Nirmala Sitharaman: 'कोरोना, लॉकडाऊन.. युद्ध तरीही आम्ही महागाई 'कंट्रोल'मध्ये ठेवलीय', अर्थमंत्री निर्मला सीतारामनांचा दावा

FM Nirmala Sitharaman in Lok Sabha on Inflation: जगाला यापूर्वी कधीही महामारी, लॉकडाऊन अशा गोष्टींचा सामना करावा लागला नव्हता. अशा परिस्थितीत देखील भारताने महागाई नियंत्रणात ठेवली असा दावा देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत केला आहे.

finance minister nirmala sitharaman claims corona lockdown despite war we have controlled inflation
Nirmala Sitharaman: 'कोरोना, लॉकडाऊन.. युद्ध तरीही आम्ही महागाई 'कंट्रोल'मध्ये ठेवलीय', अर्थमंत्री निर्मला सीतारामनांचा दावा  |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • महागाईबाबत अर्थमंत्र्यांचं संसदेत उत्तर
  • भारताची अर्थव्यवस्था खूप मजबूत असल्याचा अर्थमंत्र्यांचा दावा
  • 'कोरोना, लॉकडाऊन.. युद्ध तरीही महागाई नियंत्रणात आहे, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा दावा

Nirmala Sitharaman: नवी दिल्ली: महागाईच्या मुद्द्यावरून सोमवारी संसदेत विरोधकांच्या प्रश्नांना केंद्र सरकारने उत्तरे दिली. लोकसभेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या वतीने सांगण्यात आले की, विपरित परिस्थिती असताना देखील भारताची अर्थव्यवस्था  प्रगती करत आहे. अडचणी असूनही आपली अर्थव्यवस्था मजबूत आहे. जगात काय चाललं आहे आणि जग कुठे चालले आहे हे देखील आपण बघायला हवे. त्यामुळे इतर देशांशी तुलना करणे योग्य नाही. असं म्हणत अर्थमंत्र्यांनी आपल्या सरकारची आर्थिक धोरणं योग्य असल्याचं म्हटलं आहे. 

अर्थमंत्री म्हणाल्या, भारताची महागाई कंट्रोल.. 

दरम्यान, अधिवेशनात सुरु असलेल्या चर्चेत विरोधकांनी महागाईच्या मुद्द्यावरुन सरकारला धारेवर धरलं होतं. या सगळ्या मुद्द्यावर बोलताना निर्मला सीतारामन म्हणाल्या की, 'आपण एक गोष्ट लक्षात घ्या की, यापूर्वी जगात कधीही अशी परिस्थिती उद्भवली नव्हती ती गेल्या दोन वर्षांमध्ये पाहायला मिळाली. या दोन वर्षात कोरोना, लॉकडाऊन, ओमेक्रॉन, रशिया-युक्रेन युद्ध आणि चीनमध्ये अनेक ठिकाणी अद्यापही अनेक ठिकाणी सुरु असलेला लॉकडाऊन या सगळ्या गोष्टींमुळे आयात-निर्यातीवर मोठा परिणाम झाला आहे. या सगळ्याचा परिणाम आपल्याला महागाई वाढली असल्याचं दिसतं आहे. आम्ही देखील ते मान्य करतो. पण एक गोष्ट लक्षात घ्या की, विपरित परिस्थितीत देखील आपण महागाई दर हा ७ टक्क्यांच्या खाली ठेवला आहे. हा दर आणखी खाली आणण्यासाठी आम्ही प्रचंड प्रयत्न करत आहोत.'

अधिक वाचा: Owaisi on Modi : श्रीलंकेच्या राष्ट्रपतींप्रमाणे आता जनता आपल्या पंतप्रधानांच्या घरात घुसेल, ओवेसींची मोदी सरकारवर कडाडून टीका

अर्थमंत्री पुढे म्हणाल्या की, 'आपण पाहिलं की, जगात काय चालले आहे आणि भारताचे जगात काय स्थान आहे हे देखील पाहा. जगाला याआधी कधीच अशा महामारीचा सामना करावा लागला नाही. या महामारीतून बाहेर पडण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या स्तरावर काम करत आहे, त्यामुळे मी भारतातील जनतेला श्रेय देते.'

त्या पुढे म्हणाल्या, 'प्रतिकूल परिस्थिती असूनही, जागतिक बँक, IMF आणि इतर जागतिक संस्थांकडून भारताचे जागतिक विकास दर आणि गेल्या दोन वर्षांत भारताच्या विकास दराचे अनेक वेळा मूल्यांकन केले गेले आहे.'

अधिक वाचा: Mann Ki Baat:स्वातंत्र्याची 75 वर्षानिमित्त पंतप्रधान मोदींचं तिरंग्याबाबत नागरिकांना विशेष आवाहन

'त्यानुसार प्रत्येक वेळी त्यांनी मूल्यांकन केले आहे. त्या काळात जागतिक विकास दर अपेक्षेपेक्षा कमी राहिला आहे. भारताचा विकास दरही अपेक्षेपेक्षा कमी राहिला आहे, पण प्रत्येक वेळी भारताचा विकासदर सर्वाधिक राहिला आहे.' असा दावा सीतारामन यांनी यावेळी केला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी