होणाऱ्या पत्नीच्या मैत्रिणीवर बलात्कार, आरोपीचा पीडित महिलेला गर्भनिरोधक गोळ्या खाण्याचा सल्ला

Rape Case: मैत्रिणीच्या होणाऱ्या पतीनेच एका महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरम्यान, आरोपीने आपला गुन्हा देखील मान्य केला आहे. 

fiance rape on lady friend accused even told the victim to take contraceptive pills
होणाऱ्या पत्नीच्या मैत्रिणीवरच बलात्कार, गुन्हा दाखल  |  फोटो सौजन्य: Representative Image

थोडं पण कामाचं

  • होणाऱ्या पतीने पत्नीच्या मैत्रिणीवरच केला बलात्कार
  • बलात्कार प्रकरणी आरोपीवर पोलिसात गुन्हा दाखल
  • आरोपीला $100,000 जात मुचलक्यावर जामीन मंजूर

पोकोनॉस (अमेरिका): अमेरिकेतील पोकोनॉसमध्ये एका लग्न सोहळ्यादरम्यान, एका महिलेवर तिच्याच मैत्रिणीच्या होणाऱ्या पतीने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्या वेळेस ही संपूर्ण घटना घडली त्यावेळी पीडित महिला हा नशेत होती. जेव्हा तिला शुद्ध आली त्यावेळी ती पुरुषांच्या लॉकर रुममध्ये होती. पीडित महिला ही २९ वर्षांची असून या प्रकाराने तिला खूपच धक्का बसला आहे. याबाबत पीडिता असा जबाब दिला आहे की, पार्टीच्या आधी ती आपल्या नातेवाईकांसोबत राफ्टिंगसाठी गेली होती. त्याचवेळी तिने तिथे दारुचं खूप सेवन केलं. पण जेव्हा तिला शुद्ध आली तेव्हा ती पुरुषांच्या लॉकर रुममध्ये होती. त्यानंतर आपल्यावर अत्याचार झाल्याचं तिला समजलं. 

रिपोर्ट्सनुार, तपास अधिकाऱ्यांना असं सांगितलं की, 'लॉकर रुममध्ये तिच्या मैत्रिणचा होणारा पती तिच्यासमोर उभा होता. यानंतर आपली मैत्रीण देखील काही वेळाने तिथे आली. त्यानंतर त्या दोघांमध्ये बराच वेळ भांडणही झालं. मी नशेत असल्यामुळे मला व्यवस्थित चालता येत नव्हतं. त्यामुळे माझ्या मैत्रिणीने तिच्या होणाऱ्या नवऱ्याला मला नीट घेऊन जाण्यास सांगितलं होतं. पण जेव्हा मी शुद्धीत आले त्यावेळी पाहिलं की, माझ्या मैत्रिणीचा होणारा नवरा हा माझ्या शरीराला चिटकून बसला होता.' 

दरम्यान, आरोपीने असं म्हटलं आहे की, त्या रात्री तो देखील नशेत होता. आरोपीच नाव डेनियल कार्ने (२८ वर्ष) असं आहे. 'माझ्याकडून चूक झाली पण मी हे कृत्य जाणूनबुजून नाही केलं.' असं म्हणत आरोपीने आपला गुन्हा मान्य केला आहे. रिपोर्ट्सनुसार, पोलिसांनी पीडित महिला आणि आरोपी दरम्यान फोनवर झालेल्या संभाषणावरुन आरोप निश्चित केले आहेत. 

जेव्हा पोलिसांनी फोनवरील संभाषण ऐकलं त्यावेळी आरोपी पीडित महिलेला गर्भनिरोधक गोळ्या खाण्यास सांगत होता. त्याने फोनवर असं म्हटलं होतं की, त्याने जाणूनबुजून शारीरिक संबंध ठेवले नव्हते. पण जे काही झालं ती एक चूक होती. ज्याचा आता पश्चाताप होत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीला $100,000 जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान, हा संपूर्ण घटनेमुळे पीडित महिलेची मैत्रीण आणि तिचा होणारा पती यांच्यामध्ये प्रचंड वाद झाला. पण अखेर त्यांनी लग्न देखील केलं. लग्नानंतर देखील आरोपीने आपल्या चुकीसाठी पीडित महिलेची माफी मागितली आहे. तसंच त्याने असंही म्हटलं आहे की, या लग्नामुळे तो खूपच खुश आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी