Strange Murder : आधी मर्डर, मग देवदर्शन! पोटच्या मुलाचा खून करून बापानेच केले तुकडे

आपल्या नशेबाज तरुण मुलाचा खून करून त्याचा बाप मंदिरात पोहोचला. देवाची माफी मागितली. मग परत घरी येऊन मुलाच्या मृतदेहाचे तुकडे केले.

Strange Murder
आधी मर्डर, मग देवदर्शन!  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • बापानेच केला मुलाचा खून
  • खून करून मागितली ईश्वराची माफी
  • पोलिसांनी लावला छडा

Strange Murder : आपल्या मुलाचा खून (Murder of son) करून त्याच्या मृतदेहाचे (dead body) तुकडे तुकडे करणाऱ्या बापाला (Father) पोलिसांनी (Police) अटक (arrest) केली आहे. गुजरातमधील अहमदाबाद पोलिसांना (Ahmedabad police) शहरातील वेगवेगळ्या भागात मानवी शरीराचे वेगवेगळे तुकडे सापडले होते. त्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास केल्यानंतर बापानेच आपल्या मुलाचा खून केल्याचं उघड झालं. पोलिसांनी निलेश जोशी नावाच्या आरोपीला अटक केली असून त्याने सांगितलेलं खुनाचं कारण ऐकून पोलिसांनाही काय प्रतिक्रिया द्यावी, ते समजेनासं झालं आहे. 

मुलासोबत वाद

अहमदाबादमध्ये निलेश जोशी हे त्यांची पत्नी आणि मुलासह राहत होते. एकेकाळी क्लास टू ऑफिसर काम करणाऱ्या निलेश जोशी यांचं पत्नीशी जोरदार भांडण झाल्यामुळे त्या घर सोडून गेल्या होत्या. त्यानंतर निलेश जोशी हे त्यांचा तरुण मुलगा स्वयंसोबत राहत होते. स्वयंला अनेक व्यसनं लागली होती आणि तो नशेच्या पूर्ण आहारी गेला होता. त्याला ड्रग्जचंही व्यसन जडलं होतं आणि त्यासाठी तो वडिलांकडे पैसे मागत असे. निवृत्तीनंतर निलेश यांच्याकडील पैसे संपत चालले होते. पैशाच्या हव्यासापायी मुलासोबत त्यांची सतत भांडणं होत होती. पैसे दिले नाहीत, तर मारून टाकण्याची धमकी त्यांचा मुलगा त्यांना देत होता. 

अधिक वाचा - चीनच्या वुहानमध्ये पुन्हा कोरोनाचा विस्फोट; अनेक भागांत Lockdown, मेट्रो सेवा बंद 

भांडणानंतर हत्या

घटनेच्या दिवशी नशेत घरी आलेल्या मुलाने निलेश यांच्याकडे पैसे मागायला सुुुरुवात केली. आपल्याकडे आता पैसे नसल्याचं त्यांनी मुलाला सांगितलं. त्यानंतर आक्रमक झालेल्या मुलाचा राग येऊन त्यांनी त्याच्या डोक्यावर दगडाने वार केले. काही वार केल्यानंतर अगोदरच नशेच्या गर्तेत असणाऱ्या मुलाचा मृत्यू झाला. 

वडील गेले देवळात

मुलाचा आपल्याच हातून मृत्यू झाल्यामुळे निलेश यांना वाईट वाटलं आणि ते माफी मागण्यासाठी तडक देवळात गेले. मुलाचा मृतदेह घरात तसाच ठेऊन ते अर्धा तास देवासमोर जाऊन बसले आणि परमेश्वराची माफी मागितली. त्यानंतर परत येताना काही पॉलिथिनच्या बॅग आणि गॅस कटर घेऊन घरी आले. 

अधिक वाचा - Shocking : डान्स करता करता गेला 400 जणांचा जीव, जगातील सर्वात गूढ आजार, रहस्य कायम

मृतदेहाचे केले तुकडे

मुलाचा मृतदेह बाथरूममध्ये नेऊन त्यांनी कटरने मुलाच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि शहरातील वेगवेगळ्या भागात स्कुटीवरून ते तुकडे नेऊन कचराकुंडीत फेकून दिले. वेगवेगळ्या भागात मृतदेहाची तुकडे पडल्यामुळे नेमका कुणाचा मृत्यू झाला आहे, हे पोलिसांना समजू नये, यासाठीच त्यांनी हा प्रकार केला. 

असा लागला छडा

पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी सापडलेले मृतदेहाचे तुकडे डीएनए चाचणीसाठी पाठवले. ते एकाच व्यक्तीचं असल्याचं लक्षात आलं. ज्या भागात हे तुकडे सापडले, त्या भागातील सीसीटीव्ही फूटेज पोलिसांनी तपासलं. त्यात जोशी हेच गाडीवरून मृतदेहाचे तुकडे कचराकुंडीत टाकून जात असल्याचं पोलिसांना दिसलं. पोलिसांनी गाडीच्या नंबरप्लेटवरून जोशी यांचा पत्ता शोधून काढला. मात्र त्यांच्या घराला कुलूप होतं. 

अधिक वाचा - Uttar Pradesh News: मोबाईलवर गेम खेळण्यावरून ओरडले वडील, रागावलेल्या 9वी तल्या मुलानं उचललं धक्कादायक पाऊल

रेल्वेतून केली अटक

पोलिसांनी त्यांचा फोन नंबर मिळवून ट्रॅक केला. त्यावर ते अहमदाबादवरून सूरतला गेले असून तिथून गोरखपूरच्या ट्रेनमध्ये असल्याचं पोलिसांना समजलं. पोलिसांनी ट्रेनमधूनच त्यांना अटक केली. अटक होताच त्यांनी हत्येची कबुली दिली असून आपला नाईलाज झाला असल्याचं सांगितलं आहे. पोलिसांनी त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी