नात्याला काळिमा, बापच अल्पवयीन मुलीवर करत होता दररोज बलात्कार

लोकल ते ग्लोबल
Updated Feb 19, 2021 | 14:25 IST | टाइम्स नाऊ मराठी

अल्पवयीन मुलीच्या तक्रारीच्या आधारे कलम ३७६ आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पित्याला ताब्यात घेण्यात आले आहे. एसपी अमित सांघी यांनी सांगितले की चाईल्ड लाईनने पीडित अल्पवयीन मुलीचे कौसिलिंग केले

rape
भयानक! बापच अल्पवयीन मुलीवर करत होता दररोज बलात्कार 

थोडं पण कामाचं

  • एका अल्पवयीन मुलीवर तिचा बाप गेल्या एक महिन्यापासून दररोज बलात्कार करत होता.
  • त्या वडिलांच्या मित्रांनीही या अल्पवयीन मुलीला नशेचा पदार्थ खाऊ घालत तिच्यावर बलात्कार केला. 
  • जेव्हा हा त्रास खूपच वाढला तेव्हा या अल्पवयीन मुलीने चाईल्ड लाईनमध्ये फोन करून तक्रार केली.

मुंबई: ग्वाल्हेरमध्ये नात्याला काळिमा फासणारी एक घटना समोर आली आहे. या घटनेने बाप-मुलीच्या नात्याला लज्जास्पद केले आहे. या शहराच्या गोला मंदिर भागात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर तिचा बाप गेल्या एक महिन्यापासून दररोज बलात्कार करत होता. इतकंच नव्हे तर त्या वडिलांच्या मित्रांनीही या अल्पवयीन मुलीला नशेचा पदार्थ खाऊ घालत तिच्यावर बलात्कार केला. 

जेव्हा हा त्रास खूपच वाढला तेव्हा या अल्पवयीन मुलीने चाईल्ड लाईनमध्ये फोन करून तक्रार केली. यानंतर पोलिसांनी अल्पवयीन मुलीच्या तक्रारीच्या आधारावर कलम ३६ आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करत आरोपी पित्याला ताब्यात घेतले. तर या आरोपी पित्याचा मित्र सध्या फरार आहे. पोलीस या आरोपीचा तपास करत आहेत. 

पोलिसांनी दिली ही माहिती

एसपी अमित सांघी यांनी सांगितले चाईल्ड लाईनने या अल्पवयीन मुलीचे कौन्सिलिंग केले. त्यांनी सांगितले की ही मुलगी आठवी इयत्तेत शिकत होती. ती तिचे वडील आणि तिच्या बहिणीसोबत राहत होती. गेल्या एक महिन्यांपासून ती आपल्या रूममध्ये झोपत होती. यावेळी तिचे वडील तिच्या रूममध्ये येत आणि घाणेरड्या पद्धतीने तिला स्पर्श करत. तिने विरोध केल्यास तिला मारून टाकण्याची धमकी देत. गेल्या एका महिन्यापासून तिच्यावर वडील बलात्कार करत होते. 

पित्यानेच नव्हे तर त्याच्या मित्रानेही...

इतकंच नव्हे वडिलांनी आपल्या मुलीला मित्राच्या घरी सोडले. या मित्रानेही या अल्पवयीन मुलीला नशेचा पदार्थ खाऊ घालत तिच्यासोबत दुष्कर्म केले. या दरम्यान, या अल्पवयीन मुलीला जेव्हा हा त्रास सहन झाला नाही तेव्हा तिने हे सर्व आपल्या आईला सांगितले. त्यानंतर तिने चाईल्ड लाईनला या प्रकरणी तक्रार केली. यानंतर चाईल्ड लाईनने ही माहिती बाल विकास आणि पोलिसांना दिली. संपूर्ण प्रकरण समोर आल्यानंतर आरोपी वडिलांविरोधात कलम ३७६ आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी