Rare Black Diamond पृथ्वीवर सापडत नाही हा दुर्मिळ आणि मौल्यवान हिरा, तुमच्याकडे क्रिप्टोकरन्सी असेल तर विकत घेऊ शकता हा ‘काळा हिरा’

हिर्‍याची बाजारात अनन्यसाधारण किंमत आहे. कोहिनूरपासून आपण अनेक हिर्‍यांबद्द्ल ऐकले आहे, परंतु एक असा हिरा आहे जो पृथ्वीवर सापडत नाही. तसेच बाजारात या हिर्‍याची किंमत कोट्यवधी रुपयांच्या घरात आहे.

rare black diamond
काळा हिरा  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • हिर्‍याची बाजारात अनन्यसाधारण किंमत आहे.
  • परंतु एक असा हिरा आहे जो पृथ्वीवर सापडत नाही.
  • या हिर्‍याची बाजारात कोट्यवधी रुपये किंमत आहे.

Rare Black Diamond  : नवी दिल्ली : हिर्‍याची बाजारात अनन्यसाधारण किंमत आहे. कोहिनूरपासून आपण अनेक हिर्‍यांबद्द्ल ऐकले आहे, परंतु एक असा हिरा आहे जो पृथ्वीवर सापडत नाही. तसेच बाजारात या हिर्‍याची किंमत कोट्यवधी रुपयांच्या घरात आहे. हा हिरा सध्या दुबईत असून त्याला काळा हिरा म्हणजेच ब्लॅक डायमंड म्हणतात. हा हिरा पृथ्वीवरचा नसून दुसर्‍याच ग्रहावरचा आहे. (extremely rare black diamond named Enigma will auction in london)

लंडनमध्ये होणार लिलाव

मौल्यवान वस्तूंचा लिलाव करणारी कंपनी Sotheby's Dubai ने सोमवारी दुबईत हा हिरा पत्रकारांना दाखवला होता. या हिर्‍याला The Enigma असे नाव ठेवण्यात आले आहे. हा हिरा ५५५.५५५ कॅरेटचा काळा हिरा आहे. हा हिरा सध्या दुबईत आहे. हा हिरा नंतर अमेरिकेच्या लॉस एंजलिसमध्ये आणला जाणार आहे, त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात लंडनमध्ये या हिर्‍याचा लिलाव होणार आहे. 


फक्त या दोन ठिकाणी मिळतो हिरा

या काळ्या हिर्‍याला Carbonado ही म्हटले जाते. असा हिरा अतिशय दुर्मिळ समजला जातो. हा हिरा ब्राझील आणि मध्य आफ्रिकेत आढळतो. हा हिर्‍यात कार्बन आयसोटोप्स आणि हाय हायड्रोजन असतं, त्यामुळे हा हिरा परग्रहावरील असल्यचा दावा केला जातो. किंवा Meteorites नावाची उल्का पृथ्वीपवर पडल्यानंतर हा हिरा बनतो असेही सांगण्यात येत आहे.

कोट्यवधी रुपयांच्या घरात किंमत

या हिर्‍याला लंडनमध्ये ५० लाख ब्रिटिश पाऊंड एवढी किंमत मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ५० लाख पाऊंड म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये ५० कोटी रुपये इतके होतात. क्रिप्टोकरन्सीमध्येही व्यवहार करण्यात विक्रेत्यांचा विचार आहे. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी