Elon Musk Bougt Twitter । नवी दिल्ली : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदी करून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. अशातच अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना झटका बसण्याची शक्यता आहे. बायडन यांना असे वाटते की ट्विटर मस्क यांच्या हातात गेल्यावर ट्विटवर चुकीच्या माहितीमध्ये वाढ होऊ शकते. तसेच याचा परिणाम २०२४ च्या अमेरिकेच्या राष्ट्रपदी पदाच्या निवडणुकीतही होऊ शकतो. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प यांना २०२१ मध्ये ट्विटवर बॅन करण्यात आले आहे. बायडेन ट्विटरवर परत येतील अशी भिती बायडन यांना आहे.
अधिक वाचा : आदिवासी भागांत गेल्या तीन वर्षांत १५ हजार बालविवाह
मस्क यांनी मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटर विकत घेण्यासाठी तब्बल ४४ अब्ज डॉलरचा करार केला आहे. याअंतर्गत मस्क यांना ट्विटरच्या प्रत्येक शेअरसाठी $54.20 रूपये द्यावे लागतील. अलीकडेच मस्क हे ९ टक्के भागभांडवल खरेदी करून ट्विटरचे सर्वात मोठे शेअरहोल्डर बनले आहेत. नवीन करारानंतर मस्क यांच्या कंपनीत १०० टक्के भागीदारी असेल आणि ट्विटर ही त्यांची खासगी कंपनी बनेल. त्यामुळे मस्क स्वातंत्र्याच्या नावाखाली मनमानी करतील अशी बायडेन प्रशासनाला भिती आहे.
यापूर्वी मस्क यांनी ट्विटरवर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंदी असल्याची वारंवार तक्रार केली आहे. मात्र ट्विटरच्या विकत घेतल्याच्या करारानंतर त्यांनी एका निवेदनात म्हटले की, "ट्विटर हे एक आधुनिक खुले माध्यम आहे. जिथे माणुसकीच्या भविष्यासाठी महत्त्वाच्या विषयांवर वादविवाद आणि चर्चा होतात. ट्विटरमध्ये अनेक नवे युजर वाढवण्याची क्षमता आहे. नवीन सुविधांसह नव्या संधी तयार करण्याचा आपला मानस असल्याचेही त्यांनी सांगितले.
ट्विटरवरील हालचालींमुळे बायडन प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. त्यामुळे अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आता ट्विटरवर परत येतील का हा सर्वात मोठा प्रश्न आहे. ६ जानेवारी २०२१ रोजी, कॅपिटल हिल्सवर हिंसाचार भडकावण्याबद्दल आणि खोटी माहिती दिल्याबद्दल ट्रम्प यांच्यावर ट्विटरने बंदी घातली होती. या बंदीनंतर ट्रम्प यांनी स्वतःचे प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशल सुरू केले. ट्रम्प यांचा ट्विटवर परतण्याचा कुठलाही विचार नाही असा दावा फॉक्स न्युजने केला आहे.
बायडन प्रशासनातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यानंतर त्यावर चुकीच्या आणि खोट्या माहितीचा भडिमार होऊ शकतो. असे झाल्यास २०२४ च्या अमेरिकन निवडणुकीवर त्याचा परिणाम होईल. कारण सोशल मीडिया हा जगभरातील मतदारांवर प्रभाव टाकण्याचा सर्वात मोठे माध्यम आहे.