Jammu & Kashmir: पुलवामामध्ये जवानांना यश, दोन दहशतवाद्यांचा खात्मा तर १ जवान शहीद

लोकल ते ग्लोबल
Updated May 16, 2019 | 08:34 IST | टाइम्स नाऊ मराठी

जम्मू- काश्मीरच्या पुलवामामध्ये गुरूवारी सकाळी सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. सध्या परिसरात सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे. 

Dalipora(Pulwama) encounter
पुलवामामध्ये दोन दहशतवादी ठार, एक जवान शहीद  |  फोटो सौजन्य: ANI

श्रीनगरः जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवादी आणि सुरक्षा दलात चकमक झाली आहे. ही चकमक पुलवामाच्या दलीपोरा या भागात सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या चकमकीत जवानांना यश आलं आहे. या चकमकीदरम्यान दोन दहशतवादी ठार झाले आहेत. या भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानंतर जवानांनी या संपूर्ण परिसराला वेढ घातला आणि सर्च ऑपरेशन सुरू केलं. याचवेळी दहशतवाद्यांनी गोळीबार करण्यास सुरूवात केली.  सुरक्षा दलानं देखील दहशतवाद्यांना चांगलंच प्रत्त्युतर दिलं. दरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं. तर एक जवान शहीद झाला आहे. तर अद्यापही चकमक सुरू असल्याची माहिती मिळत आहे.  मीडिया रिपोर्ट्सनुसार, सध्या पुलवामामध्ये कर्फ्यू लावण्यात आला आहे. तर संपूर्ण परिसरातील इंटरनेट सेवा ही बंद करण्यात आली आहे. 

बुधवारी पुँछ  भागात नियंत्रण रेषेवरजवळ एक लँडमाइन टनलमध्ये स्फोट झाल्यानं एक जवान जखमी झाला होता. तर याआधी गेल्या रविवारी काश्मीरमधील शोपियांमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. त्यावेळी दोन दहशतवादी ठार झाले होते. मारले गेलेले दहशतवादी हे लष्कर-ए-तोयबा या संघटनेचे होते अशी माहिती मिळाली आहे. गेल्या महिन्यात अनंतनागमध्ये ही झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार केलं होतं. 

१४ फेब्रुवारी २०१९ ला झालेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. १४ फेब्रुवारीच्या दहशतवादी हल्ल्यात भारताचे ४० जवान शहीद झाले होते. त्यानंतर देशात संतापाची लाट उसळली होती. सध्या पुलवामा आणि आजुबाजूच्या परिसरात जवानांच्या मोठा फौजफाटा तैनात असतो. 

दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील बिजबेहरा येथे ही चकमक झाली. येथील बागेंदर मोहल्ला या परिसरात दहशतवादी लपल्याची सूचना सुरक्षा दलांना मिळाली होती. ज्यानंतर सुरक्षा दलांनी तात्काळ या परिसराला घेराव घातला. तसेच दहशतवाद्यांना शरण येण्याचं आवाहनही केलं. पण दुसऱ्या बाजूने दहशतवाद्यांनी थेट अंदाधुंद गोळीबार सुरू केला. त्यामुळे सुरक्षा दलांनीही या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलं.

गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये सतत दहशतवादी कारवाया सुरू आहेत. अशावेळी सुरक्षा दलांनी देखील दहशतवाद्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कंबर कसली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Jammu & Kashmir: पुलवामामध्ये जवानांना यश, दोन दहशतवाद्यांचा खात्मा तर १ जवान शहीद Description: जम्मू- काश्मीरच्या पुलवामामध्ये गुरूवारी सकाळी सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. सध्या परिसरात सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे. 
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles