Chip implantation in human brain : न्यूयॉर्क : इलॉन मस्क (Elon Musk) यांची न्यूरालिंक (Neuralink)कंपनी ही आधुनिक जगात असणाऱ्या अनेक शक्यतांवर काम करते आहे. मस्कची ही कंपनी ब्रेन-मशीन इंटरफेस म्हणजे मानवी मेंदू आणि चिप म्हणजेच मशीन यांचे संयुग घडवून (chip implant in brain)आणण्यावर काम करते आहे. न्यूरालिंक लवकरच मानवी मेंदूत चिप बसवण्यासंदर्भातील क्लिनिकल चाचण्या सुरू करण्याच्या तयारीत आहे. यामध्ये मानवाच्या मेंदूच्या चिप्सचे रोपण केले जाईल. Dailymail.co.uk च्या मते, कंपनी क्लिनिकल ट्रायल डायरेक्टरची नियुक्ती करत आहे. यानुसार नवा ट्रायल संचालक अतिशय गुणवान आणि नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या डॉक्टर्स आणि इंजिनियर्सबरोबर काम करेल. तसेच न्यूरालिंकच्या पहिल्या क्लिनिकल ट्रायल सहभागींसोबतदेखील काम करेल. (Elon Musk stratup, Neuralink to start clinical trails for chip implant in brain)
न्यूरालिंकने आपल्या क्लिनिकल ट्रायल संचालकासाठी जाहिरात देताना म्हटले आहे की "तुम्ही न्यूरालिंकच्या क्लिनिकल रिसर्च अॅक्टिव्हिटीस कार्यक्षम करण्यासाठी आणि वेगवान आणि सतत विकसित होत असलेल्या वातावरणासह नियामक परस्परसंवाद विकसित करण्यासाठी जबाबदार असलेल्या टीमचे नेतृत्व कराल आणि मदत कराल." २०१७ मध्ये सार्वजनिकपणे लॉन्च केल्यापासून, Neuralink ने डुक्कर आणि माकडांमध्ये मेंदूचे रोपण केले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (Artificial Intelligence) सामर्थ्यावर मात करण्यासाठी मेंदू आणि संगणक यांच्यात थेट कनेक्शन निर्माण करणे हा प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. "शिलाई मशीन सारखे" उपकरण वापरून प्रत्यारोपित मेंदूमध्ये चिप बसवण्यासाठी वापरले जाणार आहे.
मस्क यांनी अलीकडेच सांगितले की न्यूरालिंकचे ब्रेन चिप तंत्रज्ञानामुळे लोकांना त्यांच्या मेंदूमध्ये सहजतेने संगीत प्रवाहित करता येणार आहे. मस्कने अलीकडेच एका ट्विटर युजरसह एका एक्सचेंजवर या वैशिष्ट्याची खातरजमा केली होती. यात युजरने विचारले होते की, "जर आम्ही न्यूरालिंक लागू केले तर - आम्ही आमच्या चिप्समधून थेट संगीत ऐकू शकतो का?" यावर मस्कचे होते, "हो". इलॉन मस्कने हे देखील सांगितले आहे की चिप संप्रेरक पातळी नियंत्रित करण्यास सक्षम असेल, ज्यामध्ये इतर गोष्टींबरोबरच चिंता कमी करण्यात मदत करण्याची क्षमता असेल.
मस्कने अनेकदा कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI)वर जास्त अवलंबून राहणे आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य धोक्यासंदर्भात टीका केली आहे. मस्कने अलीकडेच असा दावा केला आहे की AI कोणत्याही मानवापेक्षा "अत्यंत स्मार्ट" असेल आणि २०२५ पर्यंत आपल्याला मागे टाकेल.
दरम्यान इलॉन मस्क यांनी भारतात टेस्लाचा उत्पादन प्रकल्प सुरू करावा यावरून काही दिवसांपूर्वी वांदग निर्माण झाला होता. तेलंगणानंतर आता महाराष्ट्राने टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांना राज्यात कारखाना सुरू करण्यासाठी आमंत्रित केले होते. महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी रविवारी ट्विटरवर लिहिले होते की, भारतात इलेक्ट्रिक कार तयार करण्यासाठी हे राज्य टेस्लाच्या कारखान्याचे ठिकाण असू शकते. पश्चिम बंगाल सरकारनेही टेस्लाला राज्यात कारखाना सुरू करण्यासाठी आमंत्रित केले आहे.