Pinaka-ER 'पिनाका'च्या सुधारीत आवृत्तीची यशस्वी चाचणी

Extended Range Pinaka (Pinaka-ER) Multi Barrel Rocket Launcher System successfully tested at Pokhran Range पिनाका मल्टी बॅरल रॉकेट लाँचरच्या सुधारीत आवृत्तीची यशस्वी चाचणी झाली. ही चाचणी राजस्थानमध्ये पोखरण येथे घेण्यात आली.

Extended Range Pinaka (Pinaka-ER) Multi Barrel Rocket Launcher System successfully tested at Pokhran Range
Pinaka-ER 'पिनाका'च्या सुधारीत आवृत्तीची यशस्वी चाचणी 
थोडं पण कामाचं
  • Pinaka-ER 'पिनाका'च्या सुधारीत आवृत्तीची यशस्वी चाचणी
  • चाचणी राजस्थानमध्ये पोखरण येथे घेण्यात आली
  • संरक्षण क्षेत्रातील बदलत्या आव्हानांचा विचार करुन पिनाका मल्टी बॅरल रॉकेट लाँचरची सुधारीत आवृत्ती विकसित केली

Extended Range Pinaka (Pinaka-ER) Multi Barrel Rocket Launcher System successfully tested at Pokhran Range पोखरण (राजस्थान): पिनाका मल्टी बॅरल रॉकेट लाँचरच्या सुधारीत आवृत्तीची यशस्वी चाचणी झाली. ही चाचणी राजस्थानमध्ये पोखरण येथे घेण्यात आली. डीआरडीओच्या अखत्यारीत असलेल्या प्रयोगशाळांनी आधी पिनाका मल्टी बॅरल रॉकेट लाँचर आणि आता पिनाका मल्टी बॅरल रॉकेट लाँचरची सुधारीत आवृत्ती विकसित केली आहे. 

संरक्षण क्षेत्रातील बदलत्या आव्हानांचा विचार करुन पिनाका मल्टी बॅरल रॉकेट लाँचरची सुधारीत आवृत्ती विकसित करण्यात आली आहे. भारतीय भूदलाच्या तोफदळ विभागात अनेक वर्षांपासून पिनाका मल्टी बॅरल रॉकेट लाँचर कार्यरत आहे. लवकरच तोफदळ विभागात पिनाका मल्टी बॅरल रॉकेट लाँचरची सुधारीत आवृत्ती पण कार्यरत होईल. 

मूळ पिनाका मल्टी बॅरल रॉकेट लाँचरमध्ये बारा बॅरल आहेत. प्रत्येक बॅरलसाठी सहा या प्रमाणे एका पिनाका मल्टी बॅरल रॉकेट लाँचर बॅटरीसाठी ७२ रॉकेटची व्यवस्था असते. शत्रूची वाहने, बंकर, नियंत्रण कक्ष, शस्त्रांचे गोदाम यांना लक्ष्य करण्यासाठी पिनाका रॉकेट वापरली जातात. संगणकीकृत यंत्रणा लक्ष्य निश्चित करुन ते नष्ट करण्यासाठी रॉकेट प्रक्षेपित करते. पिनाकामध्ये ४० किमी आणि ६५ किमी पर्यंत लक्ष्यभेद करण्यास सक्षम रॉकेट आहेत. पिनाकाची १२० किमी पल्ल्याची आवृत्ती विकसित करण्याचे काम सुरू आहे. यशस्वी चाचणी केलेल्या सुधारीत आवृत्तीतील रॉकेटच्या पल्ल्याविषयी अद्याप सविस्तर माहिती हाती आलेली नाही.

याआधी जून २०२१ मध्ये पिनाकाच्या सुधारीत आवृत्तीची ओडिशातील चांदीपूर येथे यशस्वी चाचणी झाली होती. चांदीपूरमधील चाचणीसाठी १२२ मिमी.ची २५ रॉकेट वेगवेगळ्या पल्ल्याची लक्ष्य निश्चित करुन डागण्यात आली होती. या चाचणीसाठी वापरलेली सर्व रॉकेट ४५ किमी पल्ल्यापर्यंत लक्ष्यभेद करण्यास सक्षम असल्याचे जाहीर करण्यात आले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी