गर्भपात विधेयकावरील चर्चेदरम्यान महिला प्रतिनिधीने केला धक्कादायक खुलासा

लोकल ते ग्लोबल
Updated May 19, 2019 | 15:22 IST | टाइम्स नाऊ हिंदी

अमेरिकेच्या दक्षिण कॅरोलीन विधीमंडळात गर्भपात विधेयकाबाबत चर्चा सुरू होती. मात्र या चर्चेदरम्यान विधीमंडळात महिला प्रतिनिधींनी आपल्या सोबत घडलेल्या घटनेची माहिती दिली. पाहा काय म्हणाल्या महिला प्रतिनिधी...

Nancy Mace
महिला प्रतिनीधींनी ऐकवली आपबिती  |  फोटो सौजन्य: Twitter

कोलंबस: जगातील प्रत्येक देशात महिलांवर अत्याचार होतात. कोणत्याच देशात महिला सुरक्षित नाहीत. असं आम्ही नव्हे तर समोर घडत असलेल्या घटनांच आपल्याला सांगतात. आता नुकतंच अमेरिकतील दक्षिण कॅरोलीना विधीमंडळात गर्भपात विधेयकाबाबत चर्चा सुरू होती. मात्र या चर्चेदरम्यान महिला प्रतिनीधी नँसी मेस यांनी आपल्यावर झालेल्या बलात्काराच्या घटनेबाबतची माहिती दिली. दोन दशकांपासून नँसी या प्रकरणावर गप्प होत्या. त्यांनी आपल्यावर झालेल्या अत्याचाराला अखेर वाचा फोडली.

दक्षिण कॅरोलीना विधीमंडळात गर्भपात प्रतिबंध कायद्याबाबत चर्चा सुरू होती. यात गर्भातील भ्रूणाच्या हृदयाचे ठोके दिसल्यास गर्भपात न करू देण्याबाबतचा बदल कायद्यात करण्यासाठी चर्चा झाली. या विधेयकामध्ये बलात्कार आणि नातेवाईकांकडून केल्या जाणाऱ्या अत्याचाराबाबत एक कलम कायद्यात जोडले जावे, अशी मागणी नँसी यांनी केली. जेव्हा सभागृहातील सहकाऱ्यांनी नँसीच्या या संशोधनाला विरोध केला, त्यांची मागणी रद्द केली गेली. त्यानंतर त्या स्वत:ला थांबवू शकल्या नाही आणि आपल्यावरील अत्याचाराची माहिती दिली.

त्या म्हणाल्या, ‘आमच्यापैकी अशा काही महिला आहेत ज्यांच्यासोबत बलात्काराच्या घटना घडल्या आहेत त्यांना या गोष्टीला वाचा फोडण्यासाठी २५ वर्षे लागली.  मी ही त्यातील एक आहे. ही गोष्ट माझी आई आणि हायस्कूलमधील माझी मैत्रीणीला माहितीय.’ नँसी यांनी पुढे सांगितलं की, त्या घटनेमुळे खूप काळ मी त्रासात होते. पण अखेर त्या घटनेबद्दल सांगण्याचं कारण की, सभागृहातील पुरुष प्रतिनिधींना पीडित महिलांचं दु:ख कळायला हवंय.

विशेष म्हणजे ओहायोमध्ये अशाप्रकारचं एक विधेयक मंजूर झालेलं आहे. जेव्हा तीन महिला प्रतिनीधींनी आपल्यावर झालेल्या बलात्काराबद्दल सभागृहात माहिती दिली. ओहायो स्टेट रिप्रेंझेटेटिव्ह एरिका क्रावले (डेमोक्रेट) या कोलंबस शहराचं प्रतिनिधत्व करतात. त्यांनी सभागृहात हार्टबीट विधेयकावर चर्चा सुरू करण्यापूर्वी आपल्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराची माहिती देण्यास नकार दिला, मात्र आपल्या रिपब्लिकन पक्षाच्या सहकारी नँसी यांना पाठिंबा दर्शवला आहे.

पुढे एरिका क्रावले म्हणाल्या, त्यांच्यासोबतही अशी घटना घडली होती. या आठवड्याच्या सुरूवातीला मिशिगनच्या रिपब्लिकन नीती विधीमंडळात गर्भपातावर प्रतिबंध लावणारी दोन विधेयके मंजूर केली गेली आहेत आणि ती विधेयके आता राज्यपालांच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आली आहेत. दरम्यान, राज्यपाल यावर म्हणाले या दोनही विधेयकांसाठी ते वीटो शक्तीचा वापर करतील. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
गर्भपात विधेयकावरील चर्चेदरम्यान महिला प्रतिनिधीने केला धक्कादायक खुलासा Description: अमेरिकेच्या दक्षिण कॅरोलीन विधीमंडळात गर्भपात विधेयकाबाबत चर्चा सुरू होती. मात्र या चर्चेदरम्यान विधीमंडळात महिला प्रतिनिधींनी आपल्या सोबत घडलेल्या घटनेची माहिती दिली. पाहा काय म्हणाल्या महिला प्रतिनिधी...
Loading...
Loading...
Loading...