अहमदाबादच्या कोव्हिड-19 रुग्णालयाला लागलेल्या आगीत 8 जणांचा मृत्यू, पंतप्रधानांनी व्यक्त केले दुःख

लोकल ते ग्लोबल
Updated Aug 06, 2020 | 10:59 IST | टाइम्स नाऊ मराठी

Fire in Covid hospital in Ahmadabad: अहमदाबादच्या एका कोव्हिड-19 रुग्णालयात भीषण आग लागल्याने आठ जणांचा मृत्यू झाला आहे आणि 40 जणांना वाचवण्यात यश आले आहे. आगीच्या कारणाचा तपास केला जात आहे.

Fire in Shrey hospital, Ahmadabad
अहमदाबादच्या श्रेय रुग्णालयाला भीषण आग  |  फोटो सौजन्य: ANI

नवी दिल्ली: अहमदाबाद (Ahmadabad) येथे कोव्हिड-19च्या एका रुग्णालयात (Covid-19 hospital) भीषण आग (fire) लागल्याने आठ जणांचा मृत्यू (8 dead) झाला. या दुर्घटनेतून 40 लोकांना सुरक्षित वाचवण्यात (40 rescued) यश आले आहे. अहमदाबादच्या श्रेय रुग्णालयात (Shrey hospital) ही आग लागली. या रुग्णालयात कोरोनाच्या रुग्णांवर (corona patients) उपचार चालू होते. सांगण्यात येत आहे की या खासगी रुग्णालयाच्या (private hospital) आयसीयू वॉर्डमध्ये (ICU ward) ही आग लागली. एका अधिकाऱ्याने सांगितले की अहमदाबादच्या नवरंगपूर भागातल्या (Navrangpur) श्रेय रुग्णालयाला बुधवारी पहाटे आग लागली. त्यांनी सांगितले की या रुग्णालयातून कोव्हिड-19च्या जवळपास 40 रुग्णांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे आणि शहरातील इतर रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. आग कशी लागली याचा तपास करण्यात येत आहे.

पहाटे 3.30 वाजता लागली आग

ही आग पहाटे 3.30 वाजता लागल्याची माहिती समोर येत आह. हे रुग्णालय अहमदाबादच्या नवरंगपूर भागात आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. तिथे पोहोचलेल्या पोलिसांनी अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांसह रुग्णालयात अडकलेल्या लोकांना बाहेर काढले. बचावकर्मींनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.

पंतप्रधान मोदींनी व्यक्त केले दुःख

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या दुर्घटनेत जीव गमावलेल्या लोकांच्या कुटुंबियांप्रति संवेदना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी याबाबत गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी आणि अहमदाबादचे महापौर बिजाल पटेल यांच्याशी चर्चा केली आहे. पंतप्रधानांनी सांगितले की प्रभावितांना प्रशासनाकडून शक्य ती सर्व मदत करेल. घटनास्थळी महापौर पटेल तसेच नगर निगम अधिकारी उपस्थित आहेत.

घटनेच्या तपासाचे आदेश

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रुग्णालयाला ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली. आगीची बातमी कळताच रुग्णांचे कुटुंबीय रुग्णालयाच्या बाहेर जमा झाले, पण पोलिसांनी त्यांना आत जाण्यापासून थांबवले. मुख्यमंत्री रूपाणी यांनी या घटनेच्या तपासाचे आदेश दिले आहेत आणि तीन दिवसांत अहवाल मागितला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी