नवी दिल्ली: Europe Heatwave: संपूर्ण युरोप उष्णतेचा सामना करतोय. विमानतळावरील रनवेवर (Railway Tracks) उष्णतेच्या ज्वाळा जाणवत आहेत. तर रेल्वे ट्रॅक रिकामी झाले आहेत. रस्त्यावर भीषण शांतता पसरली आहे. या भीषण गरमीमुळे स्पेन आणि पोर्तुगालमध्ये मृतांचा आकडा 1700 च्या जवळ जाऊन पोहोचला आहे. त्याचदरम्यान सोशल मीडियावर रेल्वेच्या सिग्नलाच एक फोटो व्हायरल होत आहे. यात फोटोत कडक उन्हामुळे हा सिग्नल वितळल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र या फोटोमागचं सत्य काही वेगळंच असल्याचं समजतंय.
खरंतर, रेल्वे सिग्नलचा हा फोटो ब्रिटनमधल्या बेडफोर्डशायरमधल्या सँडी शहराचा आहे. व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये वितळलेला सिग्नल दिसू शकतो. मात्र घटनास्थळीवरील आणखी एक फोटो असून त्यात आग लागल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे कडक उन्हामुळे सिग्नल वितळले असून रेल्वे ट्रॅकवरही परिणाम झालेला दिसतोय.
अधिक वाचा- National Herald Case: अखेर तो दिवस आला, आज दिल्लीत काँग्रेस नेते उतरणार रस्त्यावर
फ्रान्स, पोर्तुगाल, स्पेन, ग्रीसला उष्णतेचा फटका
केवळ ब्रिटनच नाही तर फ्रान्स, पोर्तुगाल, स्पेन, ग्रीससह सर्व युरोपीय देशात भीषण उष्णता आहे. बहुतेक लोक घरून काम करत आहेत. ब्रिटनच्या हवामान खात्याने एक-दोन दिवसांत पारा 41 अंशांच्या पुढे जाईल असा इशारा दिला आहे. वाढत्या उन्हामुळे जंगलात आग लागण्याच्या घटनाही वाढल्या आहेत.
📢 Check before you travel by rail today! — Network Rail (@networkrail) July 20, 2022
Journeys will take much longer than usual while we continue repairs caused by the #heatwave.
Buckled rail, fires and sagging overhead line equipment are just some of the problems impacting the railway.@nationalrailenq #heatwaveuk pic.twitter.com/ZjRacHqPtU
लंडनच्या काही भागातल्या जंगलात लागलेल्या आगीत अनेक घरं जळून खाक झाली आहेत. बहुतेक देशांमध्ये तापमान 40 अंशांच्या पुढे गेले आहे. यापूर्वी 2019 मध्ये सर्वाधिक तापमान 39.1 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं होतं. दरम्यान आताही पारा त्याच्या वर जाण्याची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. कार्बन उत्सर्जन कमी झालं नाही तर परिस्थिती आणखी बिकट होईल, असा दावा तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे. ब्रिटनमध्ये उष्णतेमुळे तिथली वाहतूक व्यवस्था बिघडल्यानं परिस्थिती बिकट झालेली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ब्रिटनमधील रस्त्यांवरील डांबर वितळण्यास सुरूवात झाली आहे. ल्युटन विमानतळावरील रनवेचा रस्ताही वितळला आहे. त्याचबरोबर रेल्वे रुळालाही वाढत्या तापमानाचा तडाखा बसत आहे. यूकेमधील लोकांना रेल्वेनं प्रवास न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. परिवहन मंत्री ग्रँट शॅप्स यांच्या म्हणण्यानुसार, आपल्या देशाचे रेल्वे नेटवर्क ही तीव्र उष्णता सहन करू शकत नाही. अपग्रेड व्हायला वर्षे लागतील. तापमानात वाढ झाल्यामुळे ट्रॅकचे तापमान 50 अंश, 60 अंश आणि अगदी 70 अंशांपर्यंत पोहोचते. त्यामुळे रुळ वितळण्याची शक्यता आहे आणि ट्रेन रुळावरून घसरण्याचा धोका अधिक आहे.