देशभरात शेतकऱ्यांचं रेल रोको आंदोलन सुरू; सायंकाळी ४ वाजेपर्यंत अडवल्या जातील रेल्वे

तीन कृषी कायद्यांविरोधात (Three agricultural laws) चालू असलेल्या शेतकरी आंदोलनात (Farmer Movement) संयुक्त शेतकरी मोर्चाने (Sayukta kisan Morcha )आज देशभरात रेल रोको आंदोलन सुरू केले आहे.

Farmers' Rail Roko  movement started across the country
देशभरात शेतकऱ्यांचं रेल रोको आंदोलन सुरू  |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • सकाळी १० वाजेापासून ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत हे आंदोनल केले जाणार.
  • वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळी ठिकाणी ही आंदोलने केले जातील. - राकेश टिकैत
  • हरियाणाच्या बहादूरगडमध्ये आंदोलक रेल्वे ट्रॅकवर बसले

नवी दिल्ली  :  तीन कृषी कायद्यांविरोधात (Three agricultural laws) चालू असलेल्या शेतकरी आंदोलनात (Farmer Movement) संयुक्त शेतकरी मोर्चाने (Sayukta kisan Morcha )आज देशभरात रेल रोको आंदोलन सुरू केले आहे. सकाळी १० वाजेापासून सायंकाळी ४ वाजेपर्यंत हे आंदोनल केले जाणार असून आंदोलनकर्ते ४ वाजेपर्यंत रेल्वे रुळावर बसून राहणार आहेत.

आजच्या रेल रोको आंदोलनासाठी शेतकरी संघटनांनी आधीच घोषणा केली असली तरी रविवारी रोहतकमध्ये शेतकरी नेते गुरमन सिंह चाडुनी म्हणाले की, सर्व शेतकरी बांधव स्थानकांजवळ जाऊन गाड्या थांबवतील. ते म्हणाले की, तीनही कृषी कायदे रद्द करावे, एमएसपीवर पिके खरेदीची हमी देणारा कायदा आणि लखीमपूर खेरी हत्या प्रकरणात गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या अटकेच्या मागणीसाठी रेल्वे रोको आंदोलन पुकारले जात आहे. ते यशस्वी करण्यासाठी सर्व ठिकाणच्या शेतकऱ्यांनी पुढे आले पाहिजे.

शेतकरी संघटनांच्या रेल रोको आंदोलनावर, राकेश टिकैत म्हणाले, 'वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळी ठिकाणी ही आंदोलने केले जातील. देशभरातील लोकांना माहित आहे की आम्हाला ट्रेन कुठे थांबवायची आहे. भारत सरकार अजून आमच्याशी बोलले नाही'.

दरम्यान, रेल रोको आंदोलन बंद करण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाच्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर सोनीपत जंक्शन रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. तर हरियाणाच्या बहादूरगडमध्ये आंदोलक रेल्वे ट्रॅकवर बसले आहेत. शेतकरी संघटनेने 'रेल रोको आंदोलन' पुकारल्यानंतर अमृतसरच्या देवी दासपुरा गावातील आंदोलक शेतकरी रेल्वे ट्रॅकवर धरणे आंदोलनावर बसले आहेत.

लखनौ पोलिसांनी सांगितले, "शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या रेल रोको आंदोलनात सहभागी झालेल्या लोकांवर पोलीस कारवाई करतील. जिल्ह्यात सीआरपीसी चे कलम -144 लागू करण्यात आले आहे,

रेल्वे रोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे विभाग सतर्क

आंदोलनामुळे रेल्वे प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. विशेषतः, त्याचा परिणाम उत्तर रेल्वेच्या भागात दिसून येतो. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे भारतीय रेल्वेने अनेक गाड्या रद्द केल्या आहेत. याशिवाय काही गाड्यांचे मार्ग वळवण्यात आले आहेत.


ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी