दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २५ जून २०१९:  आणीबाणीचे ४४ वर्ष ते बिचुकले बिग बॉसच्या घरात?

लोकल ते ग्लोबल
Updated Jun 25, 2019 | 23:17 IST | टाइम्स नाऊ मराठी

Headlines of the day: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...

top 5 news_latest news_times now marathi
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २५ जून २०१९  |  फोटो सौजन्य: Times Now

मुंबई: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून एक नजर टाकूयात... आजची सर्वांत मोठी बातमी म्हणजे आणीबाणीचे ४४ वर्ष याची.  २५ जून १९७५ ला तात्कालीन इंदिरा गांधी सरकारने देशात आणीबाणी (Emergency) लागू केली होती. त्यानंतरची दुसरी बातमी आहे ती म्हणजे खासदार नवनीत राणा या भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. राणा यांनी अमित शहांची भेट घेतली आहे. तिसरी आजची महत्त्वाची बातमी ही धक्कादायक आहे. आईची हत्या करुन मुलानं आत्महत्या केल्याची घटना मुंबईत घडली आहे. चौथी आज दिवसभरातील बातमी आहे ब्रायन लारा यांच्या संदर्भातली.  ब्रायन लारा मुंबईतील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. पाचवी महत्त्वाची बातमी बिग बॉस मराठीच्या घरातली आहे. बिग बॉस मराठी२ च्या चर्चेत असलेल्या स्पर्धकांपैकी एक म्हणजे अभिजीत बिचुकले लवकरच पुन्हा एकदा घरात प्रवेश करणार असल्याचं समजतंय. या सर्व बातम्यांवर नजर टाकूया. 

  1. आणीबाणीचे ४४ वर्ष पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी आठवला 'आणीबाणी' काळ: आणीबाणी (Emergency)संदर्भात भाजप नेहमी काँग्रेसवर हल्लाबोल करत आला आहे. आज आणीबाणीला ४४ वर्ष झाले आहे. या संदर्भात अनेक नेत्यांनी ट्विट करून याची आठवण करून दिली आहे. बातमी सविस्तर वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा. 
  2. खासदार नवनीत राणा भाजपच्या वाटेवर?, अमित शहांची घेतली भेट: अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी अमित शहा यांची भेट घेतली. त्यामुळे त्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. वाचा सविस्तर बातमी 
  3. आईची हत्या करुन मुलाची आत्महत्या, मुंबईत घडली ही धक्कादायक घटना: मुंबईतील मीरा रोड येथे एका फ्लॅटमध्ये आई आणि मुलाचा मृतदेह आढळून आला आहे. तेथे त्यांच्या लॅपटॉपमध्ये सुसाईड नोट देखील सापडली आहे. बातमी वाचण्यासाठी क्लिक करा. 
  4. ब्रायन लारा मुंबईतील हॉस्पिटलमध्ये दाखल; छातीत दुखू लागल्याची तक्रारः महान क्रिकेटपटू ब्रायन लाराला दुपारी साडे बाराच्या सुमारास छातीत दुखू लागल्यानं तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्याच्यावर सध्या उपचार सुरू असून, अधिक माहिती मिळालेली नाही. बातमी संपूर्ण वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा. 
  5. अभिजीत बिचुकलेची पुन्हा बिग बॉसच्या घरात एन्ट्री?: बिग बॉस मराठी२ च्या चर्चेत असलेल्या स्पर्धकांपैकी एक अभिजीत बिचुकले. याच बिचुकलेला चेक बाऊन्स प्रकरणात अटक झाल्याने एकच खळबळ उडाली. आता बिचुकलेची पुन्हा बिग बॉसमध्ये एन्ट्रीची चर्चा आहे. अधिक बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा. 
     

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २५ जून २०१९:  आणीबाणीचे ४४ वर्ष ते बिचुकले बिग बॉसच्या घरात? Description: Headlines of the day: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles