आपल्या मुलांसमोर विद्यार्थ्यासोबत शिक्षिकेचे शारीरिक संबंध, पोलिसांनी केलं अटक

पोलिसांनी या महिला शिक्षिकेविरूद्ध अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे.

female teacher arrested for sexual intercourse with minor student in front of her children
आपल्या मुलांसमोर विद्यार्थ्यासोबत शिक्षिकेचे शारीरिक संबंध, पोलिसांनी केलं अटक   |  फोटो सौजन्य: Representative Image

लुइसियाना (अमेरिका): अमेरिकेच्या लुइसियाना येथील झाचेरी शहरातील एका शाळेतील महिला शिक्षिकेने आपल्या मुलांसमोरच १५ वर्षाच्या विद्यार्थ्याशी शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप आहे. महिलेने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. जेव्हा शिक्षिकेने तिच्या विद्यार्थ्याशी लैंगिक संबंध प्रस्थापित केले तेव्हा तिची मुलं आसपासच खेळत होती. ३४ वर्षीय शिक्षिका नॉर्थवेस्टर्न मिडिल स्कूलमध्ये विज्ञान हा विषय शिकवते. या आरोपानंतर शिक्षिकेस शाळा प्रशासनाने सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे.

डेली मेल दिलेल्या वृत्तानुसार, शिक्षिकने अल्पवयीन विद्यार्थ्याला नग्न फोटो आणि व्हिडिओ पाठवून त्याला आमिष दाखविलं. दरम्यान, आपली ओळख लपविण्यासाठी तिने व्हिडिओमध्ये आपला चेहरा लपविला. सध्या शिक्षकाला २२५,००० डॉलर्सच्या बॉण्डवर जेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. तिच्यावर अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप निश्चित करण्यात आला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, या शिक्षिकेने सुरुवातीला अल्पवयीन मुलाशी चॅटिंग सुरु केलं. चॅटिंगसाठी तिने आपल्या शाळेचा आणि वैयक्तिक ईमेलचा वापर केला. त्यानंतर या दोघांमध्ये अनैतिक संबंध सुरु झाले. आरोपी शिक्षिकाने आपल्यावर कुणाची पाळत राहू नये यासाठी शाळेच्या ईमेल आयडीऐवजी स्वत:चा ईमेल आयडी वापरण्यास सुरुवात केली. दरम्यान, यावेळी महिलेने मुलाला सांगितले की तिला त्याच्यासोबत लैंगिक संबंध ठेवण्याची इच्छा आहे. एके दिवशी ती विद्यार्थ्याला आपल्या घरी घेऊन आली आणि त्यानंतर तिने त्याच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. 

रिपोर्टमध्ये असंही म्हटलं आहे की., या दोघांचे अनेक दिवस संबंध होते. जेव्हा-जेव्हा दोघांचे शारीरिक संबंध सुरु असायचे तेव्हा-तेव्हा शिक्षिकेची स्वत:ची मुलं ही घरातच असायची. दरम्यान, शिक्षिकेवर असाही आरोप आहे की, ती विद्यार्थ्याला एक अंमली पदार्थ देऊन त्याच्यावर बलात्कार करायची. नववीमध्ये शिकणाऱ्या या विद्यार्थ्याला दोघांचं नातं सगळ्यांसमोर जाहीर करायचं होतं. परंतु असे केल्याने तिचं करिअर धोक्यात येऊ शकतं. असं सांगून महिलेने या गोष्टीला नकार दिला. 

दरम्यान, शाळेशी संबंधित लोकांनी यासंदर्भात जास्त काही बोलण्यास नकार दिला. या शाळेचे अधीक्षक  स्कॉट डेव्हिलिअर यांनी शाळा प्रशासनाची पाठराखण करताना असं म्हटलं आहे की, 'कोणीही काही लपविण्याचा प्रयत्न करत नाहीए.'

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी