पाकिस्तानची वाट लागली, एफएटीएफच्या आशिया पॅसेफिक ग्रुपने थेट 'काळ्या यादी'त टाकलं!

लोकल ते ग्लोबल
Updated Aug 23, 2019 | 14:02 IST | टाइम्स नाऊ मराठी

Pakistan Black List: पाकिस्तानला आज (शुक्रवार) मोठा धक्का बसला आहे. कारण आज त्यांना एपीजी या संस्थेने थेट काळ्या यादीत टाकलं आहे. त्यामुळे आता पाकिस्तानच्या अडचणीत वाढ झाली आहे. 

Imran_Khan_AFP
पाकिस्तानची वाट लागली, एफएटीएफच्या आशिया पॅसेफिक ग्रुपने थेट 'काळ्या यादी'त टाकलं!  |  फोटो सौजन्य: AFP

थोडं पण कामाचं

  • पाकिस्तानला एपीजीकडून मोठा धक्का, टेरर फंडिगमुळे पाक ब्लॅक लिस्टमध्ये 
  • एपीजीच्या निर्णयावर एफएटीएफ ऑक्टोबरमध्ये घेणार अंतिम निर्णय
  • दहशतवादाच्या मुद्यावर पुन्हा पाकिस्तानचा बुरखा फाटला

नवी दिल्ली: दहशतवादाला पोसणाऱ्या पाकिस्तानला आता प्रचंड मोठा झटका बसला आहे. कारण की, टेरर फंडिंगवर नजर ठेवणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्था फाइनेंशियल एक्शन टाक्स फोर्स (FATF)च्या प्रादेशिक युनिट एशिया पॅसिफिक गट (एपीजी) ने पाकिस्तानला थेट 'काळ्या यादी'त टाकलं आहे. आतापर्यंत पाकिस्तान हा एफएटीएफच्या 'ग्रे' यादीत सामील होतं. या संस्थेला असं आढळून आलं की, टेरर फंडिंग, मनी लाँड्रिंग आणि दहशतवाद्यांना आर्थिक मदत विरोधातील ४० पैकी ३२ मानकं पाकिस्तानने पूर्ण केलेले नाहीत. त्यामुळेच आता पाकला थेट काळ्या यादीत टाकण्यात आलं आहे. 

एपीजी ही एफएटीएफचं प्रादेशिक युनिट आहे. त्यामुळे त्यांच्या या निर्णयाचा पाकिस्तानवर व्यापक परिणाम होणार आहे. एफएटीएफ सध्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या बैठकीत पाकिस्तानला काळ्या यादीत कायम ठेवायचं का याबाबत निर्णय घेणार आहे. एफएटीएफचं आशिया पॅसेफिक ग्रुप ही आंतर सरकारी संघटना आहे जी आशिया पॅसेफिक क्षेत्रातील टेरर फंडिंग आणि मनी लाँड्रिंगवर नजर ठेवते. 

या समूहात एकूण ४१ सदस्य देशांचा समावेश आहे. ही संस्था हे निश्चित करते की, सदस्य देश मनी लाँड्रिंग, टेरर फंडिंग आणि व्यापक स्वरुपात नाश करणाऱ्या शस्त्रात्रांवर बंदी घालण्यासाठी निश्चित केलेले आंतरराष्ट्रीय मानकं आपल्याकडे प्रभावीपणे लागू करतं की नाही. एफएटीएफ एपीजीच्या या निर्णयावर ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या बैठकीत निर्णय घेईल. सध्या पाकिस्तान जागतिक संस्थेच्या ग्रे लिस्टमध्ये सामील आहे. संस्थेने ११ मुद्द्यांवर पाकिस्तानकडे उत्तरं मागितली होती. ज्यापैकी १० मुद्द्यांवर त्यांना खूपच खराब रेटिंग मिळालं. तर फक्त एका मुद्यावर त्यांना काहीसं बरं रेटिंग मिळालं. 

दिवाळखोरीच्या मार्गावर असलेल्या पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला हा फार मोठा धक्का आहे. एपीजीच्या निर्णयावर जर एफएटीएफने देखील शिक्कामोर्तब केलं तर मग पाकिस्तानची संपूर्ण अर्थव्यवस्था ही रसातळाला जाईल. कारण एफएटीएफच्या निर्णयानंतर जगातील इतर देश आणि आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था या पाकिस्तानला पूर्णत: कर्ज देणं बंद करेल. त्यामुळे पाकिस्तानात गुंतवणूक अजिबात होणार नाही. ज्याचा थेट परिणाम हा उद्योग व्यवसायांवर होईल. आधीच महागाईने त्रस्त असलेल्या पाकिस्तानला अंतर्गत स्थिती सांभाळणं हे कठीण झालं आहे. 

एपीजीची वार्षिक बैठक ही ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरामध्ये पार पडली. या बैठकीत संस्थेने टेरर फंडिगवर बंदी आणण्याबाबत पाकिस्तानच्या म्युचुअल इव्हेलुएशन रिपोर्टची समीक्षा केली. यावेळी, पाकिस्तानने टेरर फंडिंगवर बंदी घालण्याबाबत पावलं उचलली असल्याचं स्पष्ट केलं. पण यामुळे एपीजीचं काही समाधान झालं नाही. त्यामुळे एपीजीने त्यांना काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे एपीजीच्या निर्णयामुळे पाकिस्तानच्या अडचणी वाढल्या आहेत. कारण की, यामुळे संपूर्ण जगाला स्पष्ट संदेश गेला आहे की, टेरर फंडिंगमुळे पाकिस्तानकडून जागला आजही धोका आहे. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...