Ban on Petrol-Diesel Car : मोठा निर्णय! युरोपात 2035 नंतर पेट्रोल-डिझेल गाड्यांवर बंदी

Climate Change : युरोपने पेट्रोल आणि डिझेल वाहनांवरच (Petrol-Diesel car)बंदी घालण्याचे ठरवले आहे. युरोपियन युनियनने हा निर्णय घेतला आहे. युरोपियन संसद आणि युरोपियन युनियन (EU) च्या सदस्य राष्ट्रांनी 2035 पर्यंत नवीन पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या कार आणि व्हॅनच्या विक्रीवर बंदी घालण्यासाठी (EU bans Petrol-Diesel car) करार केला आहे. जगभरात मागील काही दशकात पर्यावरणाला हानी पोचवणाऱ्या वायूंच्या उत्सर्जनात वाढ झाली आहे. यांना हरितगृह वायू म्हणतात.

Climate Change
हवामान बदल 
थोडं पण कामाचं
  • जगभरात प्रदूषणात वाढ
  • हवामान बदलांसंदर्भात सर्वत्र चिंता
  • युरोपने पेट्रोल आणि डिझेल वाहनांवर बंदीचा निर्णय घेतला

Europe bans Petrol-Diesel Car : नवी दिल्ली :  जगभर सध्या प्रदूषण, हवामान बदल (Climate Change) यांची जोरात चर्चा सुरू आहे. त्यावर काय उपाययोजना करायच्या याबाबत खल सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून मागील काही वर्षात इलेक्ट्रिक वाहनांवर (Electric vehicle) सर्वत्र भर दिला जातो आहे. आता यावर पुढचे पाऊल टाकत युरोपने पेट्रोल आणि डिझेल वाहनांवरच (Petrol-Diesel car)बंदी घालण्याचे ठरवले आहे. युरोपियन युनियनने हा निर्णय घेतला आहे. युरोपियन संसद आणि युरोपियन युनियन (EU) च्या सदस्य राष्ट्रांनी 2035 पर्यंत नवीन पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या कार आणि व्हॅनच्या विक्रीवर बंदी घालण्यासाठी (EU bans Petrol-Diesel car)  करार केला आहे. गुरुवारी रात्री हा करार झाला. ग्लोबल वार्मिंगला कारणीभूत ठरणाऱ्या वायूंचे उत्सर्जन कमी करण्यासाठी आणि प्रदूषणाला आळा घालण्यासाटी युरोपियन युनियनने हे पाऊल उचलले आहे. प्रदूषण कमी करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी युरोपियन कमिशनने स्थापन केलेल्या 'फिट फॉर 55' पॅकेजचा या दशकातील हा पहिला करार आहे. (European Union decided to ban petrol-diesel vehicles)

अधिक वाचा: IAS टीना डाबी होणार महाराष्ट्राची सून; 'कबुल' अमान्य झाल्यानंतर 'सावधान' म्हणत मराठी अधिकाऱ्यासोबत घेणार सातफेरे

हरितगृह वायू उत्सर्जनाचे संकट

जगभरात मागील काही दशकात पर्यावरणाला हानी पोचवणाऱ्या वायूंच्या उत्सर्जनात वाढ झाली आहे. यांना हरितगृह वायू म्हणतात. खास करून गेल्या तीन दशकांत हरितगृह वायू उत्सर्जनात वाढ झाली आहे. यावर भूमिका घेताना युरोपियन संसदेने म्हटले आहे की हा करार संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल शिखर परिषदेपूर्वी स्पष्ट चिन्ह आहे की युरोपियन युनियन त्याच्या हवामान कायद्यात निर्धारित केलेल्या अधिक महत्त्वाकांक्षी उद्दिष्टांपर्यंत पोहोचण्यासाठी 
ठोस पावले उचलण्याची आणि कायदे करण्याची आवश्यकता आहे. युरोपियन युनियनच्या आकडेवारीनुसार वाहतूक हे एकमेव क्षेत्र आहे जिथे गेल्या तीन दशकांमध्ये हरितगृह वायू उत्सर्जन वाढले आहे. विशेष करून 1990 ते 2019 दरम्यान वाहतूक उत्सर्जन 33.5 टक्क्यांनी वाढले आहे.

अधिक वाचा: UPSC Result : देशात पहिली आलेल्या श्रुती शर्माला 54.57% गुण, युपीएससी 2021च्या निकालाची गुणांची यादी upsc.gov.in वर जाहीर

वाहनांमुळे प्रदूषणाचा प्रश्न

मागील काही वर्षात जगभरातच वाहनांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. ही वाहने प्रदूषण वाढवत आहेत. युरोपमधील तर रस्ते वाहतुकीतून एकूण CO उत्सर्जनांपैकी 61 टक्के वाटा प्रवासी कारचा आहे. त्यामुळेच युरोपियन संसदेने हे धाडसी पाऊल उचलले आहे. पर्यावरण समितीचे प्रमुख पास्कल कॅनफिन यांच्या मते, हा एक ऐतिहासिक निर्णय आहे. कारण 2025, 2030 आणि 2035 मध्ये लक्ष्यांसह स्वच्छ शून्य-कार्बन उत्सर्जन मार्गाची व्याख्या प्रथमच केली आहे. हे 2050 पर्यंत हवामान चांगले बनवण्याच्या आमच्या ध्येयाशी अधोरेखित आहे.

अधिक वाचा: UPSC Exam पास झाल्याचा आनंद गगनात मावेना, सत्य बाब समजताच कुटुंबाने मागितली माफी; जाणून काय आहे हा प्रकार

युरोपातील व्याजदर

तुमच्या माहितीसाठी युरोपियन सेंट्रल बँकेने (ECB) वाढत चाललेल्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी व्याजदरात आणखी एक मोठी वाढ केली आहे. फ्रँकफर्टमधील 25 सदस्यीय प्रशासकीय परिषदेने एका बैठकीत मागील महिन्यातील विक्रमी वाढीच्या अनुषंगाने मुख्य व्याजदरात 0.75 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला. अमेरिकेत आधीच व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे जगातील प्रमुख केंद्रीय बँकांनी महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी व्याजदर वाढवण्याचा मार्ग स्वीकारला आहे. ईसीबीचे म्हणणे आहे की महागाई खूप जास्त आहे आणि त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. ईसीबीने अवघ्या तीन महिन्यांत व्याजदरात 2 टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे युरोपवरील आर्थिक संकट वाढत चालले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी