एलॉन मस्कच्या गर्लफ्रेंडने पाठीवर बनवला 'हा' खास टॅटू, सोशल मीडियावर खळबळ

लोकल ते ग्लोबल
Updated Apr 13, 2021 | 13:51 IST | टाइम्स नाऊ मराठी

एलॉन मस्कची कॅनेडियन गर्लफ्रेंड 'ग्रिम्स'ने आपल्या संपूर्ण पाठीवर जखमांच्या खूणा दाखवणारा खास टॅटू बनवला आहे. तिच्या या विचित्र टॅटूची सोशल मीडियावर जबरदस्त चर्चा सुरू आहे.

Elon Musk's girlfriend shares her alien tattoo
मस्कच्या गर्लफ्रेंडच्या टॅटूवर सोशल मीडियावर खळबळ 

थोडं पण कामाचं

  • मस्कच्या गर्लफ्रेंडचा विचित्र टॅटू
  • एलियनच्या जखमांच्या खुणांचा टॅटू
  • ३ लाख लोकांनी या फोटोला केले लाईक

नवी दिल्ली : टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क सतत कोणत्यातरी कारणामुळे चर्चेत असतात. स्पेस एक्स आणि टेस्लासारख्या जगप्रसिद्ध कंपन्यांचे मालक असलेल्या एलॉन मस्क सध्या आपली गर्लफ्रेंड ग्रिम्स मुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. एलॉन मस्क यांची कॅनेडियन गर्लफ्रेंड ग्रिम्सने आपल्या संपूर्ण पाठीवर जखमांच्या खूणा दाखवणारा विचित्र टॅटू बनवला आहे. तिच्या या टॅटूने सर्व सोशल मीडियाचे लक्ष वेधून घेतले आहे. नेटकऱ्यांनी त्याच्यावर अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

मस्कच्या गर्लफ्रेंडचा विचित्र टॅटू


एलॉन मस्क यांच्या गर्लफ्रेंड असणाऱ्या ग्रिम्सने असा विचित्र टॅटू का बनवला असावा याबद्दल सोशल मीडियावर प्रचंड कुतुहल आहे. ग्रिम्स ही एक गायिक आहे. तिचा हा टॅटू पाहून नेटकऱ्यांनी इंस्टाग्रामवर तिचे कौतुकदेखील केले आहे. ग्रिम्सने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर टॅटू बनवलेला आपला फोटो शेअर केला आहे. मात्र असे करताना तिने आपल्या फोटोची गुणवत्ता चांगली नसल्याचाही उल्लेख केला आहे. आता आपल्याला झोपायचे आहे. काही दिवस हा टॅटू लाल दिसेल नंतर मात्र परग्रहवासियांसारखे सुंदर चट्टे आपल्या पाठीवर दिसतील असेही तिने म्हटले आहे.
या टॅटूचा फोटो टाकताना ग्रिम्सने आपल्या पूर्ण पाठीचा फोटो काढला आहे.

एलियनच्या जखमांच्या खुणांचा टॅटू


गायिका असलेल्या ग्रिम्सच्या फोटोचे चांगलेच कौतुक सोशल मीडियावर होते आहे. या फोटोपेक्षा आणखी चांगला फोटो सध्या आपल्याकडे नाही. मात्र आपल्याला टॅटू बनवल्यानंतर प्रचंड वेदना होत आहेत. त्यामुळे आपल्याला आरामाची गरज आहे. आता आपण झोपणार आहोत, असे तिने इंस्टाग्रामवर टाकलेल्या फोटोखाली म्हटले आहे. आपल्या टॅटूचे नामकरण ग्रिम्सने 'एलियनच्या जखमांच्या खुणा' असे केले आहे.

ग्रिम्सच्या पाठीवरील या एलियन टॅटूमुळे अनेकांनी तिचे कौतुक केले आहे. आतापर्यत जवळपास ३ लाख लोकांनी या फोटोला लाईक केले आहे. आपल्या आणखी एका पोस्टमध्ये ग्रिम्सने म्हटले आहे की मंगळ ग्रहावर मरण्यासाठी आपण तयार आहोत. ग्रिम्स हे वक्तव्य सोशल मीडियावर करण्याचे टायमिंगसुद्धा महत्त्वाचे आहे. सध्या एलॉन मस्क मंगळ ग्रहावर जाण्यासाठी आपल्या स्टारशीप रॉकेटची चाचणी करत आहेत.

ग्रिम्स आणि एलॉन मस्क यांना एक मुलगादेखील आहे. त्याचे नावही विचित्रच आहे. त्या मुलाचे नाव X Æ A-Xii असे आहे. याआधी ग्रिम्सने एका प्रश्नाला उत्तर देताना म्हटले होते की आपण वयाच्या ५० वर्षी मंगळ ग्रहावर जाण्यास तयार आहोत. मंगळ ग्रहावर मानवी वस्ती वसवण्यासाठी मदत व्हावी यासाठी आपण मंगळ ग्रहावर जाण्यास तयार असल्याचे ग्रिम्सने म्हटले होते. ती एक कॅनेडियन गायिका आहे. तिसऱ्या महायुद्धाआधी आपण मंगळ ग्रहावर मानवी वस्ती वसवू असे एलॉन मस्क यांनी जाहीर केले आहे.

मंगळावर मानवी वस्ती


एलॉन मस्क यांची कंपनी स्पेस एक्स ही अंतराळ मोहिमांच्या क्षेत्रात काम करते आहे. सध्या स्पेस एक्स मंगळ ग्रहावर जाण्यासाठी एका रॉकेटची चाचणी करते आहे. मस्क यांचा हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. एलॉन मस्क यांची इच्छा मंगळ ग्रहावर मानवी वस्ती वसवायची आहे. पृथ्वीवरील मानव जातीच्या भवितव्याला धरून त्यांनी काही चिंतादेखील व्यक्त केल्या आहेत.
त्यामुळेच भविष्यात पृथ्वीवर तिसरे महायुद्ध झाल्यास मानव जात नष्ट होण्याची भीती आहे. त्यामुळेच आपण तिसरे महायुद्ध होण्याआधीच मंगळ ग्रहावर मानवी वस्ती वसवू असे मस्क यांनी जाहीर केलेले आहे. मस्क यांच्या या अंतराळ मोहिमेबद्दल आणि मंगळावर मानवी वस्ती वसवण्याच्या प्रकल्पाबद्दल संपूर्ण जगात प्रचंड कुतुहल आहे. मस्क ज्या पद्धतीने पूर्णपणे नाविन्यपूर्ण विचार करतात आणि अनोख्या कल्पना जगासमोर मांडतात त्यामुळे त्यांच्याबद्दल कौतुकयुक्त आदर सर्वत्र व्यक्त केला जातो. 

मस्क यांच्या टेस्लाची घोडदौडसुद्धा जोरात सुरू आहे. टेस्लाच्या शेअरच्या किंमतीत मागील वर्षभरात प्रचंड वाढ झाल्याने एलॉन मस्क यांच्या एकूण संपत्तीत दुपटीपेक्षा जास्त वाढ झाली आहे. त्यामुळे सध्या ते जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी