ब्रिटानिया कंपनीच्या फॅक्टरीत लागली आग, कोट्यवधींचे नुकसान

fire in the factory of Britannia company, loss of crores : बिस्कीट, केक, कुकीझ यांच्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ब्रिटानिया कंपनीच्या फॅक्टरीत मोठी आग लागली.

fire in the factory of Britannia company, loss of crores
ब्रिटानिया कंपनीच्या फॅक्टरीत लागली आग, कोट्यवधींचे नुकसान 
थोडं पण कामाचं
  • ब्रिटानिया कंपनीच्या फॅक्टरीत लागली आग
  • शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागल्याची शक्यता
  • कोट्यवधींचे नुकसान

fire in the factory of Britannia company, loss of crores : बिस्कीट, केक, कुकीझ यांच्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ब्रिटानिया कंपनीच्या फॅक्टरीत मोठी आग लागली. शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त होत आहे. आग लागल्यामुळे कंपनीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. 

आकाशातून बघा भारत

ट्रेंड होत असलेले क्यूट फोटो

'या' सेलिब्रेटींच्या मृत्यूचं गूढ अद्यापही कायम

उत्तराखंडमधील उधमिसंहनगर जिल्ह्यातील रुद्रपूरमधील सिडकुलमधल्या पंतनगर येथे ब्रिटानिया कंपनीची मोठी फॅक्टरी आहे. या फॅक्टरीत आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच कंपनीच्या अंतर्गत अग्निशमन विभागाने आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू केले. स्थानिक अग्निशमन दलाचे पथक पण आग विझविण्यासाठी आले. अग्निशमनच्या एकूण दहा वाहनांनी (बंबगाड्या) सलग पाच तास प्रयत्नांची शर्थ करून आग नियंत्रणात आणली.

ब्रिटानिया कंपनीच्या फॅक्टरीतील आग प्रकरणाची चौकशी होणार आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आगीमुळे झालेल्या हानीचा अंदाज घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

ब्रिटानिया बिस्कीट कंपनीचा इतिहास

बिस्कीट, केक, कुकीझ यांच्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ब्रिटानिया बिस्कीट कंपनीची स्थापना कोलकाता येथे १८९२ मध्ये झाली. नुस्ली वाडिया या कंपनीचे चेअरमन आहेत. 

बिस्कीट खाल्ले तर विटाळ होतो असे मानणाऱ्यांच्या काळात ब्रिटानिया बिस्कीट कंपनी प्रामुख्याने इंग्रज ग्राहकांना डोळ्यांपुढे ठेवून उत्पादने तयार करत होती. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात आणि नंतरच्या वर्षांमध्ये ब्रिटानिया बिस्कीट कंपनी आणि या कंपनीच्या उत्पादनांची लोकप्रियता वाढली. खप वाढला आणि कंपनी मोठी झाली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी