Encounter Live Video: पंतप्रधानांच्या कार्यक्रमावर हल्ला करण्याचा डाव, सुरक्षा दलाने दहशतवाद्याला पळवून-पळवून मारलं

जम्मूमधील (Jammu News) सुंजवानमधील (Sunjwan) जलालाबाद (Jalalabad) भागात शुक्रवारी सकाळी सुरक्षा दलाने दोन्ही दहशतवाद्यांचा (Terrorists) खात्मा केला. दोघेही जैश-ए-मोहम्मद संघटनेशी (Jaish-e-Mohammed organization) संबंधित होते. दहशतवादी (Terrorist) हल्ल्यात एक जवान शहीद झाला आणि 10 जण जखमी झाले.

Encounter Live Video
Encounter : सुरक्षा दलाने दहशतवाद्याला पळवून-पळवून मारलं   |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सांबा दौऱ्याच्या दोन दिवसांपूर्वी ही चकमक घडली.
  • शुक्रवारी सकाळी साधारण साडेचार वाजता दहशतवाद्यांनी चट्टा कँम्पजवळ सीआयएसएफच्या बसवर अचानक ग्रेनेडने हल्ला केला.
  • केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचा एक सहाय्यक उप निरीक्षक शहीद झाला.

श्रीनगर : जम्मूमधील (Jammu News) सुंजवानमधील (Sunjwan) जलालाबाद (Jalalabad) भागात शुक्रवारी सकाळी सुरक्षा दलाने दोन्ही दहशतवाद्यांचा (Terrorists) खात्मा केला. दोघेही जैश-ए-मोहम्मद संघटनेशी (Jaish-e-Mohammed organization) संबंधित होते. दहशतवादी (Terrorist) हल्ल्यात एक जवान शहीद झाला आणि 10 जण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी जम्मू मेडिकल कॉलेजमध्ये (Jammu Medical College) घेऊन जाण्यात आलं होतं.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सांबा दौऱ्याच्या दोन दिवसांपूर्वी ही चकमक घडली. या घटनेचा एक व्हिडीओदेखील समोर आला आहे. यात दहशतवादी पळत असून त्याच्या मागून सुरक्षा दलाकडून फायरिंग सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवादी 24 एप्रिल रोजी सांबाच्या पल्ली पंचायतमध्ये होणाऱ्या पंतप्रधानांच्या कार्यक्रमावर हल्ला करण्याच्या तयारीत होते. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी साधारण साडेचार वाजता दहशतवाद्यांनी चट्टा कँम्पजवळ सीआयएसएफच्या बसवर अचानक ग्रेनेडने हल्ला केला. बसमध्ये 15 सीआयएसएफचे जवान होते. या हल्ल्यानंतर तातडीने दोन्ही दहशतवादी लपवले. यानंतर सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चमकम झाली. 5 तासांनंतर दोन्ही दहशतवाद्यांना मारण्यात आलं. ( लोकमत 18 या वृत्तसंस्थेनं या चकमकीचा व्हिडिओ शेअर केला आहे.)

डीजीपी दिलबाह सिंहने सांगितलं की, पोलीस आणि अर्धसैनिक दलाच्या संयुक्त टीमने दोन्ही दहशतवाद्यांना मारलं. पोलीस आणि अर्धसैनिक दलाच्या संयुक्त टीमने दोन्ही दहशतवाद्यांना मारलं. या चकमकीत केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचा एक सहाय्यक उप निरीक्षक शहीद झाला. जम्मू-काश्मीर पोलीस कर्मचाऱ्यांसह अन्य सुरक्षा दलांचे जवान या चकमकीत जखमी झाले आहे. डीजीपी दिलबाह सिंहने सांगितलं की, यात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचा एक सहाय्यक उप निरीक्षक शहीद झाला. जम्मू-काश्मीर पोलीस कर्मचाऱ्यांसह अन्य सुरक्षा दलांचे जवान या चकमकीत जखमी झाले आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी