Gujarat Election 2022 : हार्दिक पटेलला गुजरात निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी, माजी मुख्यमंत्री रुपाणी यांचे कापले तिकीट

Gujarat Election 2022 : गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपने माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचे तिकीट कापले असून काँग्रेसमधून भाजपमध्ये सामील झालेल्या हार्दिक पटेलला उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपने क्रिकेटपटू रवींद्र जाडेजाची पत्नी रिवाबा जाडेजा यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

hardik patel bjp candidate
हार्दिक पटेलला गुजरात निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे.
  • भाजपने माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचे तिकीट कापले.
  • काँग्रेसमधून भाजपमध्ये सामील झालेल्या हार्दिक पटेलला उमेदवारी जाहीर केली आहे.

Gujarat Election 2022 : नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपने माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचे तिकीट कापले असून काँग्रेसमधून भाजपमध्ये सामील झालेल्या हार्दिक पटेलला उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपने क्रिकेटपटू रवींद्र जाडेजाची पत्नी रिवाबा जाडेजा यांना उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपने गुरूवारी 160 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यापैकी सात उमेदवार हे काँग्रेसचे माजी आमदार आहेत. त्यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे. (ex congress leader hardik patel will contest gujarat election 2022 on bjp ticket)

अधिक वाचा : Earthquake:देशात भूकंपाचे धक्के, दिल्ली-यूपीसह 7 राज्यांमध्ये हादरे; नेपाळमध्ये 6 जणांचा मृत्यू

नुकतंच मोरबी पुलाचा अपघात झाल्यानंतर मोरबी विधानसभेचे विद्यामान आमदारांचे तिकीट कापले आहे. मोरबी विधानसभा मतदारसंघातून कांतिलाल अमृतिया यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मोरबीची दुर्घटना झाल्यानंतर अमृतिया यांनी नदीत उडी मारून अनेकांचे प्राण वाचवले होते. 

अधिक वाचा :  Maharashtra Breaking news 09 November 2022 Latest Update: संजय राऊत यांना जामीन मंजूर

माजी मुख्यमंत्र्यांचे तिकीट कापले

मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना घाटलोडिया विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. गेल्या 27 वर्षांत सत्तेत असलेल्या अनेक आमदारांचे तिकीट पक्षाने कापले आहे. त्यात माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही समावेश आहे. परंतु रुपाणीसह अनेक वरिष्ठ नेत्यांनी स्वतःहून निवडणूक न लढवण्यास नकार दिला असे सांगण्यात येत आहे. 

अधिक वाचा :  एक वेळ डोळे दान करता येतील पण विकासाची दृष्टी नाही: नितीन गडकरी


भाजपने क्रिकेटपटून रवींद्र जाडेजाची पत्नी रिवाबा जाडेजा यांना उमेदवारी जाहीर केली आहे. रिवाबा जाडेजा 2019 साली भाजपमध्ये सामील झाल्या होत्या. काँग्रेसमधून भाजपमध्ये सामील झालेल्या 7 विद्यमान आमदारांनाही भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे. त्यात प्रद्युम्न जडेजा आणि अश्विन कोतवाल यांचा समावेश आहे. गुजरात काँग्रेसचे माजी कार्यकारी अध्यक्ष  हार्दिक पटेल यांनाही भाजपने उमेदवारी जाहीर केले. वयोमर्यादेमुळे 2017 साली पटेल यांना निवडणूक लढवता आली नव्हती. तेव्हा पटेल यांचे वय २५ वर्षे होते. गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यात 89 जागांवर 1 डिसेंबर रोजी मतदार होणार आहे. तर 5 डिसेंबर रोजी उर्वरित 93 जागांवर मतदान होणार आहे. 8 डिसेंबर मतमोजणी आणि निकाल जाहीर होणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी