आईने तोंडात कपडा कोंबला आणि वडिलांनी केला बलात्कार

नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. एका मुलीवर तिच्याच वडिलांनी दोनवेळा बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

father rape on daughter
प्रातिनिधीक फोटो 

थोडं पण कामाचं

  • वडिलांनीच केला पोटच्या मुलीवर बलात्कार 
  • आईने सुद्धा वडिलांनाच केली मदत 
  • आरोपी आई-वडिलांनी मुलीचे आरोप फेटाळले 

भोपाळ: एका १८ वर्षीय मुलीने आपल्याच वडिलांवर गंभीर आरोप केला आहे. वडिलांनी लॉकडाऊनमध्ये दोनवेळा बलात्कार केल्याचा आरोपी पीडित मुलीने केला आहे. पीडित मुलीने दावा केला आहे की, तिच्या वडिलांनी १६ दिवसांत दोनवेळा तिच्यावर बलात्कार केला. इतकेच नाहीतर या घृणास्पद कृत्यात आपल्या आईने वडिलांना मदत केल्याचाही आरोप पीडितेने केला आहे. मध्यप्रदेशातील मुरैना जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे.

पीडित मुलीने आपल्या आई-वडिलांवर हा आरोप केल्याने संपूर्ण परिसरात एक खळबळ उडाली आहे. तर पीडित मुलीच्या आई-वडिलांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. दोघांचं म्हणणं आहे की, त्यांच्या मुलीचे एका मुलावर प्रेम आहे आणि त्याला विरोध केल्याने आपली मुलगी खोटे आरोप करत आहे.

तक्रारीत म्हटले आहे की, २६ मार्च रोजी पहिल्यांदा मुलीवर जबरदस्ती करण्यात आली. आरोपी वडिलांनी मुलीला बेडवर बांधलं तर तिच्या आईने तोंडात कपडा कोंबला. यानंतर वडिलांनी त्या मुलीवर बलात्कार केला. यानंतर दोघांनी मिळून त्या मुलीला एका खोलीत बंद केले.

यानंतर १० एप्रिल रोजी पीडित मुलगी आपल्या घरातून पळून जाण्यात यशस्वी झाली. घरातून पळून ही मुलगी आपल्या एका नातेवाईकाच्या घरी पोहोचली. पण आरोपी वडिलांनी तिला शोधून काढले आणि पुन्हा आपल्या घरी आणले. त्यानंतर आरोपीने पुन्हा एकदा पीडित मुलीवर बलात्कार केला. 

या घटनेनंतर पीडित मुलीच्या मोठ्या बहिणीने १०९८ टोल फ्री क्रमांकावर कॉल केला आणि पीडितेसोबत घडलेला प्रकार सांगितला. जेव्हा पोलिसांचं पथक पीडित मुलीच्या घरी पोहोचलं तेव्हा त्यांनी पाहिलं की, तिच्या गालावर चावल्याचे व्रण आहेत. मुरैना पोलीस निरीक्षकांनी सांगितले की, 'आम्ही तक्रारीनंतर आरोपी दाम्पत्याला ताब्यात घेतलं आहे. त्यांचा जबाब मॅजिस्ट्रेट समोर नोंदवला जाईल'.

पीडितेने पोलिसांना सांगितले की, जेव्हा ती हायस्कूलमध्ये होती तेव्हापासून तिचे वडील तिच्यासोबत छेडछाड करत असत. या प्रकरणी पोलिसांनी पीडितेची तक्रार दाखल केरुन घेतली असून अदिक तपास सुरू आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी