People Leaving Indian Citizenship : नवी दिल्ली : गेल्या काही वर्षांत भारतीय नागरिकांचा (Indians) परदेशी नागरिकत्व (Foreign Citizenship) घेण्याचा कल खूप वाढला आहे. चांगली शिक्षण व्यवस्था आणि चांगल्या नोकरीच्या शोधात परदेशात गेलेल्या बहुतेकांनी आता तिथले नागरिकत्व घ्यायला सुरुवात केली आहे. सरकारी आकडेवारीनुसार दरवर्षी सुमारे 1 लाख लोक भारत सोडून (Indians leaving India) इतर देशांचे नागरिकत्व घेत आहेत. काही महिन्यांपूर्वीच देशाचे गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना भारतीय नागरिकांनी परदेशी नागरिकत्व घेतल्याची आकडेवारी मांडली होती, ती खरोखरच धक्कादायक होती. (Every year more than 1 lakh Indians are leaving Indian citizenship)
अधिक वाचा : Shivsena : निवडणूक आयोगाच्या आदेशाविरोधात शिवसेनेची सर्वोच्च न्यायालयात धाव, शिंदे गटावर केले आरोप
2015 मध्ये 1,41,000 लोकांनी परदेशी नागरिकत्व घेतले होते. तर 2016 मध्ये ही संख्या 144,000 च्या पुढे गेली होती. 2019 पर्यंत ही संख्या वाढतच गेली. 2020 मध्ये कोरोनामुळे हा आकडा थोडासा खाली आला असला तरी 2021 पासून हा आकडा पुन्हा 100000 च्या जवळपास गेला. म्हणजेच दररोज 350 हून अधिक भारतीयांना परदेशी नागरिकत्व घेत आहेत.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, चांगले शिक्षण, चांगल्या करिअरची हमी आणि आर्थिक समृद्धीच्या शोधात भारतीय परदेशात जात आहेत आणि तिथले नागरिकत्व घेऊन तिथे स्थायिक होत आहेत. भारतातील मोठ्या प्रमाणात नोकर्या गमावणे, चांगल्या शिक्षण व्यवस्थेचा अभाव आणि छोट्या-मोठ्या व्यावसायिकांसाठी व्यावसायिक वातावरणाचा अभाव ही स्थलांतराची सर्वात मोठी कारणे असल्याचे अनेक शोधनिबंधांमधून समोर आले आहे.
2017 ते 2021 दरम्यान, 42% भारतीय लोकसंख्येने अमेरिका ही पहिली पसंती असल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे, कॅनडा दुसऱ्या क्रमांकावर आहे. कॅनडात गेल्या 5 वर्षात 91,000 भारतीय लोकांनी नागरिकत्व मिळवले आहे. ऑस्ट्रेलिया 86,000 लोकांसह तिसऱ्या स्थानावर आहे. तर 66,000 लोकांसह इंग्लंड आणि 23,000 लोकांसह इटली अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहे.
मागील काही वर्षांपासून भारतीयांकडून परदेशात स्थलांतरित होण्याच्या मुद्द्याची जोरदार चर्चा सुरू आहे. नोकरी, व्यवसाय, शिक्षण, संधी यासारख्या विविध कारणांमुळे भारतीय नागरिक परदेशात स्थलांतरित होत तेथील नागरिकत्व घेत आहेत. त्यातही विकसित देशांमध्ये स्थलांतरित होणाऱ्या भारतीयांची संख्या सर्वाधिक आहे. आयटी क्षेत्रामुळे आणि शिक्षणामुळे अमेरिका ही भारतीयांची मागील काही दशकांपासूनची पहिली पसंती आहे. एरवीदेखील आयटीमधील नोकऱ्यांमुळे काही वर्षांसाठी कामानिमित्त अमेरिकेत जाणाऱ्या भारतीयांची संख्या मोठी आहे. अर्थात भारतीयांनी परदेशात स्थलांतरित होण्याचे प्रमाण वाढले आहे. मागील काही वर्षात दरवर्षी ही संख्या वाढताना दिसते आहे. त्यामुळे अलीकडच्या काळात विविध अहवालांमधून यावर चिंता व्यक्त करण्यात येते आहे. विशेष म्हणजे परदेशात जाणारे बहुतांश भारतीय हे उच्च आर्थिक वर्गातील आणि उच्च शिक्षित आहेत.