गुवाहाटी : आसामच्या डिब्रूगढ जिल्ह्यात पोलिसांनी तीन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून सेक्स रॅकेटचा भंडाफोड केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी 4 जणांना अटक केली आहे. बाबू अली, हेमंत गोगोई, नाझीम अहमद आणि फरीदा बेगम अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दिब्रूगड पोलिसांनीही चार मुलींची सुटका केली आहे. (farida begum sex racket busted 4 arrested)
डिब्रूगढचे एसपी श्वेतांक मिश्रा म्हणाले की, सेक्स रॅकेटची माहिती मिळाल्यानंतर आम्ही गांधी नगर, आलोकपथ आणि नलीपूल भागात छापा टाकला आणि चार मुलींची सुटका केली. फरीदा बेगम ही नाझीम अहमदची आई आहे आणि दोघेही अनेक वर्षांपासून त्यांच्या भाड्याच्या घरातून बेकायदेशीर वेश्याव्यवसाय चालवत आहेत. "
डिब्रूगड एसपी पुढे म्हणाले की, बेकायदेशीर वेश्या व्यवसायात सहभागी असलेल्या अनेक टोळ्या जिल्ह्यात सक्रिय आहेत. डिब्रूगढचे एसपी श्वेतांक मिश्रा म्हणाले, "या टोळ्यांचे एजंट तरुण महाविद्यालयीन मुलींना लक्ष्य करतात, त्यांना वेश्या व्यवसायात अडकवतात आणि त्यांचे लैंगिक शोषण करतात."