जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक; तीन दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पुलवामा (Pulwama) जिल्ह्यात रविवारी सुरक्षा दलांशी (security forces) झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी (Terrorist) ठार झाले.

Encounter between militants and security forces at Pulwama
पुलवामामध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील पहू भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक
  • सुरक्षा दलांनी लष्कराच्या ३ दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.
  • दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला.

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पुलवामा (Pulwama) जिल्ह्यात रविवारी सुरक्षा दलांशी (security forces) झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी (Terrorist) ठार झाले. पोलिसांनी सांगितले की, पुलवामाच्या पहू (Pahu) भागात झालेल्या चकमकीत प्रतिबंधित दहशतवादी संघटना लष्करचे 3 दहशतवादी मारले गेले.

काश्मीरचे आयजीपी विजय कुमार म्हणाले की, एसएसपी पुलवामा यांना माहिती मिळाली की पुलवामाच्या पहू गावात लष्कराचे ३ दहशतवादी लपले आहेत. पोलीस आणि सुरक्षा दलांनी परिसराला घेराव घातला. हे सर्व 3 दहशतवादी मारले गेले आहेत. लष्कर/टीआरएफच्या एका वरिष्ठ कमांडरची ओळख आरिफ अशी झाली आहे, ज्याचे सांकेतिक नाव रिहान आहे.

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील पहू भागात दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली. ते म्हणाले की, दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. यानंतर सुरक्षा दलांच्या प्रत्युत्तरादाखल कारवाईने चकमक सुरू झाली. या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी