न्यू वेल्स (ऑस्ट्रेलिया): बाप आणि मुलगी यांच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी एक घटना नुकतीच समोर आली आहे. एक वासनांध बापाने आपल्याच ११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तीन वेळा बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बापच्या या कृत्याने मानवतेलाच काळीमा फासला गेला आहे. शाळेत जाणाऱ्या आपल्या अल्पवयीन मुलीला रस्त्यातच पकडून आरोपी बापाने तिच्यावर शारीरिक अत्याचार केले. ही संपूर्ण घटना ऑस्ट्रेलियाच्या साऊथ वेल्स शहरात घडली आहे.
४९ वर्षीय आरोपी बापाने आपल्याच मुलीला सुरुवातीला कात्री दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर घाबरलेल्या मुलीला नराधम बाप हा आपल्या कारमध्ये घेऊन गेला आणि त्याने तिच्यावर पाशवी बलात्कार केला. या प्रकरणात अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे. नराधम बापाने मुलीवर तीन वेळा बलात्कार करुन त्यानंतर तिला एका रेल्वे स्थानकाजवळ फेकून दिलं होतं.
पोलिसांनी या प्रकरणी तात्काळ तपास सुरु केला होता. पण घटनेच्या चार दिवसानंतर आरोपी बापाला अटक करण्यात पोलिसांना यश आलं. पोलिसांनी अटक केल्यानंतर आरोपी बापाने आपला गुन्हा देखील मान्य केला. दरम्यान, आरोपीवर ९ आरोप निश्चित करण्यात आले असून त्याला कोर्टाने तब्बल २० वर्षांची कठोर शिक्षा सुनावली आहे. न्यू वेल्स शहरातील पोलिसांच्या मते, ही घटना सर्वांनाच हादरवून सोडणारी अशीच आहे. या घटनेमुळे शहरातील महिला सुरक्षेचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे.
या घटनेचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्याने याबाबत माहिती देताना सांगितलं की, आरोपीची गाडी हाच या प्रकरणातील प्रमुख पुरावा होता. ज्याने आम्हाला आरोपीपर्यंत पोहचवलं. दरम्यान, यावेळी पोलिसांनी पीडित मुलीच्या हिंमतीची देखील दाद दिली. यावेळी पीडित मुलीला तिच्या कुटुंबीयांनी आणि मित्रांनी या संपूर्ण धक्क्यातून बाहेर काढण्यास खूप मदत केली. सध्या पीडित मुलगी हळूहळू त्या धक्क्यातून बाहेर येऊन स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न करत आहे. पण या संपूर्ण प्रकरणाने तिला तिच्या कुटुंबीयांना प्रचंड मनस्ताप झाला आहे.