Sidhu Moose Wala Murder: जाणून घ्या कोण होते पंजाबी सिंगर सिद्धू मूसेवाला; ज्यांच्या हत्येने पंजाबमध्ये उडाली एकच खळबळ 

लोकल ते ग्लोबल
Updated May 30, 2022 | 10:47 IST | टाइम्स नाऊ मराठी

Know Everything about Punjab Singer Sidhu Moosewala | पंजाबी सिंगर आणि कॉंग्रेसचे नेते सिद्धू मूसेवाला यांची गोळी मारून हत्या करण्यात आली आहे.

Find out who was the Punjabi singer Sidhu Moose Wala
जाणून घ्या कोण होते पंजाबी सिंगर सिद्धू मूसेवाला  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • पंजाबी सिंगर आणि कॉंग्रेसचे नेते सिद्धू मूसेवाला यांची गोळी मारून हत्या करण्यात आली आहे.
  • त्यांचा जन्म १७ जून १९९३ रोजी मानसा जिल्ह्यातील मूस गावात झाला.
  • सिद्धू यांच्यावर आपल्या गाण्यांद्वारे बंदूक संस्कृतीला प्रोत्साहन दिल्याचा आरोप होता.

Sidhu Mosewala Profile and Facts । नवी दिल्ली : पंजाबी सिंगर आणि कॉंग्रेसचे नेते सिद्धू मूसेवाला यांची गोळी मारून हत्या करण्यात आली आहे. ते २८ वर्षांचे होते. सिद्धू मूसेवाला (punjabi singer sidhu moose wala death news) यांची शनिवारी पंजाबमधील भगवंत मान सरकारने सुरक्षा हटवली होती. सिद्धू मूसेवाला हे पंजाबी चित्रपटसृष्टीतील मोठे गायक होते. याशिवाय त्यांनी २०२२ साली मानसा विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूकही लढवली होती. (Find out who was the Punjabi singer Sidhu Moose Wala). 

अधिक वाचा : तब्बल एवढ्या लोकांनी IPL ची फायनल थेट मैदानातून पाहिली

पंजाबी सिंगर सिद्धू मूसेवाला यांचा जन्म १७ जून १९९३ रोजी मानसा जिल्ह्यातील मूस गावात झाला. त्याचे खरे नाव सुभदीप सिंग सिद्धू होते. मुसेवाला यांचे वडील भोला सिंग हे माजी लष्करी अधिकारी आहेत. तसेच त्यांची आई चरण कौर या गावातील सरपंच आहेत. मूसेवाला सहाव्या वर्गापासून हिप हॉप गाणी ऐकू लागले. लुधियानाच्या हरविंदर बिट्टू यांच्याकडून त्यांनी गायन शिकले. मुसेवाला यांनी लुधियानाच्या गुरु नानक देव इंजिनियरिंग महाविद्यालयातून इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगची पदवी घेतली होती. यादरम्यान त्यांनी डीएव्ही कॉलेज फेस्टमध्ये सहभाग घेतला होता. दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला तुपाक शकूर यांना आपला आदर्श मानत होते.

पहिले गाने कॅनडात झाले प्रदर्शित 

पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर सिद्धू मूसेवाला कॅनडाला गेले. तिथे त्यांनी त्यांचे पहिले गाणे झी वॅगन प्रदर्शित केले. २०१८ मध्ये त्यांनी भारतात लाईव्ह परफॉर्मन्स देण्यास सुरुवात केली. २०१७ मधील सो हाय या गाण्याने त्यांना नवीन ओळख करून दिली. या गाण्यासाठी त्यांना ब्रिट आशिया टीव्ही म्युझिक अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार मिळाला होता. यानंतर त्यांनी जट्ट, टोचन, सेल्फ मेड, फेमस आणि वॉर्निंग शॉट्स यांसारखे म्युझिक व्हिडीओ रिलीज केले. २०१८ मध्ये त्यांनी डाकुओ दा मुंडा या चित्रपटासाठी डॉलर हे गाणे गायले. लक्षणीय बाब म्हणजे पंजाबी चित्रपटातील हे त्यांचे पहिले गाणे होते.

सतत वादाच्या भोवऱ्यात राहिले होते

सिद्धू मूसेवाला अनेकवेळा वादात सापडले आहेत. सिद्धू यांच्यावर आपल्या गाण्यांद्वारे बंदूक संस्कृतीला प्रोत्साहन दिल्याचा आरोप होता. २०१९ मध्ये त्यांनी 'जट्ट जिओने मोद दी गन वारगी' हे गाणे रिलीज केले. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध तक्रारही दाखल करण्यात आली होती. या गाण्याच्या माध्यमातून त्यांनी १८व्या शतकातील शीख योद्धा माई भाखो यांच्या संदर्भात वाद निर्माण केल्याचा आरोप सिद्धू यांच्यावर करण्यात आला होता. वाद वाढल्यानंतर त्यांनी माफी देखील मागितली होती. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी