्ज डॉलरने जगातील उपासमारी संपू शकेल तर ते आपले शेअर विकण्यास तयार आहेत. यासंदर्भात मस्क यांनी ट्विटदेखील केले आहे. त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघाचे जागतिक अन्न कार्यक्रमाचे संचालक डेव्हिड बेस्ली यांच्या ट्विटला रिट्विट करत म्हटले आहे की डब्ल्यूएफपी यांनी यासंदर्भात सांगावे की सहा अब्ज डॉलरने जगातील उपासमारी कशी संपेल. त्यांनी हे सांगितल्यास मी लगेचच टेस्लाचे माझे शेअर विकून उपासमारीवर काम करण्यासाठी दान करेन.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या अधिकाऱ्याचे मत

संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न कार्यक्रमाचे संचालक डेव्हिड बेस्ली यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे की टेस्लाच्या चीफने एकूण संपत्तीपैकी फक्त २ टक्के संपत्ती जगातील उपासमार संपवू शकते. त्यांनी म्हटले होते की इलॉन मस्क यांची संपत्ती ३०० अब्ज डॉलरपेक्षा जास्त आहे. तर दुसऱ्या स्थानावर जेफ बेझॉस आहेत. बेझॉस यांच्याकडे १९५ अब्ज डॉलरची संपत्ती आहे. हे दोघे जगातील उपासमार संपवू शकतात. त्यांनी म्हटले की इलॉन मस्क यांच्याकडे ही एक चांगली संधी आहे की ते फक्त दोन टक्के म्हणजे सहा अब्ज डॉलरने जगाची उपासमार संपवू शकतात.

कसे खर्च करणार अब्जावधी डॉलर

डेव्हिड बेस्ली यांनी आपले मत ट्विटदेखील केले आहे. त्यावर रिट्विट करत मस्क म्हणाले की ते आपल्या संपत्तीच्या दोन टक्के म्हणजे सहा अब्ज डॉलर देण्यास तयार आहेत. अर्थात यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या अधिकाऱ्यांना हे सांगावे लागेल की ते इतक्या रकमेने जगातील उपासमार संपवण्यासाठी कशा पद्धतीने खर्च करणार आहेत. युनो या खर्चाची जाहीर माहिती द्यावी ज्यामुळे लोकांना कळेल की पैसे कसे खर्च करण्यात येणार आहेत.

मस्क यांच्या संपत्तीत मोठी वाढ

टेस्लाचे मालक इलॉन मस्क यांच्या संपत्तीत मागील आठवड्यात मोठी वाढ झाली आहे. यानंतर मस्क यांची एकूण संपत्ती तब्बल ३११ अब्ज डॉलरवर पोचली आहे. इतकी संपत्ती असणारे ते जगातील पहिलेच व्यक्ती आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी