Europe Heatwave: उकळणारा युरोप, 3 दशकातील सर्वाधिक उष्णतेने होरपळला युरोप, ग्लोबल वार्मिंगचा रुद्रावतार

Environment : जगाच्या अनेक भागात हवामान बदलाचे (Climate Change) विपरित परिणाम दिसू लागले आहेत. जगातील तापमानात चांगलीच वाढ होताना दिसते आहे. खासकरून अनेक भागातील सरासरी तापमान वाढले आहे. एका अभ्यासातून समोर आलेल्या माहितीनुसार संपूर्ण जगात ग्लोबल वॉर्मिंगचा (Global Warming)सर्वाधिक फटका युरोपला बसला आहे. युरोपमध्ये भीषण उष्णता, जंगलातील आग, पूर आणि इतर नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण वाढतच चालले आहे. द स्टेट ऑफ द क्लायमेट इन युरोप अहवालात या सर्व परिणामांची चर्चा करण्यात आली आहे.

Climate Change
हवामान बदल 
थोडं पण कामाचं
  • जगभर ग्लोबल वार्मिंगचे संकट
  • युरोप प्रचंड उष्णतेच्या तडाख्यात
  • युरोपमधील हिमनद्या वितळल्या

Global warming effect on Europe : नवी दिल्ली : पर्यावरण, हवामान बदल हे प्रश्न सध्या ऐरणीवर आले आहेत. या गंभीर समस्येने जगभर आपला प्रभाव टाकण्यास सुरूवात केली आहे. जगाच्या अनेक भागात हवामान बदलाचे (Climate Change) विपरित परिणाम दिसू लागले आहेत. जगातील तापमानात चांगलीच वाढ होताना दिसते आहे. खासकरून अनेक भागातील सरासरी तापमान वाढले आहे. एका अभ्यासातून समोर आलेल्या माहितीनुसार संपूर्ण जगात ग्लोबल वॉर्मिंगचा (Global Warming)सर्वाधिक फटका युरोपला बसला आहे. जागतिक हवामान संघटनेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात असे म्हटले आहे की, गेल्या तीन दशकांत युरोपमध्ये (Europe) जगातील इतर भागांपेक्षा जास्त तापमान वाढले आहे. तापमानवाढीचा हा वेग दुप्पट आहे. यंदा तर युरोप अक्षरश: होरपळून निघाला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार युरोपचे तापमान झपाट्याने वाढते आहे. (Europe faces huge heat wave amid global warming)

अधिक वाचा : Crop insurance 509 दिवसांपासून सुरु असलेल्या पिकविम्याच्या लढाईला अखेर यश, शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसेही होतायेत जमा

हवामान बदलाच्या विपरित परिणामांमुळे युरोपला मोठा फटका बसला आहे. याचा परिणाम होत युरोपमध्ये भीषण उष्णता, जंगलातील आग, पूर आणि इतर नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण वाढतच चालले आहे. द स्टेट ऑफ द क्लायमेट इन युरोप अहवालात  या सर्व परिणामांची चर्चा करण्यात आली आहे. हा अहवाल युरोपियन युनियनच्या कोपर्निकस क्लायमेट चेंज सर्व्हिससोबत संयुक्तपणे तयार करण्यात आले आहे.

अल्पाइन हिमनद्या वेगाने वितळतायेत

हवामान बदलाबाबत समोर आलेल्या अभ्यासात ग्लोबल वॉर्मिंगमुळे युरोपमधील तापमान वाढत असून या खंडात तीव्र उष्णता जाणवणार असल्याचे म्हटले आहे. याचा परिणाम होत ब्रिटनमध्ये उष्णतेची लाट आली होती. हे भविष्यातही पाहायला मिळेल. तसेच, अल्पाइन हिमनद्यांचे वितळणे वेगवान होऊ शकते. हवामान बदलामुळे भूमध्य समुद्राचे पाणीही गरम होत आहे. तज्ज्ञांच्या मते युरोप जगाच्या तापमानवाढीच्या संदर्भातील गंभीर स्वरुप जिवंतपणे दाखवतो आहे.

अधिक वाचा : शिंदे गटाच्या आमदार आणि खासदारांना Y+ सुरक्षा, अमृता फडणवीसांनाही एस्कॉर्टची सुविधा

युरोपचे बदलते हवामान

तज्ज्ञ जो मांडणी करत आहेत त्यात हवामान बदलाच्या कहरातून युरोपसारखा प्रगत खंडदेखील सुटू शकत नाही. प्रगत राष्ट्रांनादेखील ही समस्या हाताळणे अवघड झाले आहे. 2021 प्रमाणे या वर्षी देखील युरोपच्या अनेक भागांमध्ये दुष्काळ, तीव्र उष्णतेची लाट आणि जंगलात आग लागण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. तर 2021च्या आठवणी काढता युरोपच्या अनेक भागांमध्ये पूर आला होता. या सर्व घटनांमध्ये जीवितहानदेखील मोठ्या प्रमाणात झाी  होती. 

अधिक वाचा : Nashik: शिवशाही पेटली, नाशिकध्ये पुन्हा बर्निंग बसचा थरार; 45 प्रवासी बचावले

युरोपातील हवामान बदलामुळे ग्लोबल वॉर्मिंगचा सर्वात मोठा परिणाम पर्वतरांगांच्या हिमनद्यांवर दिसून येत आहे. 1997 ते 2021 या काळात या हिमनद्यांची बर्फाची जाडी 30 मीटरने कमी झाली आहे. ग्रीनलँडचा बर्फही झपाट्याने वितळतो आहे. बर्फ वितळून नद्यांमध्ये आलेले पाणी मोठ्या प्रमाणात समुद्रात जात असल्यामुळे युरोपच्या अवतीभोवतीच्या समुद्राची पातळीही वाढते आहे. 

हवामान बदलाच्या या महासंकटासंदर्भात जगभरातून जोरदार पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी