Facebook: फेसबुकला विकावे लागू शकते Whatsapp आणि Instagram; जाणून घ्या कारण

लोकल ते ग्लोबल
Updated Jan 14, 2022 | 18:22 IST | टाइम्स नाऊ मराठी

Whatsapp And Instagram | फेसबुकची मूळ कंपनी मेटा सध्या अडचणीत सापडली आहे. मेटा मक्तेदारी करत असल्याचा आरोप अमेरिकन एजन्सी एफटीसीने केला आहे. त्यामुळे त्यांनी व्हॉट्सअप्प आणि इंस्टाग्रामला विकले पाहिजे. अशी मागणी केली आहे. कोर्टाकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर आता एफटीसी फेसबुकला कोर्टात खेचणार आहे.

Facebook may have to sell Whatsapp and Instagram Know the reason
फेसबुकला विकावे लागू शकते Whatsapp आणि Instagram  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • अमेरिकेतील जिल्हा न्यायाधीश जेम्स बॉसबर्ग यांनी म्हटले की एफटीसीकडे पुरेसे पुरावे आहेत की सोशल नेटवर्किंगमध्ये मेटाची मक्तेदारी आहे.
  • एफटीसी न्यायलयीन लढाई जिंकल्यास मेटाला इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप्प विकावे लागेल.
  • फेडरल ट्रेड कमिशन ही अमेरिका सरकारची स्वतंत्र एजन्सी आहे.

Whatsapp And Instagram | नवी दिल्ली : फेसबुकची मूळ कंपनी मेटा सध्या अडचणीत सापडली आहे. मेटा मक्तेदारी करत असल्याचा आरोप अमेरिकन एजन्सी एफटीसीने (FTC) केला आहे. त्यामुळे त्यांनी व्हॉट्सॲप्प आणि इंस्टाग्रामला विकले पाहिजे. अशी मागणी केली आहे. कोर्टाकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर आता एफटीसी फेसबुकला कोर्टात खेचणार आहे. फेसबुकने अलीकडेच आपल्या नावात बदल करून मेटा असे केले आहे. मात्र आता मेटाला आपल्या दोन प्रसिध्द ॲप्स व्हॉट्सअप्प आणि इंस्टाग्रामला (Whatsapp And Instagram) विकावे लागणार का या बाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. अमेरिकन सोशल मीडिया दिग्गज मेटा म्हणजेच पूर्वीचे फेसबुक मोठ्या कालावधीपासून विश्वासघाताच्या आरोपांना सामोरे जात आहे. इतर छोट्या कंपन्यांना जगण्याची संधी सोडत नसल्याचा आरोप कंपनीवर होत आहे. कंपनीवर अमेरिकेतील सोशल मीडियाची जागा व्यापल्याचा आरोप देखील केला जात आहे. (Facebook may have to sell Whatsapp and Instagram Know the reason). 

फेसबुक स्पर्धा वाढू देत नाही

दरम्यान, फेसबुकवर आपली स्पर्धा वाढू देत नाही, असे आरोपही झाले आहेत. फेसबुकला कोणीतरी त्याला स्पर्धा देत असल्याचे दिसले, तर ते कोणत्याही प्रकारे स्वतःमध्ये विलीन करते किंवा त्यांना योग्य जागा देत नाही. या सर्व कारणांमुळे मेटा कंपनीचे सीईओ मार्क झुकेरबर्ग (Mark Zuckerberg) यांना अनेकवेळा अमेरिकेच्या लोकसभेत बोलावून त्यांची चौकशी करून त्यांच्यावर आरोप करण्यात आले.

FTC ला कोर्टाची मिळाली मंजुरी

अमेरिकन एजन्सी  फेडरल ट्रेड कमिशन (FTC) ने एंटी ट्रस्ट प्रकरणात मोठा विजय मिळवला आहे. आता एफटीसी मेटा कंपनीला कोर्टाची पायरी चढण्यास भाग पाडू शकते. एफटीसीला वाटते की मेटाने आपली दोन लोकप्रिय ॲप्सची विक्री करावी. एफटीसी अमेरिकन सरकारची एक स्वतंत्र एजन्सी आहे जी ग्राहकांच्या हिताचे रक्षण करते. फेडरल ट्रेड कमिशनने (FTC) मेटावर विश्वासविरोधी उल्लंघनाचा आरोप केला होता आणि तेच प्रकरण अजूनही चालू आहे. या प्रकरणात, एका फेडरल न्यायाधीशाने एफटीसीला विश्वासविरोधी उल्लंघनासाठी मेटाला न्यायालयात खेचण्याची परवानगी दिली आहे.

लक्षणीय बाब म्हणजे गेल्या वर्षी, एफटीसीने कथित विश्वासविरोधी उल्लंघनासाठी फेसबुकला (Facebook) आव्हान दिले होते, परंतु नंतर तपशीलांच्या अभावामुळे न्यायालयाने एफटीसीचा युक्तिवाद नाकारला होता. मात्र आता पुन्हा एकदा एफटीसीने गुन्हा दाखल केला असून यावेळी एफटीसीला यश मिळाले आहे. माहितीनुसार, यावेळी एफटीसीने मेटाविरूध्द अनेक पुरावे गोळा केले आहेत. हे पुरावे सादर करण्यापूर्वी एकत्र केले आहेत की सोशल नेटवर्किंगमध्ये फेसबुकची मक्तेदारी निर्माण होत आहे.

यावेळी FTC ने चांगला अभ्यास केला आहे - न्यायाधीश

अमेरिकेतील जिल्हा न्यायाधीश जेम्स बॉसबर्ग यांनी म्हटले की एफटीसीकडे पुरेसे पुरावे आहेत की सोशल नेटवर्किंगमध्ये मेटाची मक्तेदारी आहे. मागच्या वेळी एफटीसीने हे सिध्द करण्यासाठी कोणताही ठोस पुरावा सादर केला नव्हता. फेडरल ट्रेड कमिशनने (FTC) फेसबुकवर अविश्वासासाठी खटला दाखल केला होता. एफटीसीचे म्हणणे आहे की मेटा ही मक्तेदारी आहे. त्यामुळे ते व्हॉट्सॲप आणि इन्स्टाग्रामला विकले पाहिजे. जिल्हा न्यायाधीश जेम्स बॉसबर्ग म्हणाले की, एफटीसीकडे मागील वेळी पेक्षा यावेळी फेसबुकच्या विरोधात जास्त डेटा आहे. त्यांनी लिहिले की एफटीसीने यावेळी कॉमस्कोर (ComScore) मधील डेटा देखील वापरला आहे. त्यामुळे हे दर्शविते की २०१६ पासून मेटाच्या डेलीच्या सक्रिय युजर्सपैकी त्यामध्ये ७०% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. न्यायमूर्तींनी असेही म्हटले आहे की थोडक्यात, एफटीसीने यावेळी आपला अभ्यास चांगला केला आहे. अर्थात मेटा आपली दोन मोठी ॲप्स व्हॉट्सॲप आणि इन्स्टाग्राम कोणालाही विकण्यास तयार होणार नाही. म्हणूनच हा एफटीसीचा खटला फेटाळण्यासाठी मेटाने कोर्टात अर्ज केला होता. मात्र यावेळी न्यायालयाने फेसबुकचाच अर्ज फेटाळून लावला आहे.

पुढचा रस्ता सोपा नाही...

मेटाचा युक्तिवाद फेटाळून लावत न्यायमूर्तींनी आता एफटीसीला हिरवा सिग्नल दिला असला तरी हा मार्ग एफटीसीसाठी सोपा नाही. अहवालानुसार, न्यायाधीशांनी हे देखील निदर्शनास आणले आहे की एफटीसीसाठी आगामी लढाई सोपी नसणार आहे. लक्षणीय बाब म्हणजे २०१२ मध्ये जेव्हा फेसबुकने इंस्टाग्रामला १ अब्ज डॉलर्समध्ये विकत घेतले, तेव्हा ते फक्त एफटीसीने मंजूर केले होते. याच्यानंतर व्हॉट्सॲप विकत घेतले आणि त्यासाठी देखील एफटीसीने या खरेदीला मान्यता दिली होती. 

FTC अध्यक्ष लीना खान यांचा मोठा विजय

फेडरल ट्रेड कमिशन (FTC) ही अमेरिका सरकारची स्वतंत्र एजन्सी आहे. या एजन्सीचे मुख्य काम ग्राहकांच्या हिताचे रक्षण करणे आणि नागरी अविश्वास कायद्याचे रक्षण करणे आहे. अलीकडेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांनी लीना खान यांची एफटीसी प्रमुख म्हणून निवड केली आहे. लीना खान या एफटीसीच्या चेअरमन आहेत. त्याचे वय ३२ वर्षे आहे. लीना खान यांना अँटी ट्रस्टच्या बाबतीत खूप कडक मानले जाते. लीना खान यांच्यासाठी न्यायाधीशांचा निर्णय खूप महत्त्वाचा मानला जात आहे आणि हा निर्णय त्यांच्यासाठी एका मोठ्या विजयासारखा आहे. मात्र पुढचा रस्ता सोपा नसणार आहे, कारण आता त्यांना फेसबुकविरूध्द आणखी पुरावे गोळा करावे लागतील. 

फेसबुकने काय म्हटले?

लक्षणीय बाब म्हणजे कोर्टाच्या निर्णयानंतर फेसबुकने देखील आनंद व्यक्त केला आहे. मात्र, फेसबुकचा आनंद म्हणजे न्यायाधीशांनी एफटीसीचे काही युक्तिवादही फेटाळले आहेत. यात असाही एक युक्तिवाद होता की फेसबुक आपल्या स्पर्धेसाठी पुरेसा डेटा ॲक्सेस देत नाही. मात्र प्रत्युत्तरात हे धोरण २०१८ मध्येच बदलण्यात आल्याचा फेसबुकने दावा केला आहे. फेसबुकच्या प्रवक्त्याने एका निवेदनात म्हटले की, "आम्हाला खात्री आहे की या एफटीसीच्या दाव्याची कमकुवतता लवकरच उघड होईल. इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲपमधील आमच्या गुंतवणुकीमुळेच आम्ही आज इथे आहोत. ते स्पर्धेसाठी तसेच व्यवसाय आणि लोकांसाठी चांगले आहेत." 

दरम्यान, लीना खान यांसाठी मात्र पुढचा रस्ता खडतर आहे. न्यायालयातील हा लढा दीर्घकाळ चालेल अशी अपेक्षा आहे. परंतु एफटीसी जिंकल्यास मेटाला इंस्टाग्राम (Instagram) आणि व्हॉट्सअप्प (WhatsApp) विकावे लागेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी