Firing at Bathinda Military Station : बठिंडा लष्करी तळावर गोळीबार, 4 मृत्यू

Firing at Bathinda Military Station, Army confirm four casualties, area sealed, search operation under way : पंजाबमध्ये बठिंडा येथील लष्करी तळावर गोळीबार झाला. दोन जणांकडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात तोफदळाशी संबंधित 4 जणांचा मृत्यू झाला.

Firing at Bathinda Military Station
बठिंडा लष्करी तळावर गोळीबार, 4 मृत्यू  |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • बठिंडा लष्करी तळावर गोळीबार, 4 मृत्यू
  • दोघांनी गोळीबार केल्याचे वृत्त
  • गोळीबार करणाऱ्यांना शोधण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू

Firing at Bathinda Military Station, Army confirm four casualties, area sealed, search operation under way : पंजाबमध्ये बठिंडा येथील लष्करी तळावर गोळीबार झाला. दोन जणांकडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात तोफदळाशी संबंधित 4 जणांचा मृत्यू झाला. ही घटना आज (बुधवार 12 एप्रिल 2023) सकाळी घडली. गोळीबार सुरू होताच क्विक रिअॅक्शन टीम (क्यूआरटी) सक्रीय झाल्याचे वृत्त आहे. 

क्यूआरटीने गोळीबार करणाऱ्यांना शोधण्यासाठी सर्च ऑपरेशन (शोध मोहीम) सुरू केले आहे. लष्करी तळ सील करण्यात आला असून कोणालाही विना परवानगी तळावर येण्यास किंवा बाहेर जाण्यास मनाई आहे. 

गोळीबार लष्करी तळातूनच झाला आहे, बाहेरून घुसखोरी करून गोळीबार करण्यात आलेला नाही, असे बठिंडाचे एसएसपी गुलनीत खुराना यांनी सांगितले. त्यांनी दहशतवादी हल्ला झाल्याची शक्यता फेटाळली.

एक रायफल बेपत्ता

बठिंडा लष्करी तळावरून दोन दिवसांपूर्वी इंसास रायफलसह २८ राउंड गोळ्या गहाळ (INSAS rifle along with 28 rounds reported missing) झाल्या आहेत. या घटनेचा आणि गोळीबाराचा काही संबंध असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पण अद्याप या संदर्भात अधिक माहिती हाती आलेली नाही.

14 देशांचा जावई, 105 वेळा केले लग्न

रस्ता नसलेले गाव, जिथे फक्त होड्यांतून वावरतात

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी