मोदी सरकारचा मोठा निर्णय, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विशेष पॅकेजची घोषणा

 कोरोनाशी लढा देण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून  विशेष पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 लाख 70 हजार कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली.

 FM Sitharaman
मोदी सरकारचा मोठा निर्णय, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विशेष पॅकेजची घोषणा  |  फोटो सौजन्य: ANI

नवी दिल्लीः देशव्यापी लॉकडाऊनचा आज दुसरा दिवस असून देशभरात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची सख्या वाढत असल्याचे दिसत आहे.  कोरोनाशी लढा देण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून  विशेष पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 लाख 70 हजार कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली. यावेळी त्यांनी वैद्यकीय कर्मचारी, गरीब, महिला, वयोवृद्ध यांच्यासाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. पुढील तीन महिने गरिबांना 5 किलो तांदूळ किंवा गहू मोफत मिळेल.  त्यासोबतच एक किलो डाळ दिली जाणार आहे. आठ कोटी कुटुंबांना 3 महिने मोफत गॅस, महिलांच्या खात्यात 500 रुपये, शेतकऱ्यांना 2 हजार अशा अनेक मोठ्या घोषणा यावेळी करण्यात आल्या.   या योजनेचा 80 हजार गरिबांना लाभ मिळणार आहे.

योजनेअंतर्गत आठ विभागांमध्ये शेतकरी, मनरेगा, गरीब विधवा-निवृत्त कर्मचारी-दिव्यांग, जनधन योजना-उज्ज्वला योजना, सेल्फ हेल्प ग्रुप (महिला), ऑर्गनाइज्ड सेक्टर वर्कर्स (EPFO),कन्स्ट्रक्शन वर्कर्स यांना डीबीटीला फायदा मिळणार आहे. वयोवृद्ध, दिव्यांग आणि विधवांना पुढील तीन महिन्यात 1000 रुपये दोन हफ्त्यात दिले जाणार आहेत.

लॉकडाऊनच्या परिस्थितीत एकही गरीब उपाशी राहू नये यासाठी सरकारनं ही व्यवस्था केल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं. पुढील तीन महिन्यांसाठी EPF सरकार भरेल. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत ईपीएफ योगदानाची भरपाई केली जाईल. पीएफ योगदान कंपनीच्या 12 टक्के आणि कर्मचारी 12 टक्के म्हणजे 24 टक्के सरकार पैसे देईल. कोरोना महामारीमुळे ईपीएफच्या नियमात बदल करण्यास सरकार तयार आहे. जेणेकरुन पीएफ खात्यात जमा झालेला 75% नॉन रिफंडेबल रक्कम किंवा तीन महिन्यांचा पगार (जे कमी असेल ते) काढता येतील. 

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केलेल्या महत्त्वाच्या घोषणा

 1.  केंद्र सरकारचे 1 लाख 70 हजार कोटींचे पॅकेज
 2. 2. वैद्यकीय कर्मचा-यांना 3 महिन्यांसाठी 50 लाखांच्या विम्याचे कवच
 3. 3. देशात कोणही उपाशी राहणार नाही
 4. 4. शहर-ग्रामीण भागातील गरीब, स्थलांतरीत मजुरांना तातडीने मदत
 5. 5. प्रधान मंत्री अन्न कल्याण योजनेची घोषणा
 6. 6. अन्न कल्याण योजनेंतर्गत, 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ,1 किलो दाळ मोफत
 7. 7. 80 कोटी जनतेला या योजनेचा लाभ मिळणार
 8. 8. 8.69 शेतकऱ्यांना मिळणार 2 हजार रुपये. प्रधानमंत्री सन्मान योजनेअंतर्गत एप्रिलआधीच जमा होणार हफ्ता
 9. मनरेगा मजूरांचा पगार वाढणार. 5 कोटी मजूरांना होणार याचा फायदा
 10. आरोग्य कर्मचाऱ्यांना 50 लाख रुपयांचा आरोग्य विमा, डॉक्टर, पॅरामेडिक आणि स्वास्थ्य कर्मचाऱ्यांना होणार फायदा
 11. 9. रोजगार हमी योजनेच्या प्रत्येक मजुराच्या खात्यावर 2 हजार रु. टाकणार
 12. 10. अन्न कल्याण योजनेंतर्गत तीन महिने मोफत धान्य पुरवठा
 13. 11. रोहयो अंतर्गत रोजच्या मजुरीत 182 वरुन 202 रु.पर्यंत वाढ, 5 कोटींना फायदा
 14. 12. 3 कोटी वरिष्ठ नागरिक, विधवा स्त्रिया आणि दिव्यांगांना 1000 रुपये प्रति महिना अशी मदत 3 महिन्यांसाठी मिळणार
 15. 13. दिव्यांगांना 1 हजार रुपयांचे अतिरीक्त सानुग्रह अनुदान
 16. 14. जनधन खाते असलेल्या 20 कोटी महिलांना 3 महिने 500 रुपयांचे सानुग्रह अनुदान
 17. 15. उज्ज्वला योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना 3 महिने मोफत गॅस सिलिंडर
 18. 16. आठ कोटी 30 लाख कुटुंबांना उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत 3 महिने मोफत सिलिंडर
 19. 17. 63 लाख बचत गटांना 10 ऐवजी 20 लाखांचा व्याजमुक्त कर्जपुरवठा, 7 कोटी कुटुंबांना लाभ
 20. 18. 100 पेक्षा कमी कर्मचा-यांच्या कंपन्यांतील 15 हजारांपेक्षा कमी पगार असलेल्यांचा EPF सरकार 3 महिने भरणार

अर्थमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

 • मनरेगा माध्यमातून काम करणाऱ्यांची रोजंदारी 182 वरुन 202 रुपयांपर्यंत वाढवली.
 • वयोवृद्ध, दिव्यांग आणि विधवांना पुढील तीन महिन्यात 1000 रुपये दोन हफ्त्यात दिले जाणार आहेत.
 • ज्या कंपन्यांमध्ये 100 पेक्षा जास्त कर्मचारी आहेत, त्यामधील ₹15 हजार पेक्षा कमी पगार असणाऱ्याचा पीएफ पुढील तीन महिने सरकार भरणार आहे. 80 लाख कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.
 • मातृशक्ती, महिला ज्यांचं जनधन खातं आहे, त्या साडेवीस कोटी लाख महिलांच्या खात्यात तीन महिन्यांसाठी दर महिन्याला 500 रुपये.
 • वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स, पॅरामेडिकल स्टाफ सफाई कर्मचारी यासारख्या योद्ध्यांना 50 लाखांचा आरोग्य विमा. याचा फायदा 20 लाख कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.
 • मातृशक्ती, महिला ज्यांचं जनधन खातं आहे, त्या साडेवीस कोटी लाख महिलांच्या खात्यात तीन महिन्यांसाठी दर महिन्याला 500 रुपये.
 • शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रुपये भरणार, देशातील 8 कोटी 70 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात हे दोन हजार रुपये एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भरले जातील.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...