कुलगाम: An encounter has started between security forces and Terrorists: जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) कुलगाम (Kulgam District) जिल्ह्यातील काठपोरा भागात आज सकाळपासून सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये (Security Forces And Terrorists) चकमक (Encounter) सुरू झाली आहे. या भागात 2 ते 3 दहशतवादी लपल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. लष्कर आणि पोलिसांनी (Jammu and Kashmir Police) दहशतवाद्यांना घेरलं आहे. कुलगाममध्ये (Kulgam) दहशतवाद्यांसोबत चकमक सुरू असल्याची माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिली आहे.
या कारवाईत लष्कर आणि पोलीस दोन्ही एकत्र आहेत. 24 जुलै रोजी कुलगामच्या रामपोरा भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. काही दिवसांपूर्वी लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेत दोन तरूण सामील झाले होते. त्या तरूणांच्या पालकांनी भावनिक आवाहन केलं. त्यानंतर जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दलांसमोर त्यांनी आत्मसमर्पण केलं होतं.
Jammu & Kashmir | An encounter is underway in Brayihard Kathpora area of Kulgam. Police & security forces are carrying out the operation. — ANI (@ANI) July 27, 2022
(Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/MMDMzlJFgp
लष्कर-ए-तैयबामध्ये सामील झाले होते दोन तरूण
15 दिवसांपूर्वी नदीम अब्बास भट (18) आणि काफिल मीर (19) हे लष्कर-ए-तैयबामध्ये सामील झाले होते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नदीम अब्बास भट हा कैमोहमधील राशीपुरा येथील रहिवासी होता आणि काफिल मीर हा मीरपुराचा रहिवासी होता. गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत पोलीस आणि लष्कराने कुलगाम जिल्ह्यातील हदीगाम भागात दोन दहशतवादी लपल्याचा संशय व्यक्त केला होता. मध्यरात्री काही काळ ही चकमक चालली आणि सुरक्षा दलांनी त्या घराजवळ नाकाबंदी केली. यादरम्यान या दोन दहशतवाद्यांची नवीन भरती करण्यात आल्याचं समोर आलं. यानंतर पालकांना बोलावून त्यांना आवाहन करण्यात आले, त्यानंतर दोघांनीही आत्मसमर्पण केलं.
अधिक वाचा- एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, खास शब्दात केलं Tweet
मीडिया रिपोर्ट्सनुसार, जानेवारी ते 23 जुलैपर्यंत खोऱ्यात सुरक्षा दल आणि दहशतवादांमध्ये झालेल्या चकमकीत 118 दहशतवादी मारले गेले आहेत. यामध्ये 32 विदेशी दहशतवाद्यांचा समावेश आहे. IGP काश्मीरच्या म्हणण्यानुसार, 118 पैकी 77 दहशतवादी लष्कर-ए-तैयबाचे सदस्य होते. 26 दहशतवादी जैश-ए-मोहम्मदचे होते.
ऑपरेशन ऑल आऊटने दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले
राज्यसभेत लेखी उत्तर देताना केंद्रीय गृह राज्य मंत्री नित्यानंद राय म्हणाले की, ठार झालेल्या 118 नागरिकांपैकी पाच काश्मिरी पंडित आणि 16 हिंदू-शीख समुदायाचे होते. जम्मू-काश्मीरमधून दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी लष्कर ऑपरेशन ऑलआऊट राबवत आहे. या कारवाईमुळे दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले आहे.
अलिकडच्या वर्षांत दहशतवादी संघटनांचे प्रमुख कमांडर चकमकीत मारले गेले आहेत. खोऱ्यातील दहशतवादाच्या घटनांमध्येही घट झाली आहे. 2018 मध्ये 417 दहशतवादी घटना घडल्या होत्या, तर 2021 मध्ये त्या 229 इतक्यावर आल्या.