ऐकलं का ! 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डेचं असेल बरं, Cow Hug Day नसेल; या कारणामुळे केंद्राने मागे घेतला निर्णय

Cow Hug Day : जगभरात अनेकांना व्हॅलेंटाईन डेचे (Valentine’s Day)वेध लागले.  हा दिवस प्रेमी युगुलांचा असतो, यादिवशी गायीविषयी कृतज्ञता दाखवा म्हणून केंद्राने काऊ हग डे (Cow Hug Day) साजरा करण्याचे आवाहन दिले. याकरिता पशू कल्याण मंडळानं (Animal Welfare Board) मार्गदर्शक पत्रक जाहीर केलं. त्यानुसार गाईप्रेमींनी (Cow lovers) 14 फेब्रुवारीला देशभरात गाईला मिठी मारा दिवस साजरा करण्याचं आवाहन केलं.

February 14th will be Valentine's Day, not Cow Hug Day; Center withdrew the decision
14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डेचं असेल बरं, Cow Hug Day नसेल   |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • पशु कल्याण मंडळाने 6 फेब्रुवारी रोजी Cow Hug Day साजरा करण्याचे पत्र जारी केले होते.
  • ‘गाईला आलिंगन दिन’साजरा करण्याच्या या निर्णयावर शेकडो मीम्स आणि जोक्सही बनवण्यात आले.
  • केंद्र सरकारच्या या निर्णयावरून शिवसेनेनेही भाजपची खिल्ली उडवली होती.

नवी दिल्ली : जगभरात अनेकांना व्हॅलेंटाईन डेचे (Valentine’s Day)वेध लागले.  हा दिवस प्रेमी युगुलांचा असतो, यादिवशी गायीविषयी कृतज्ञता दाखवा म्हणून केंद्राने काऊ हग डे (Cow Hug Day) साजरा करण्याचे आवाहन दिले. याकरिता पशू कल्याण मंडळानं (Animal Welfare Board) मार्गदर्शक पत्रक जाहीर केलं. त्यानुसार गाईप्रेमींनी (Cow lovers) 14 फेब्रुवारीला देशभरात गाईला मिठी मारा दिवस साजरा करण्याचं आवाहन केलं. परंतु या निर्णयावर सोशल मीडियातून (Social media) जोरदार टीका झाली. तसेच राजकीय नेत्यांनीही यावर टीका केली होती. यासर्व पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ( Central government) हा निर्णय मागे घेतला आहे. ‘काऊ हग डे’ अर्थात ‘गाईला आलिंगन दिन’साजरा करण्याच्या या निर्णयावर शेकडो मीम्स आणि जोक्सही बनवण्यात आले.  (February 14th will be Valentine's Day, not Cow Hug Day; Center withdrew the decision)

अधिक वाचा  : या राशींसाठी प्रॉमिस डे राहील उत्तम; तर काहींसाठी असेल आर्थिक लाभाचा दिवस

सोशल मीडियावर मिम्स आणि जोक्सचा पाऊस

लोक सोशल मीडियावर गायीसोबतचे फोटो पोस्ट करू लागले, तर काहीजण या आवाहनाची खिल्ली उडवत आहेत. एका व्यक्तीने गायीसोबतचा फोटो शेअर करत लिहिले की, 'तुम्ही कोणता दिवस साजरा करता याने काही फरक पडत नाही, पण त्यांचे प्रेम नेहमीच अविश्वसनीय असते. फोटो शेअर करताना दुसऱ्या युझरने लिहिले की, '14 फेब्रुवारीला काऊ हग डे साजरा करणे चांगली कल्पना आहे. प्रेमाचा संदेश पसरवा."  तर काही ट्विटमध्ये पशू कल्याण मंडळाच्या आवाहनाची खिल्लीही उडवली. काही लोकांनी व्हॅलेंटाईन डेला गायीला मिठी कशी मारायची असा प्रश्न केला. तर काहींनी सांगितले की, आता व्हॅलेंटाईन डेही मनाप्रमाणे साजरा करता येणार नाही.

अधिक वाचा  : 'प्रॉमिस डे'च्या तुमच्या आवडत्या व्यक्तीला पाठवा हे मेसेज

राजकीय नेत्यांनी उडवली खिल्ली 

"केंद्र सरकारच्या पशू कल्याण बोर्ड म्हणतेय की 'काऊ हग डे' साजरा करायचा म्हणजे गाईला मिठी मारायची, असा निर्णय काढणाऱ्या या पशू कल्याण बोर्डाचं डोकं ठिकाणावर आहे का? असे म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या निर्णयावर टीका केली.   आपण गाईला गोंजारतो, चारा टाकतो पण हे बोर्ड गाईला मिठी मारायला लावत आहे. गाईला मिठी मारताना गाईने शिंगाने फेकून दिलं किंवा लाथ मारली तर मग कसं करायचं असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला होता.  केंद्र सरकारच्या या निर्णयावरून शिवसेनेनेही भाजपची खिल्ली उडवली होती.

जितेंद्र आव्हाड यांचीही टीका 

जितेंद्र आव्हाड यांनी एक व्हिडीओ ट्वीट केला असून यामध्ये गाय नकार देत असतानाही तिला मिठी मारण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. काऊ हग डेसाठी हा सराव सुरू असल्याचं उपहासात्मकपणे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. दरम्यान गायीला नेमकी मिठी कशी मारायची? कुठून मारायची? हे शासनाने सांगावं, असा खोचक सवालही जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. 

अधिक वाचा  : नाना शंकर शेठ यांच्या जयंतीचा विसर

केंद्र सरकारचा निर्णय काय? 

केंद्र, सरकारच्या पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय मंत्रालयाने या निर्णयाबाबत एक पत्र जारी केले होते. पशु कल्याण मंडळाने 6 फेब्रुवारी रोजी हे पत्र जारी केले होते. या पत्रात या आवाहनाबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली होती.  पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय मंत्रालयाचे सचिव डॉ.एस.के.दत्ता यांनी एक पत्र काढून 14 फेब्रुवारी हा ‘काऊ हग डे’ अर्थात गाईला मिठी मारून साजरा करण्याचे निर्देश दिले होते.

अधिक वाचा  : पत्नीने नवऱ्याची अशी उतरवली नशा, Video पाहून येईल हसू

या पत्रात दत्ता यांनी म्हटले होते की, गाय ही भारतीय संस्कृती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. गाय ही आपले जीवन टिकवते, पशुधन आणि जैवविविधतेचे प्रतिनिधित्व करते,’ असे या पत्रात म्हणण्यात आले होते.  हा निर्णय कसा चांगला हे सांगण्यासाठी मंत्रालयाने यासाठी वैदिक परंपरेचा ( Vedic Traditions) दाखला दिला होता. 

‘मानवतेला सर्व ऐश्वर्य प्रदान करणारी, आईसारख्या प्रेमळ स्वभावामुळे गायीला ‘कामधेनू’ आणि ‘गौमाता’ म्हणून ओळखले जाते. काळानुसार पाश्चात्य संस्कृतीच्या प्रगतीमुळे वैदिक परंपरा जवळजवळ नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. पाश्चिमात्य संस्कृतीच्या झगमगाटाने आपली भौतिक संस्कृती आणि वारसा जवळजवळ विसरला आहे. गाईचा प्रचंड फायदा पाहता, गाईला मिठी मारल्याने भावनिक समृद्धी येते. त्यामुळे आपला वैयक्तिक आणि सामूहिक आनंद वाढतो. त्यामुळे सर्व गाईप्रेमींनी 14 फेब्रुवारी हा दिवस गाईचे महत्त्व लक्षात घेऊन गाईला आलिंगन दिन म्हणून साजरा करावा, असं पत्रात म्हटलं होतं. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी