अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार, POCSO कायद्यानुसार नरधम बापाला 106 वर्षांची शिक्षा, पीडित मुलगी झाली होती गर्भवती

केरळमध्ये (Kerala) एका नराधम बापानं (Father) आपल्या लेकीवर वारंवार बलात्कार (Rape) केल्याची घटना घडली होती. याप्रकरणाचा निकाल देताना (फास्ट ट्रॅक) विशेष जलदगती न्यायालयानं ( Fast Track Special court) नराधम पित्याला मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पॉक्सो (POCSO) कायद्यांतर्गत १०६ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

sentenced to father 106 years for raping daughter
मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम बापाला 106 वर्षांची शिक्षा  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • आरोपी वडील २०१५ पासून आपल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करत होता.
  • न्यायालयाने वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी आरोपी बापाला १०६ वर्षाची शिक्षा सुनावली आहे.

तिरूवनंतपुरमः केरळमध्ये (Kerala) एका नराधम बापानं (Father) आपल्या लेकीवर वारंवार बलात्कार (Rape) केल्याची घटना घडली होती. याप्रकरणाचा निकाल देताना (फास्ट ट्रॅक) विशेष जलदगती न्यायालयानं ( Fast Track Special court) नराधम पित्याला मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पॉक्सो (POCSO) कायद्यांतर्गत १०६ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. आरोपी वडील २०१५ पासून आपल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करत होते आणि पीडित मुलगी २०१७ मध्ये गर्भवती देखील झाली होती. लैंगिक गुन्ह्यांचे संरक्षण कायदा (POCSO) अंतर्गत न्यायालयाने वडिलांना दोषी ठरवले आहे.

न्यायालयाने या कलमांखाली शिक्षा सुनावण्याचा निर्णय घेतला 

अतिरिक्त सत्र न्यायाधीश उदयकुमार यांनी अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करणे, गर्भधारणा करणे, १२ वर्षांखालील मुलीवर बलात्कार करणे आणि आई-वडील किंवा नातेवाईकाकडून बलात्कार करणे अशा वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी त्याला २५-२५ वर्षांची शिक्षा सुनावली. न्यायालयाने सांगितले की, शिक्षा एकाचवेळी चालेल आणि दोषींला 25 वर्षांची शिक्षा भोगावी लागेल. न्यायालयाने गुन्हेगाराला एकूण १७ लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे.

असे प्रकरण समोर आले

सरकारतर्फे विशेष सरकारी वकील अजित थंकय्या यांनी सांगितले की, मुलगी गरोदर राहिल्यानंतर ही घटना 2017 मध्ये उघडकीस आली. सुरुवातीला आई आणि पोलिसांनी विचारणा करूनही तिने गुन्हेगार कोण हे उघड केले नव्हते. नंतर, जेव्हा तिला समुपदेशनासाठी बाल कल्याण केंद्रात (CWC) पाठवण्यात आले तेव्हा तिने उघड केले की तिचे वडील गेल्या दोन वर्षांपासून तिचे लैंगिक शोषण करत आहेत. वडिलांना 2017 मध्ये अटक करण्यात आली होती. पीडितेच्या मुलाला CWC मार्फत दत्तक घेण्यासाठी ठेवण्यात आले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी