O Mitron : नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणाची सुरूवात मित्रो म्हणून करतात. काँग्रेस खासदार शशी थरून यांनी मोदींवर या मित्रो शब्दावरून टीका केली आहे. ओमिक्रॉनपेक्षा ओ मित्रो जास्त घातक आहे असे थरूर यांनी म्हटले आहे.
थरूर यांनी ट्विट करून म्हटले आहे की, ओ मित्रोमुळे भारतीय संविधान धोक्यात आले आहे. देशात धार्मिक ध्रुवीकरण वाढले असून द्वेष वाढला आहे. या ओ मित्रोंपेक्षा घातक व्हायरस असू शकत नाही असेही थरूर म्हणाले आहेत.
Far more dangerous than #Omicron is “O Mitron”! We are measuring the consequences of the latter every day in increased polarisation, promotion of hatred & bigotry, insidious assaults on the Constitution & the weakening of our democracy. There is no “milder variant” of this virus. — Shashi Tharoor (@ShashiTharoor) January 31, 2022
काँग्रेसने पेगासवरून भाजपला धारेवर धरले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजपला घेरण्यासाठी काँग्रेसने तयारी केली आहे. या पार्श्वभूमीवर थरूर यांनी ट्विट केले आहे. काँग्रे पेगाससवरून चांगलीच आक्रमक झाली आहे. नुकतंच न्युयॉर्क टाईम्सने एक वृत्त प्रसारित केले असून मोदी सरकाराने इस्राईलकडून पेगासस विकत घेतल्याचा गौप्यस्फोट केला आहे. हा व्यवहार झाला तेव्हा खुद्द मोदी इस्राईलमध्ये होते अशी न्युयॉर्क टाईम्समध्ये म्हटले आहे.
गेल्या काही दिवासांपासून शशी थरूर यांनी भाजप आणि नेत्यांवर टीका केली आहे. यापूर्वी थरूर यांनी उत्तर प्रदेश निवडणुकीवरून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली होती. थरूर यांनी भाजपच्या हिंदू मुस्लिम मुद्द्यावर टीका केली होती. थरूर यांनी ट्विट करून म्हटले होते की, तुम्ही देशाचे किती नुकसान केले आहे हे तुम्हाला माहित नाही. देशाचे रुपांतर स्मशानात केले आहे, गंगा जमुना तहजीब संस्कृतीचा अपमान केल आहे. हिंदु मुस्लिम मध्ये फूट पाडल्याचेही थरुर यांनी म्हटले आहे.