Fire in Night Club: थायलंडमध्ये मोठी दुर्घटना, नाईट क्लबमध्ये लागलेल्या आगीत १३ जणांचा होरपळून मृत्यू

Thailand Night club fire updates: नाईट क्बलमध्ये भीषण आग लागल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घघटनेत १३ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. 

fire in night club in thailand at least 13 killed fear of death number increase
Fire in Night Club: थायलंडमध्ये मोठी दुर्घटना, नाईट क्लबमध्ये लागलेल्या आगीत १३ जणांचा होरपळून मृत्यू  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • थायलंडमधील नाईट क्लबमध्ये अग्नितांडव
  • आगीत होरपळल्याने १३ जणांचा मृत्यू
  • मृतकांचा आकडा वाढण्याची भीती

Fire in night club: थायलंडमध्ये एक मोठी दुर्घटना झाली आहे. येथील चोनबुरी प्रांतात असलेल्या नाईट क्लबमध्ये आग लागली. या आगीत तब्बल १३ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर अनेकजण गंभीररित्या होरपळले आहेत. मृतकांमध्ये ४ महिलांचाही समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. (fire in a night club in thailand at least 13 killed fear of death number increase)

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी नाईट क्लबमध्ये मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. नाईट क्लबमध्ये आग लागल्याने एकच गोंधळ उडाला आणि नागरिकांची धावपळ उडाली. याच दरम्यान चेंगराचेंगरी सुद्धा झाली असल्याची माहिती समोर येत आहे.

स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सट्टाहिप जिल्ह्यातील माऊंटेन बी नाईट क्लबमध्ये रात्री जवळपास १ वाजण्याच्या अचानक आग लागली. पीडितांपैकी बहुतांश नागरिक हे थाई असल्याची माहिती समोर आली आहे. तर काही परदेशी पर्यटक असल्याचं वृत्त समोर आलं आहे. आग नेमकी कशामुळे आणि का लागली याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाहीये.

अधिक वाचा : नॅन्सी पेलोसी तैवानचा दौरा करून परतल्या, चीनचा थयथयाट

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू केलं. तर जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं. जखमींवर स्थानिक परिसरातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे आणि त्यामुळे मृतकांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, थायलंडमधील हा नाईट क्लब खूपच प्रसिद्ध होता. येथे मोठ्या संख्येने भारतातील आणि इतर देशातील पर्यटक हजेरी लावतात. आग लागल्याचे फोटोज आणि व्हिडिओज सुद्धा समोर आले आहेत. काही व्हिडिओमध्ये दिसत आहे की, आग लागल्यानंतर नाईट क्लबमधील नागरिकांची धावपळ सुरू होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी