Farooq Abdullah Resigns: फारुख अब्दुल्ला नॅशनल कॉन्फरन्सचा अध्यक्षपदावरून होणार पायउतार, सांगितलं गंभीर कारण

फारुख अब्दुल्ला हे आता 85 वर्षांचे आहेत. ते पक्षाच्या अध्यक्षपदावरून पायउतार होतील आणि इतरांकडे ही जबाबदारी सोपवतील, असा अंदाज गेल्या काही महिन्यांपासून लावला जात होता. स्वतः फारुख अब्दुल्ला यांनी देखील अनेकदा असे संकेत दिले होते. अखेर त्यांनी याची औपचारिक घोषणा केली असून त्यांचे पुत्र उमर अब्दुल्ला हे नॅशनल कॉन्फरन्सचे नवे अध्यक्ष होतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Farooq Abdullah Resigns
फारुख अब्दुल्ला सोडणार ‘नॅशनल कॉन्फरन्स’चे अध्यक्षपद  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • ‘नॅशनल कॉन्फरन्स’च्या अध्यक्षपदावरून फारुख अब्दुल्ला होणार पायउतार
  • वयोमानानुसार जबाबदारीतून मुक्त होण्याचा निर्धार
  • नव्या पिढीकडे सोपवणार अध्यक्षपदाची जबाबदारी

Farooq Abdullah Resigns: जम्मू काश्मीरचे (Jammu Kashmir) माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला (Ex Cm Farooq Abdullah) यांनी नॅशनल कॉन्फरन्स (National Conference) च्या अध्यक्षपदावरून (President) पायउतार होण्याची घोषणा केली आहे. वयोमानानुसार आता नव्या पिढीवर ही जबाबदारी सोपवण्याची वेळ आली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. फारुख अब्दुल्ला हे आता 85 वर्षांचे आहेत. ते पक्षाच्या अध्यक्षपदावरून पायउतार होतील आणि इतरांकडे ही जबाबदारी सोपवतील, असा अंदाज गेल्या काही महिन्यांपासून लावला जात होता. स्वतः फारुख अब्दुल्ला यांनी देखील अनेकदा असे संकेत दिले होते. अखेर त्यांनी याची औपचारिक घोषणा केली असून त्यांचे पुत्र उमर अब्दुल्ला हे नॅशनल कॉन्फरन्सचे नवे अध्यक्ष होतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

काय म्हणाले फारुख अब्दुल्ला?

यानंतर पक्षाच्या अध्यक्षपदासाठी ची निवडणूक आपण लढणार नाही, असं फारुख अब्दुल्ला यांनी जाहीर केलं. राजकारणात एका वयानंतर निवृत्त होणे योग्य ठरतं. प्रत्येकाला निसर्ग नियमानुसार काही शारीरिक मर्यादा असतात. एका विशिष्ट वयानंतर नव्या पिढीवर जबाबदारी सोपवणे, हाच शहाणपणा असतो. गेली सहा दशके जम्मू-काश्मीरच्या राजकारणात सक्रिय राहिल्यानंतर पक्षाच्या अध्यक्षपदावरून पायउतार होऊन नव्याने निवडणूक न लढवण्याचा निर्धार आपण केला असल्याचं फारूक अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.

अधिक वाचा - Thieves Study: चोरी करण्यापूर्वी चोर घर कसे निवडतात माहित आहे? चोर लक्षात घेतात हे मुद्दे

अशी असेल निवडणूक प्रक्रिया

नॅशनल कॉन्फरन्सच्या अध्यक्षपदाची निवडणूक कोणीही लढू शकतो. पक्षाचा सदस्य असणाऱ्या कुठल्याही उमेदवाराला या पदासाठी निवडणूक लढविण्याचा पूर्ण अधिकार असल्याचं फारूक अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे. ही एक लोकशाही प्रक्रिया असून त्याला पात्र असणाऱ्या प्रत्येकाला समान संधी मिळत असल्याचेही ते म्हणाले. फारूक अब्दुल्ला हे 1983 मध्ये नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष झाले होते. काश्मीर खोऱ्यातील सर्वात जुना पक्ष असणाऱ्या 'नॅशनल कॉन्फरन्स'ची जबाबदारी त्यांनी 40 वर्षे समर्थपणे सांभाळली. नॅशनल कॉन्फरन्स नेम जम्मू काश्मीर भारतात विलीन होण्याच्या प्रक्रियेतही मोठी जबाबदारी पार पाडली होती.

अधिक वाचा - पश्चिम बंगालमधील कार्यक्रमादरम्यान नितीन गडकरींची प्रकृती अचानक बिघडली, जाणून घ्या आता कशी आहे त्यांची प्रकृती

निवडणुकीची तयारी सुरू

सध्या नॅशनल कॉन्फरन्स कडून जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकांची जोरदार तयारी सुरू आहे. कलम 370 हटविल्यानंतर आणि जम्मू काश्मीरचा स्वतंत्र राज्याचा दर्जा काढून घेतल्यानंतर होणारी ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. जम्मू काश्मीरच्या संविधानिक स्थितीतील बदल आणि मतदान यादीत बाहेरील लोकांचा समावेश करण्याच्या प्रक्रियेविरोधात फारूक अब्दुल्ला यांनी आंदोलन पुकारले आहे. जम्मू काश्मीर बाहेरील मतदारांची नावे मतदार यादीत घुसडून इथल्या लोकसंख्येबाबत दिशाभूल करण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही नॅशनल कॉन्फरन्सने केला आहे.

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्स हा एक लक्षवेधी पक्ष आहे. या पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आता कोणाच्या खांद्यावर सोपविली जाते, ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी